गीतांजली जेम्स या आभूषण बनवणाऱ्या कंपनीने पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या आíथक घोटाळ्यामुळे गेल्या आठवडय़ात एकूणच सरकारी बँका व इतर आभूषण कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली. तसेच कंपन्यांच्या त्रमासिक निकालातून निफ्टी ५० स्थित कंपन्याचा एकत्रित विकास, वृध्दी दर हा ६% वर रेंगाळत असताना बाजाराचं मूल्यांकन हे अधिमूल्यावर आहे. या पाश्र्वभूमीवर हा आठवडा कसा असेल त्याचा आढावा घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव

  • सेन्सेक्स ३४,०१०.७६
  • निफ्टी १०,४५२.३०

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ३३,५५०/१०,३५० ते ३४,३५०/१०,६०० असेल. या दरम्यान ३३,५५०/१०,३५० स्तराच्या नकारात्मक खालच्या छेदाचं उद्दिष्ट (डाऊन टारगेट) हे  ३२,५००/१०,०५० असेल आताच्या घडीला निर्देशांकावर शाश्वत तेजी ही ३५,३००/१०,८०० च्या स्तरावरच सुरू होईल.

सोन्याचा किंमत वेध

सोन्याच्या भावाने रु. ३०,००० चा स्तर टिकवत लेखात नमूद केलेली रु. ३०,५०० ते ३०,८०० ची वरची इच्छित उद्दिष्टे गाठली. या आठवडय़ात सोन्याचा मार्गक्रमण पट्टा हा रु. ३०,५०० ते ३०,८०० असेल. रु. ३०,८०० च्या वर सोन्याचा भाव सातत्याने टिकल्यास रु. ३१,००० ते ३१,१०० ही वरची इच्छित उद्दिष्ट असतील. (सोन्याचे भाव एम.सी.एक्स. व्यवहारांवरील).

लक्षणीय समभाग

टाटा पॉवर

(बी.एस.ई. कोड ५००४००)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ८६.६५

विद्युतनिर्मिती क्षेत्रातील ही प्रतिथयश कंपनी (ब्ल्यू चीप). पण सध्या मंदीच्या गत्रेत अडकलेला समभाग कुठला, असे विचारले तर टाटा पॉवर असे उत्तर आवर्जून येईल. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ८० ते ९२ आहे. रु. ९२ ही तेजीच्या दृष्टीने महत्त्वाची कलनिर्धारण पातळी आहे. रु. ९२ च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट रु. १०२ व द्वितीय उद्दिष्ट रु. ११५ ते १२० असेल व दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट रु. १५० असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५% चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत समभाग खरेदी करावा. निर्देशांक जेव्हा ३२,५००/१०,०५० स्तरावर असेल तेव्हा गुंतवणूक करणे श्रेयस्कर होईल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. ७० चा स्टॉप लॉस ठेवावा.

– आशीष अरविंद ठाकूर

ashishthakur1966@gmail.com