19 March 2019

News Flash

शोध.. निर्देशांकाच्या तळाचा

गुंतवणूकदारांना समभाग खरेदी करण्यासाठीची जी एक संक्षिप्त घसरण हवी होती

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| आशीष अरविंद ठाकूर

गुंतवणूकदारांना समभाग खरेदी करण्यासाठीची जी एक संक्षिप्त घसरण हवी होती ती ‘गॅन कालमापन पद्धती’ने दिली व गेल्या दोन लेखात जेव्हा निर्देशांक उच्चांकावर होता तेव्हापासून अधोरेखित केलेला भरभक्कम आधारावर ३४,२३८/१०,४३९ वर निर्देशांक गेल्या आठवडय़ात स्थिरावला. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

  • सेन्सेक्स : ३४,९२४.८७
  • निफ्टी : १०,६०५.२०

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा सेन्सेक्सवर  ३४,३०२ ते ३५,१४७ – ३५,३४५ व निफ्टीवर १०,४१७ ते १०,६७३ – १०,७३३ असेल. तेजीची खरी कसोटी ही ३५,३४५/१०,७३३ च्या स्तरावरच लागेल.  येणाऱ्या दिवसात हा स्तर ओलांडण्यास निर्देशांक यशस्वी ठरला तरच निर्देशांकांचे ३६,०००/१०,९०० स्तर दृष्टीपथात येईल. अन्यथा निर्देशांक पुन्हा ३४,३०२/१०,४१७ च्या स्तरावर येईल व हा स्तर निर्देशांकांनी टिकवणे गरजेचे आहे.  हा स्तर राखण्यात निर्देशांक अपयशी ठरल्यास निर्देशांक ३३,४५० ते ३३,०००/निफ्टी १०,३०० ते १०,१५० पर्यंत खाली घसरू शकतो.

(येणाऱ्या दिवसात निर्देशांकांवर शाश्वत तेजी ही ३५,३४५/१०,७०० स्तरावरच येणार आहे.  अन्यथा निर्देशांक ३३,०००/१०,३०० ते १०,१५० पर्यंत खाली येऊ शकतो तेव्हा अशोक लेलँड व अगोदर सुचवलेले लक्षणीय समभाग घसरणीत घेण्याचा विचार करावा.)

सोन्याचा किंमत-वेध

  • सोन्याने आपली महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ रु. ३०,८०० चा स्तर राखत रु. ३१,३०० पर्यंत सुधारणा केली. येणाऱ्या दिवसात सोन्याचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ३१,००० ते ३१,३०० असेल व रु. ३१,३०० च्या स्तराचा सकारात्मक वरच्या छेदाचे उद्दिष्ट हे रु. ३१,६०० असेल. या तेजीच्या धारणेला रु. ३१,००० चा स्टॉप लॉस ठेवणे गरजेचे आहे.  (सोन्याचे भाव एमसीएक्स व्यवहांरावरील).

अशोक लेलँड (बीएसई कोड  :  ५००४७७)

शुक्रवारचा बंद भाव – रु. १४५.१०

  • अशोक लेलँड ही ट्रक, बस उत्पादनातील हिंदुजा समुहातील आघाडीची कंपनी. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ११५ ते १५० आहे.  रु. १५० च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट हे रु. १६५ व द्वितीय उद्दिष्ट रु. १८० असेल व दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे रु. २५० असेल व या गुंतवणुकीला रु. १०५ चा स्टॉप लॉस ठेवावा.

lashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on May 28, 2018 12:05 am

Web Title: bse nse nifty sensex 47