|| आशीष ठाकूर

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने सर्व किंतु-परंतुना पूर्णविराम मिळून बाजारात जोरदार तेजी परतली. निर्देशांकांनी नवीन उच्चांकाला गवसणी घातली. या तेजीला चतुरस्र कवी सुधीर मोघे यांच्यावरील काव्यपंक्ती चपखल बसतात. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स: ३९,४३४.७२

निफ्टी : ११,८४४.१०

या स्तंभातील निवडणूक निकालांच्या पूर्वसंध्येला (अर्थवृत्तान्त, १३ मे २०१९) प्रसिद्धी लेखातील वाक्य होते – ‘‘सत्ताधारी भाजप व मित्र पक्षांसह २७३ ची जादुई संख्या गाठण्यात यशस्वी ठरल्यास भविष्यात निर्देशांक – सेन्सेक्सवर ४१,५०० व निफ्टीवर १२,५०० या नवीन उच्चांकाकडे सरकतील.’’ हे विधान आता प्रत्यक्षात येत आहे. आता वाचकांच्या मनातील प्रश्नाकडे वळू या.. आता जी तेजी अवतरली आहे, ती क्षणाचाही उसंत न घेता थेट सेन्सेक्सवर ४१,५०० व निफ्टीवर १२,५०० चे लक्ष्य गाठणार, की निर्देशांक थोडी उसंत, विश्रांती घेतील? या विश्रांतीमध्ये गुंतवणूकदारांना तेजीत सहभागी होण्याची संधी कुठल्या स्तरावर पुन्हा मिळणार, ते आज जाणून घेऊ या.

येणाऱ्या दिवसात बाजारात हलकीशी मंदी ही सेन्सेक्सवर ३८,४०० व निफ्टीवर ११,५२० पर्यंत असेल. या स्तरावर बाजारात खरेदीची संधी असेल. या स्तराचा आधार घेत निर्देशांकावर पुन्हा तेजीची घोडदौड सुरूहोईल. त्या तेजीचे प्रथम लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४०,६०० व निफ्टीवर १२,५०० आणि नंतर सेन्सेक्स ४१,५०० व निफ्टीवर १२,५०० चे लक्ष्य असेल.

आता आपण त्रमासिक निकालाकडे वळू या.

१) भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. (भेल)

तिमाही निकाल तारीख-                   सोमवार, २७ मे

२४ मेचा बंद भाव-               ६९ रु.

निकालानंतरचा केंद्रिबदू स्तर-  ६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने ६० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ७० रुपये. भविष्यात ७० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ९५ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ६० ते ७० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ६० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ४५ रुपयांपर्यंत घसरण.

२) ऑइल इंडिया लिमिटेड

तिमाही निकाल तारीख-                   सोमवार, २७ मे

२४ मेचा बंद भाव-               १८३.९५ रु.

निकालानंतरचा केंद्रिबदू स्तर-  १७५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने १७५ रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १९० रुपये. भविष्यात १९० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २२५ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १७५ ते १९० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : १७५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १६५ रुपयांपर्यंत घसरण.

३) पंजाब नॅशनल बँक

तिमाही निकाल तारीख-                   मंगळवार, २८ मे

२४ मेचा बंद भाव-               ८८.२० रु.

निकालानंतरचा केंद्रिबदू स्तर-  ८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने ८० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १०० व त्या नंतर १२० रुपयांचे लक्ष्य.

ब) सर्वसाधारण निकाल : ८० ते १०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ८० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ६८ रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.