21 January 2019

News Flash

वळणबिंदूवर…

या आठवडय़ाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊया...

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| आशीष अरविंद ठाकूर

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे या घडीला सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकावर भरभक्कम आधार हा अनुक्रमे ३४,९०० / १०,६०० या पातळ्यांवर आहे. निर्देशांकांना ३५,३५७ / १०,७८४ चा अडथळा आहे. सरलेल्या शुक्रवारी या अडथळ्यांपल्याड निर्देशांकांचा बंद स्तर राहिला. त्यामुळे या आठवडय़ाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊया.

शुक्रवारचा बंद भाव –

  • सेन्सेक्स : ३५,५३५.७९
  • निफ्टी :      १०,८०६.५०

उद्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे प्रत्यक्ष निकाल येत असल्यामुळे हा आठवडा बाजाराच्या धारणेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा आठवडा आहे. किंबहुना बाजार महत्त्वाच्या अशा वळणिबदूवर उभा आहे. जर निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने लागल्यास सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक प्रथम ३६,०००/ ११,००० आणि त्यानंतर ३६,४४३/ ११,१७१ या अगोदरच्या उच्चांकांना गवसणी घालेल. निकाल अन्यथा लागल्यास गुंतवणूकदारांना समभाग खरेदी करण्यासाठी जी एक संक्षिप्त घसरण हवी आहे ती संधी या आठवडय़ात गुंतवणूकदारांना मिळेल. घसरणीचा हा स्तर सेन्सेक्सवर अनुक्रमे ३४,४५० ते ३४,००० पर्यंत आणि निफ्टीवर १०,५५० ते १०,४०० असा असेल.

सोन्याचा किंमत-वेध

गेल्या महिन्यापासून प्रत्येक लेखात अधोरेखित केलेली सोन्यावरील महत्त्वाची कल निर्धारण पातळी ३०,८०० रुपयांचा स्तर राखत सोन्याने आपले पहिले वरचे इच्छित उद्दिष्ट ३१,३०० रुपये गाठले. येणाऱ्या दिवसात सोन्याचा मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ३१,३०० ते ३१,६०० असा असेल. ३१,६०० रुपये स्तराच्या सकारात्मक वरच्या छेदाचे उद्दिष्ट हे ३१,८०० रुपये असेल. (सोन्याचे भाव एमसीएक्स व्यवहारांवरील)

  • मेघमणी ऑरगॅनिक लि. (बीएसई कोड  :  ५३२८६५)
  • शुक्रवारचा बंद भाव – रु. १०२.८०

मेघमणी ऑरगॅनिक ही कृषी क्षेत्राशी निगडित कीटकनाशक तसेच प्लास्टिक आणि छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाई बनवण्यासाठीच साहाय्यक रसायन म्हणून मेघमणी ऑरगॅनिक कंपनीची उत्पादने वापरण्यात येतात. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ९५ रुपये आहे. ११५ रुपयांच्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट हे १२५ ते १३० रुपये असेल आणि द्वितीय उद्दिष्ट १५० ते १७० रुपये असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत हा समभाग खरेदीचा विचार करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला ८० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

lashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on May 14, 2018 12:07 am

Web Title: bse nse nifty sensex 45