26 January 2021

News Flash

माझा पोर्टफोलियो : संतुलित, पोषक आणि उच्च प्रतीची!

अवंतीकडे आयएसओ प्रमाणित चार कोळंबी आणि फिश/ झिंगा फीड उत्पादन प्रकल्प आहेत.

अजय वाळिंबे

अवंती फीड्स ही मत्स्यपालन क्षेत्रातील कोळंबी व माशांचे उत्पादन व निर्यात करणारी भारतातील एक मोठी आघाडीची कंपनी आहे. २७ वर्षांपूर्वी म्हणजे १९९३ मध्ये उत्पादनाला सुरुवात केल्यापासून कंपनीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उत्तम प्रगती केलेली आहे. सुरुवातीला केवळ १०० टक्के निर्यातप्रधान प्रकल्प असलेल्या अवंती फीड्सचे दक्षिण भारतात कोळंबी उत्पादनाचे अद्ययावत प्रकल्प असून त्याकरिता कंपनीने तैवान आणि जपानचे तांत्रिक साहाय्य घेतले आहे. तसेच थाई युनियन फ्रोजन फूड्स पीएलसी या थायलंडमधील कंपनीबरोबर तांत्रिक आणि विपणन करार करून कंपनी आपले उत्पादन घेत आहे आणि निर्यात करीत आहे. गेली  काही वर्षे सातत्याने उत्तम आर्थिक प्रगतीपथावर असलेल्या या कंपनीवर अत्यल्प कर्ज असून गुंतवणुकीवरील परताव्याचे प्रमाण अधिक आहे.

अवंतीकडे आयएसओ प्रमाणित चार कोळंबी आणि फिश/ झिंगा फीड उत्पादन प्रकल्प आहेत. आंध्रच्या पश्चिम गोदावरी जिल्’ातील कोव्वूर, वेमुलूरु आणि बंडापुरम आणि गुजरातमधील वलसाड जिल्’ातील पारडी येथे वर्षांकाठी चार लाख मेट्रिक टन क्षमता असलेले तिचे प्रकल्प आहेत. अवंती आपल्या देशातील कोळंबी आणि मत्स्यपालकांना सातत्याने पोषक, संतुलित आणि उच्च प्रतीचे खाद्य तयार करते. दर्जेदार उत्पादने, उत्कृष्ट साठवण सुविधा, रसद क्षमता, वेळेवर वितरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची स्थिती यामुळे अवंतीला अमेरिका, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्वमधील निष्ठावंत ग्राहकांच्या मागण्या वाढत आहेत.

जगातील सर्वात मोठे सीफूड प्रोसेसर आणि हॅचरीपासून कोळंबी व मासे प्रक्रिया व निर्यात या सर्व प्रकारच्या एकत्रित सुविधा असलेल्या थायलंडमध्ये कोळंबी व मत्स्य खाद्य उत्पादन करणारी ही कंपनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कोविडसारख्या कठीण काळातही अपेक्षित कामगिरी करीत आहे. केवळ १३.६२ कोटी रुपये भागभांडवल असलेल्या या कंपनीने सप्टेंबर २०२० अखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीसाठी उलढालीत ६ टक्के वाढ दाखवून १,१३१.६२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या नऊ महिन्यांत या शेअरमध्ये १०० टक्के वाढ झाल्याने हा शेअर थोडा महाग वाटू शकेल. मात्र तरीही प्रत्येक घसरणीला खरेदी करण्याजोगा हा शेअर आहे.

अवंती फीड्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५१२५७३)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ५२१/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु.७७०/२५०

भरणा झालेले भागभांडवल : रु. ५.५९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ४३.६९

परदेशी गुंतवणूकदार      १६.४०

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ६.७८

इतर/ जनता     ३३.१३

संक्षिप्त विवरण

* शेअर गट : स्मॉल कॅप

* प्रवर्तक       : अल्लूरी वेंकटेश्वर राव

* व्यवसाय क्षेत्र  : मत्स्य खाद्य उत्पादन

* पुस्तकी मूल्य : रु. ११८.७

* दर्शनी मूल्य   : रु. १/-

* लाभांश       : ५१०%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. २५.७

*  पी/ई गुणोत्तर       :      १८

*  समग्र पी/ई गुणोत्तर :      १७

*  डेट इक्विटी गुणोत्तर :      ०.०१

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर      : २८०

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्लॉइड   : ३६.६

*  बीटा                     : ०.८

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 12:07 am

Web Title: avanti feeds ltd company profile zws 70
Next Stories
1 बाजाराचा तंत्र-कल : टू बी ऑर नॉट टू बी
2 विमा..विनासायास : करोनाकाळ संकट, संधीही!
3 रपेट बाजाराची : सावधगिरी हवीच!
Just Now!
X