News Flash

फंड-विश्लेषण : बिर्ला सनलाइफ इंडिया जेन नेक्स्ट-थीमॅटिक फंड

‘थीमॅटिक फंडा’सारख्या इक्विटी डायव्हर्सिफाइड फंडात निधी व्यवस्थापक वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये निधी गुंतवतात. जसे की - बँका, वित्तीय संस्था, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण, वाहन उत्पादन,

| April 15, 2013 12:12 pm

‘थीमॅटिक फंडा’सारख्या इक्विटी डायव्हर्सिफाइड फंडात निधी व्यवस्थापक वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये निधी गुंतवतात. जसे की – बँका, वित्तीय संस्था, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण, वाहन उत्पादन, मनोरंजन, दूरसंचार, रसायन, रिटेल व सेवा क्षेत्र आदी.
निधी व्यवस्थापक अर्थव्यवस्थेचा तसेच वेगवेगळ्या उद्योगक्षेत्राच्या (Industry Sector) विकासाचा अभ्यास करून त्या त्या उद्योगक्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये योग्य त्या गुणोत्तर प्रमाणात निधी गुंतवितात. बाजारातील तेजी मंदीचा आधार घेऊन यात वेळोवेळी बदलही केले जातात. जर फंडातील एक औद्योगिक क्षेत्र खराब कामगिरी करत असेल तर निधी  व्यवस्थापक त्याच फंडातील दुसऱ्या, भविष्यात चांगली कामगिरी करणाऱ्या, औद्योगिक क्षेत्रात अधिक निधी गुंतवून चांगला परतावा देण्याचा प्रयत्न करतात. एका सर्वेक्षण पाहणीत असे दिसून आले आहे की, भारतीय तरुण पिढी, मुख्यत्त्वे नोकरी करणाऱ्या तरुण वर्गाची (वय वर्ष १८ ते २५) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा तरुण वर्गाची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या सवयी, पसे खर्च करण्याची पद्धत यामुळे कोणत्या उद्योगक्षेत्रातील कंपन्यांच्या वस्तूंचा खप वाढला याचा विशेष अभ्यास करण्यात आला. कंपनीची विक्री वाढली की नफा आपोआपच वाढतो. तरुण वर्गाला (GenNext) ज्या उद्योगक्षेत्रातल्या ब्रॅण्डेड वस्तू आणि सेवा अधिकाधिक आकर्षति करतात अशी संकल्पना (Theme) घेऊन या फंडाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘बिर्ला सनलाइफ इंडिया जेन नेक्स्ट – थीमॅटिक फंडा’त गुंतवणूक करताना वाढ व लाभांश हे दोन पर्याय उपलब्ध असून कायम गुंतवणुकीसाठी हा फंड खुला आहे. हा फंड ५ ऑगस्ट २००५ रोजी पुन:खरेदीसाठी खुला झाला. ३१ डिसेंबर २०१२ रोजी या फंडाची मालमत्ता रु. ११०.५ कोटी होती. रु. ५,००० किमान गुंतवणुकीने या योजनेत गुंतवणूक करता येते. संजय चावला हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. या फंडाच्या परताव्याच्या तुलनेसाठी राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ हा निर्देशांक उपयोगात आणला जातो. फंडात गुंतवणूक केल्यापासून एक वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास १% शुल्क आकारले जाते. या फंडाची गुंतवणूक ८० ते १००% शेअर्स व शून्य ते २०% गुंतवणूक ही ‘मनीमार्केट’मध्ये गुंतविली जाते. ज्यांना ‘डायव्हर्सिफाइड फंडा’विषयी उत्सुकता आहे त्यांनी या थीमॅटिक फंडात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करावी. या फंडाने मागील एक वर्षांत १६.१ टक्के असा सरस परतावा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2013 12:12 pm

Web Title: birla sun life india gennext themetic fund
टॅग : Arthvrutant
Next Stories
1 वित्त- वेध : ‘ग्रोथ इन्व्हेस्टिंग’एक मायाजाल?
2 पोर्टफोलियो : लख्ख प्रकाशवाट..
3 वेध पडत्या बाजाराचे..
Just Now!
X