22 November 2019

News Flash

क्षणिक विश्रांती

तिमाही निकालांचे विश्लेषण..

संग्रहित छायाचित्र

|| आशीष ठाकूर

गेल्या आठवडयात तेजीने क्षणिक विश्रांती घेतल्याने आणि गेल्या शुक्रवारी दिवसांतर्गत सेन्सेक्सने ३९,४०० व निफ्टीने ११,८०० चे खालचे लक्ष्य साध्य केले असल्याने, तेजीत पुन्हा सहभागी होण्याची संधी कधी मिळणार, या प्रश्नाने उचल खाल्ली आहे. तेव्हा आज आपण या प्रश्नाचे उत्तर विस्तृतपणे जाणून घेऊ. तत्पूर्वी निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊया.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ३९,४५२.०७

निफ्टी : ११,८२३.३०

पुढल्या महिन्यात ५ जुलला अर्थसंकल्प सादर होईल. तेव्हा जूनअखेपर्यंत सेन्सेक्स ३९,३०० ते ३८,५०० आणि निफ्टी ११,८०० ते ११,५०० पर्यंत खाली येऊ शकतो. या घसरणीत अभियांत्रिकी उदयोग, खासगी व सरकारी क्षेत्रातील बँका व इतके दिवस मृतप्राय असलेले दर्जेदार मिड कॅप व स्मॉल कॅप श्रेणीतील समभाग खरेदी केल्यास उपकारक ठरेल. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडच्या योजना या आता दीर्घ मंदीतून बाहेर येऊन भविष्यात चांगला परतावा देऊ शकतील. तथापि प्रत्येक घसरणीत गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतवता, गुंतवणूकयोग्य रकमेचे २० टक्क्यांच्या पाच तुकडयात विभागणी करून सेन्सेक्सवर ३९,३०० ते ते ३८,५०० आणि निफ्टीवर ११,८०० ते ११,५०० पर्यंतच्या प्रत्येक घसरणीत २० टक्के रक्कम चांगल्या प्रतीच्या समभागात गुंतवत जावी.

तिमाही निकालांचे विश्लेषण..

ट्रेंट लिमिटेड : या स्तंभातील २९ एप्रिलच्या लेखातील समभाग हा ट्रेंट लिमिटेडचा होता. त्याचा बंद भाव त्यासमयी ३५५ रुपये होता व वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्वाचा केंद्रिबदू स्तर हा ३४५ रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर ३४५ रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ३७५ रुपये व त्या नंतर ४२५ रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. ट्रेंट लिमिटेडचा प्रत्यक्ष निकाल हा उत्कृष्ट होता. ३४५ रुपयांचा स्तर राखत ४ जूनला ४२५ रुपयांचा उच्चांक नोंदविला गेला.

याचा फायदा गुंतवणूकदारांनाही झाला. हा समभाग ज्या गुंतवणूकदारांचा दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहे त्यांनी तो राखून ठेवला व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना (शॉर्ट टर्म ट्रेडर) अल्पावधीत २९ टक्के परतावा मिळविला. आजही (दीड महिन्यानंतर) ट्रेंट लिमिटेड ३४५ रुपयांचा महत्वाचा केंद्रिबदू स्तर राखून आहे.

मिहद्र अँण्ड मिहद्र फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड :

या स्तंभातील २२ एप्रिलच्या लेखातील मिहद्र अँण्ड मिहद्र फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड समभागाचा बंद भाव ४१७ रुपये होता व वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्वाचा केंद्रिबदू स्तर हा ४०० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल सर्वसाधारण असेल तर ४०० रुपयांचा स्तर राखत ४०० ते ४४० रुपयांच्या पट्टयात समभागाची वाटचाल असेल. हे प्रत्यक्ष निकाला अगोदरचे विश्लेषण होते. मिहद्र अँण्ड मिहद्र फायनान्शियलचा प्रत्यक्ष निकाल हा सर्वसाधारण होता. ४०० रुपयांचा स्तर राखत ४ जूनला ४४० रुपयांचे मर्यादित लक्ष्य गाठले गेले. आजही (दीड महिन्यानंतर) मिहद्र अँण्ड मिहद्र फायनान्शियलचा समभाग ४०० रुपयांचा महत्वाचा केंद्रिबदू स्तर राखून आहे.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on June 17, 2019 12:07 am

Web Title: bse nse nifty sensex 122
Just Now!
X