गेल्या वर्षांत गुंतवणूकदारांना शेअर बाजारातून ३०% परतावा मिळाल्याने आता शेअर बाजाराला पुन्हा तेजीचे वलय आले आहे. अनेक मिड कॅप्स आणि स्मॉल कॅप्सने तर वर्षभरात दुपटीपेक्षाही अधिक नफा दिल्याने कुठल्याही गुंतवणूकदाराला भुरळ पाडेल असा हा परतावा आहे. साहजिकच आता अनेक नवीन मध्यमवर्गीय भोळे गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळू लागलेले दिसतील. तुम्हाला वैध मार्गाने श्रीमंत व्हायचे असेल तर महागाई निर्देशांकापेक्षा किमान ५% परतावा अधिक हवा. तेजीला भुलून आपली कष्टाची मिळकत गुंतवण्यापूर्वी आपल्याला या गुंतवणुकीतील कितपत समजते हे लक्षात घेणे मात्र फार आवश्यक आहे. अनेकदा नुकसान होऊनही पुन्हा तीच चूक करणारे अनेक गुंतवणूकदार आपण पाहतो. केवळ १-२% व्याज जास्त मिळावे म्हणून अनेक जण आपले पसे पतपेढीत किंवा एखाद्या लहान सहकारी बँकेत गुंतवितात. पेण अर्बनसारख्या बँकेची काय अवस्था झाली ते आपण पाहतोच आहोत. तुम्हाला जर शेअर बाजारातील विशेष कळत नसेल तर म्युच्युअल फंडाचा एक चांगला पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी ३०% परतावा दिल्यानंतर यंदादेखील शेअर बाजार इतका परतावा देऊ शकेल का? या सगळ्यांची उत्तरे आपल्याला वर्षांच्या शेवटीच मिळणार असली तरीही जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाची किंमत, अमेरिकेचे ‘क्वांटिटेटिव्ह इिझग’, चीनची आर्थिक परिस्थिती, परदेशी गुंतवणूक, रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण आणि अर्थात आपला अर्थसंकल्प इत्यादींवर ती अवलंबून असणार आहेत हे नक्की.
सध्या बाजारात तेजीचा कल आहे आणि ही तेजी दीर्घकाळ चालेल असे भाकीत केले जात असले तरीही ही शेअर बाजारातील गुंतवणूक आहे हे विसरून चालणार नाही. पोर्टफोलियोची मांडणी करताना किमान ५०% गुंतवणूक लार्ज कॅपमध्ये असावी आणि उरलेली मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्हणूनच आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या या सदरात यंदाच्या वर्षांत मी लार्ज कॅप शेअरवर भर देणार आहे. तसेच पुढील काही महत्त्वाच्या गुणोत्तरांचा समावेशदेखील करणार आहे.
१) इंटरेस्ट कव्हरेज रेशो : Profit before interest depreciation and tax (PBDIT) / interest expenses
या गुणोत्तरामुळे आपल्याला कंपनीची कर्जावरील व्याज देण्याची क्षमता तपासता येते. त्यामुळे हा जितका जास्त तितकी कंपनीची व्याज भरण्याची क्षमता जास्त.
२) रिटर्न ऑन नेटवर्थ (RONW %) : Net profit- Preference Dividend/ Equity Capital + Free Reserves * 100 100
या गुणोत्तरामुळे आपल्याला कंपनीची उत्पन्न मिळवण्यासाठी भांडवल व राखीव निधी वापरण्याची व्यवस्थापनाची कुशलता शोधता येते.
stocksandwealth@gmail.com
कोल इंडिया लिमिटेड  (बीएसई कोड – ५३३२७८)
० कोल इंडिया ही भारत सरकारची एक सर्वात मोठी ‘महारत्न’ या व्याख्येतील एक लार्ज कॅप कंपनी आहे. तीन वर्षांपूर्वी आयपीओद्वारे (प्राथमिक भागविक्री) निर्गुतवणूक करून सरकारने आपला कंपनीतील भागभांडवलाचा हिस्सा ९०% वर आणला. जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक असलेली ही कंपनी भारतातील ऊर्जा समस्या तसेच कोळसा घोटाळा अशा कारणांमुळे कायम चच्रेत राहिली आहे. कंपनीच्या एकूण १२ उपकंपन्या असून त्यातील काही परदेशातही कार्यरत आहेत. जगभरात कोळशाच्या किमतीत जवळपास ५०% घट होऊनही कंपनीच्या नफ्यात विशेष फरक पडला नाही. नवीन सरकारने ऊर्जानिर्मितीवर भर दिल्याने तसेच झारखंड, ओडिशा आणि छत्तीसगड येथील रेल्वे प्रकल्पांना प्राधान्य असल्याने पुढील दोन वष्रे कंपनीसाठी उत्तम असतील. सप्टेंबर २०१४ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने नक्तनफ्यात ५३% वाढ नोंदवून तो १,८५६.३० कोटी रुपयांवर नेला आहे. यंदाच्या आíथक वर्षांत कंपनीच्या उत्पन्न  आणि नफ्याच्या दरात साधारण १०% वाढ अपेक्षित असून पुढील दोन वर्षांत ती १६% वर जाईल अशी अपेक्षा आहे. सध्या ३८०च्या आसपास असलेला हा शेअर लाभांशच्या दृष्टिकोनातूनही एक चांगली गुंतवणूक ठरू शकतो. कुठलेही कर्ज नसलेल्या या कंपनीने गेल्या वर्षी २९०% लाभांश दिला होता. तुमच्या पोर्टफोलियोमध्ये अवश्य ठेवावा असा हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा हा शेअर आहे.
av-03

Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…