सध्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि बँकिंग क्षेत्रातील परिस्थिती फारशी चांगली आणि आशादायक नाही. अनुत्पादित कर्जाचा वाढता डोंगर आणि चलनवाढ हे सरकारी बँकांचे मोठे प्रश्न आहेत. आपल्या देशात राजकीय परिस्थिती एकंदरीतच बँका आणि उद्योगक्षेत्रासाठी खूप महत्वाची ठरते. म्हणूनच सध्या या क्षेत्रातील गुंतवणूक टाळणे किंवा संधी मिळताच बाहेर पडणे इष्ट.
मागच्या लेखांत आपण फायदा करून दिलेल्या शेअर्सचा आढावा घेतला. आजच्या लेखात आपण तोटय़ातील म्हणजे आतापर्यंत सुचविलेल्या कंपन्यांपकी किती कंपन्यांचे शेअर्स तोटा दाखवीत आहेत आणि त्या शेअर्सचे नक्की काय करायचे ते अभ्यासूया.
यावेळीही मी कट-ऑफ तारीख १४ नोव्हेंबरच ठेवली असून ज्या शेअर्समध्ये ५% किंवा जास्त नुकसान झाले आहे तेच शेअर्स अभ्यासले आहेत. बाकी कंपन्यांचे शेअर्स जे दोन्ही तक्त्यात नसतील ते शेअर्स तुम्ही राखून ठेवू शकता किंवा स्विच करू शकता.
तुम्ही जर वरील तक्ता नीट अभ्यासलात तर तुम्हाला मी काही शेअर्स का विकायला सांगितले आहेत ते नक्की कळेल. विक्रीसाठी किंवा संधी मिळताच बाहेर पडण्यासाठी सुचविलेले हे सर्व शेअर्स फंडामेंटली खूप चांगले वाटत असले तरीही सध्याची परिस्थिती पाहता या शेअर्समधून बाहेर पडून ग्रोथ ओरिएंटेड अर्थात आगामी काळात वृद्धीपथ सुस्पष्टपणे दिसून येत आहे अशा कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणे फायद्याचे ठरू शकेल. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि बँकिंग क्षेत्रातील परिस्थिती फारशी चांगली आणि आशादायक नाही. अनुत्पादित कर्जाचा वाढता डोंगर आणि चलनवाढ हे सरकारी बँकांचे मोठे प्रश्न आहेत. आपल्या देशात राजकीय परिस्थिती एकंदरीतच बँका आणि उद्योगक्षेत्रासाठी खूप महत्वाची ठरते. म्हणूनच सध्या या क्षेत्रातील गुंतवणूक टाळणे किंवा संधी मिळताच बाहेर पडणे इष्ट.
अर्थात ज्या गुंतवणूकदारांची अजून दोन-तीन वर्ष थांबायची तयारी असेल ते या कंपन्यांचे शेअर्स राखून ठेवू शकतात. निवडक खाजगी बँकांचे शेअर्स खरेदी करायला हरकत नाही. अशोक लेलँडचे जाहीर झालेले निकाल फारच निराशाजनक आहेत. कंपनीचे व्यवस्थापन कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. मात्र एकंदर औद्योगिक मंदीचा थेट परिणाम या कंपनीवर झालेला दिसतो. अर्थात या शेअर्सच्या बाबतीतही जे गुंतवणूकदार थोडा धोका पत्करून १-२ वर्ष थांबायला तयार असतील त्यांनी हे शेअर्स २-१३-१४ रुपयांच्या आसपास खरेदी करून सरासरी भाव कमी करून घ्यावा आणि २२ रुपयांच्या आसपास विकून तोटा टाळावा.
आता तुम्ही म्हणाल की नक्की काय करू ते सांगा.. विकू, ठेवू की अजून खरेदी करू? आता याचे उत्तर प्रत्येक गुंतवणूकदारांनी स्वत:च शोधायचे आहे. कारण केवळ अंदाज माझा, बाकी गुंतवणुकीची पूंजी तुमची, स्वभाव तुमचा आणि म्हणूनच निर्णयही तुमचाच!