av-06या सदरचा या वर्षांरंभाचा लेख एका फंड घराण्याच्या लाँग टर्म गव्हर्नमेंट सिक्युरिटी फंडाची शिफारस करणारा होता. निर्देशांक नवीन उच्चांक  स्थापत असताना एका रोखे गुंतवणूक फंडाची शिफारस करणे तसे धाडसाचे होते. परंतु ४ जानेवारीच्या अर्थ वृत्तांतातून शिफारस केल्यानंतर १५ जानेवारी रोजी रिझव्‍‌र्ह बँकेने २० महिन्यानंतर पहिली दर कपात केली. या दर कपातीच्या घोषणेमुळे ज्या कोणी ही शिफारस  वाचून या रोखे फंडात गुंतवणूक केली असेल त्यांना आपल्या गुंतवणूक करण्याच्या निर्णयाचा पश्चात्ताप करण्याची वेळ नक्कीच आली नसणार. मागील दीड महिन्यात या गुंतवणुकीवरील परताव्याचा वार्षकि दर २४.५६ टक्के आहे.
नेहमीच महागाईच्या दरापेक्षा स्थिर उत्पन्न गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याचा दर अधिक असावा लागतो. महागाईचा दर मागील वर्षी १० टक्के दरम्यान होता. ब्लूमबर्ग या आíथक वृत्तसंकलन करणाऱ्या संस्थेच्या माहितीनुसार दहा वष्रे मुदतीच्या रोख्यातील गुंतवणुकीवरील परताव्याचा दर (ळट) १ सप्टेंबर २०१४ रोजी ८.५५ टक्के होता. सद्यस्थितीत जेव्हा किरकोळ महागाई दर ५ टक्के घसरल्याने रोख्यातील गुंतवणुकीवरील परताव्याचा दर ७.७० टक्के दरम्यान आला आहे. आíथक वर्ष २०१६ मध्ये रिझव्‍‌र्ह बँक अर्धा ते पाऊण टक्के रेपो दर कपात करेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. साहजिकच दहा वष्रे मुदतीच्या रोख्यांच्या परताव्याचा दर ७.४० टक्के इतका खाली येणे अपेक्षित आहे.
व्याजदराचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. कमी मुदतीचे व दीर्घ मुदतीचे. तीन वर्षांपर्यंतची कर्जे अल्प मुदतीची व त्या पुढील मुदतीची कर्जे दीर्घ मुदतीची समजली जातात. सद्य स्थितीत असे दोन प्रकारचे दर नसून बँकेच्या ‘बेस रेट’वर काही टक्के अतिरिक्त दर आकारणी केली जाते. या अतिरिक्त व्याज आकारणीसाठी ‘जी-सेक यील्ड कव्‍‌र्ह’ लक्षात घेतला जातो. घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती व यामुळे सातत्याने कमी होणारी महागाई याचा सकारात्मक परिणाम रोखे गुंतवणुकीवर होताना दिसत आहे. याचा परिणाम चढा असलेला ‘यील्ड कव्‍‌र्ह’ कर्जाची मागणी नसल्याने पाच वष्रे मुदतीच्या नंतर पायाला समांतर झालेला आहे. याचा अर्थ सात व दहा वष्रे मुदतीच्या रोख्यांच्या परताव्याच्या दरांत फार फरक नाही. साहजिकच शॉर्टटर्म फंडापेक्षा ‘जी सेक लाँग टर्म फंड’ किंवा ‘डय़ूूरेशन फंड’ या फंड प्रकारात केलेली गुंतवणूक अधिक परतावा देईल देईल.
या फंडाची गुंतवणूक आठ ते चौदा वष्रे मुदतीच्या सरकारी रोख्यांत होते. व्याजदर जेव्हा कमी होतात तेव्हा दीर्घ मुदतीच्या रोख्यांच्या किंमतीत अधिक वाढ होते. हे लक्षात घेऊन सर्वाधिक गुंतवणूक दहा वष्रे मुदतीच्या रोख्यात केली आहे. म्हणून पुढील एका वर्षांसाठी या फंडात गुंतवणूक केल्यास मुदतठेवींपेक्षा अधिक परतावा मिळविता येऊ शकेल.  
फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार:    गुंतवणुकीसाठी कायम खुला असलेले रोखे गुंतवणूक (ओपन एंडेड डेट फंड) करणारा फंड
जोखीम प्रकार :    रोखे गुंतवणूक असल्याने मुद्दलाची सुरक्षितता .      
गुंतवणूक:    केंद्र सरकारचे रोखे व रोकड सदृश्य गुंतवणुका (कॉलमनी)   
निधी व्यवस्थापक :    या फंडाचे निधी व्यस्थापक देवांग शहा आहेत. सनदी लेखपाल असलेल्या शहा यांना नऊ वर्षांचा स्थिर उत्पन्न गुंतवणुका हाताळण्याचा अनुभव आहे.
पर्याय:    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (पे आउट व रिइंव्हेंस्ट)
फंडाची अन्य माहिती :    हा फंड ‘नो लोड’ प्रकारात मोडतो या फंडात गुंतवणूक करण्यासाठी 1800 3000 3300या क्रमांकावर संपर्क साधता येईल अथवा अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडांच्या विक्रेत्या मार्फत.