24 January 2019

News Flash

अर्थसंकल्पानंतरच्या बाजार-घसरणीची उकल!

दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर करआकारणी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गेल्या लेखातील महत्त्वाचं वाक्य होतं.. अर्थसंकल्पाकडून वारेमाप अपेक्षा असल्याने तो प्रत्यक्षात सादर झाल्यावर बहुतांश वेळेला अपेक्षाभंग होतो. त्यात अगोदर व्यक्त केलेली तेजीला खीळ घालू शकणारी विविध कारणं आता प्रत्यक्षात पटलावर आली आहेत, ती खालीलप्रमाणे –

१)      दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर करआकारणी

२)      कर्जरोख्यांचे (बॉण्ड) वाढते व्याजदर

३)      खनिज तेलाचे पिंपामागे ७० डॉलरवर झेपावणे

४)      वित्तीय तूट ही ३.२ टक्क्यांवरून ३.५ टक्के वा त्यापेक्षा वर जाण्याची शक्यता आणि त्या परिणामी आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था सावध पवित्रा घेण्याची शक्यता.

आता ही कारणं जरी प्रत्यक्षात येत असली तरी या धोक्याची जाणीव गेल्या महिन्यापासून सातत्याने या स्तंभातील विविध लेखांतून दिली गेली आहे. अल्प मुदतीच्या आणि अल्प भांडवल असलेल्या गुंतवणूकदारांना होशियार म्हणून सावधच केलं गेलं होतं. उदाहरण म्हणून १५ जानेवारीचा ‘जोखीम-नफा गुणोत्तराचा लेख’. ज्यात या तेजीचा उल्लेख ‘तेजीचा फुगा’ म्हणून केला होता. वरील सर्व घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे शुक्रवारी सेन्सेक्स ८४० अंशांनी आणि निफ्टी २०० अंशांनी कोसळला. बाजाराचे रंग तत्पूर्वीच स्पष्ट झाला होता. जानेवारीमध्येच मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांचे गुंतवणूक असलेले ‘ब’ वर्गातील समभागांमध्ये (मिड कॅप) घसरणीला सुरुवात झाली होती आणि ते १० ते २५ टक्क्यांपर्यंत गडगडलेही होते.

या पाश्र्वभूमीवर पुढील आठवडा कसा असेल त्याचा आढावा घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३५,०६६.७५
  • निफ्टी :      १०,७६०.६०

बाजारात कंपनीच्या समभागाची किंमत ही कधीच वास्तवाला धरून नसते. तेजीच्या दिवसांत कंपनीच्या मूलभूत मूल्यांकनापेक्षा (फंडामेंटल व्हॅल्यू अथवा पुस्तकी मूल्यापेक्षा) बाजारभाव अधिमूल्य (प्रीमियम) मिळवून असतो. आताच्या घडीला बहुतांश कंपन्यांच्या समभागांचे बाजारभाव हे अधिमूल्य मिळवून आहेत. त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांमध्ये प्रथम अनुक्रमे ३४,८००/ १०,७०० आणि नंतर ३४,०००/ १०,५०० पर्यंत घसरण झाल्यावर या स्तरावर समभागाचे पुस्तकी मूल्यांकन हे बाजारमूल्याशी मेळ घालणार असेल. या स्तरावर बाजाराची घसरण थांबेल अशी अपेक्षा करू या.

First Published on February 5, 2018 12:05 am

Web Title: bse nse nifty sensex 37