अजय वाळिंबे

गेले काही महिने शेअर बाजारातील खरेदी म्हणजे धाडसाचे काम असे काहीसे झाले आहे. कुठलाही शेअर खरेदी करा तो आठ-पंधरा दिवसांत खाली येऊन आपण घेतलेल्या भावापेक्षा कमी भावात मिळतो. याला अपवाद अर्थात ‘हृतिक’चा. हृतिक म्हणजे एच – एचडीएफसी, आर- रिलायन्स, आय – इन्फोसिस, टी – टीसीएस, एच- हिंदुस्तान युनिलिव्हर, आय – आयटीसी आणि के – कोटक महिंद्र बँक. पोर्टफोलियोमध्ये सुचविलेले शेअर हे ‘हृतिक’च्या बाहेर असल्याने नीट अभ्यासून घ्यावे लागतात आणि तेही बाजारातील मंदीला अपवाद नाहीत. मात्र गेल्या दोन महिन्यांत या सदरातून सुचविलेले शेअर्स प्रत्येक मंदीला थोडे थोडे खरेदी करण्याचे धोरण ठेवल्यास मध्यम ते दीर्घ कालावधीत फायदा नक्कीच होईल. संयम मात्र हवा.

d subbarao rbi former governor
तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊनही भारत गरीबच राहणार – RBI चे माजी गव्हर्नर
Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
Raghuram Rajan on PM narendra modi
‘मोदींचे २०४७ च्या विकसित भारताचे ध्येय मूर्खपणाचे’, रघुराम राजन यांची टीका
Prime Minister Narendra Modi inaugurating 'Gyaltsuen Jetsan Pema Wangchuk Mother and Child Hospital
भूतानमध्ये वैद्यकीय सेवेसाठी भारताचे सहाय्य

अतुल ही भारतातील पहिली खासगी कंपनी असेल ज्याचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केले. आज वलसाडमधील अतुल येथे सुमारे १,३०० एकर विस्तीर्ण परिसरात प्रकल्प असलेली अतुल लिमिटेड ही एक आघाडीची रासायनिक कंपनी असून जगभरातील सुमारे २७ उद्योगांशी संबंधित विविध सेवा पुरविते. कंपनीने गेल्या ७२ वर्षांत आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी कंपनीने अमेरिका, ब्रिटन, ब्राझील, चीन आणि संयुक्त अरब अमिरातींमध्ये साहाय्यक कंपन्या / उप-कंपन्या स्थापन केल्या आहेत.

विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर अतुल आज सुमारे १,००० हून अधिक उत्पादने आणि फॉर्म्युलेशन तयार करण्यासाठी जवळजवळ सर्व प्रक्रिया आणि युनिट ऑपरेशन्स सांभाळते. कंपनीच्या इतर विभागांमध्ये बल्क केमिकल्स, इंटरमीडिएट्स, रंग, अ‍ॅरोमेटिक्स, पॉलिमर, फार्मास्युटिकल्स आणि पीक संरक्षण या क्षेत्रातील विविध उत्पादनांचा समावेश आहे. सुमारे ३,००० कर्मचारी कार्यरत असलेल्या अतुलचे आज देश-विदेशात ६,०००च्या वर ग्राहक आहेत. गेले काही महिने मंदीसदृश वातावरण असले तरीही कंपनीची विविध उत्पादने अनेक उद्योगांत वापरली जात असल्याने कंपनीला विशेष झळ बसलेली नाही.

गेल्या आर्थिक वर्षांत ३,९१६ कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या अतुलने यंदाच्या पहिल्या तिमाहीत ९९९.३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १२९.७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत तो ५४ टक्क्य़ांनी अधिक आहे. आगामी कालावधीतदेखील कंपनीची कामगिरी उत्तम राहील अशी अपेक्षा आहे. उत्तम आणि अनुभवी प्रवर्तक, केवळ ०.३ बीटा असलेली आणि कुठलेही कर्ज नसलेली अतुल म्हणूनच तुमच्या पोर्टफोलियोत हवी.

अतुल लिमिटेड

(बीएसई कोड  ५०००२७)

शुक्रवारचा बंद भाव – रु. ३,७३०

लार्ज कॅप समभाग

प्रवर्तक : लालभाई समूह

उत्पादन : अ‍ॅग्रो केमिकल्स

बाजारभांडवल:  रु. १०,४२५ कोटी

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक:     रु.  ४,१६०/ २,८३०

भागभांडवल:  रु.  २९.६६ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक     ४४.७०

परदेशी गुंतवणूकदार    ६.९०

बँक/ म्यु. फंड/ सरकार  २२.९१

इतर/ जनता २५.४९

पुस्तकी मूल्य :   रु. ८९३.३

दर्शनी मूल्य :    रु.१०/-

लाभांश :   १५० टक्के

प्रति समभाग उत्पन्न : रु. १५९.३१

पी/ई गुणोत्तर :  २२

समग्र पी/ई गुणोत्तर :  १०.४६

डेट इक्विटी गुणोत्तर :  ०

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   २२९.४६

रिटर्न ऑन कॅपिटल :   २६.९४

बीटा:      ०.३

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.