|| आशीष अरविंद ठाकूर

गेल्या पंधरा दिवसांत भले निर्देशांकाला ३४,३४५/ १०,७३३ चा स्तर ओलांडण्यात अपयश येत असले तरी भरीव अशी घसरण होत नव्हती हे निर्देशांकाची/ बाजाराची मजबूत स्थिती दर्शविते, हे गेल्या लेखातच सूचित केले गेले होते. याचे प्रत्यंतर ६ जूनच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणात कर्जावरील व्याज दर पाव टक्क्याने महाग होण्याची निराशाजनक बातमी येऊनही निर्देशांकांनी आपली तेजीची चाल कायम ठेवली तेव्हा दिसून आले. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

  • सेन्सेक्स : ३५,४४३.६७
  • निफ्टी :१०,७६७.७०

या आठवडय़ात बाजाराने तेजीचा फेर धरून सर्व गुंतवणूकदारांना तेजीच्या मनस्थितीत आणणारे वळण घेतले आणि येथेच सावध होण्याची गरज आहे. निर्देशांक येणाऱ्या दिवसात ३६,०००/ १०,९०० च्या स्तरावर टिकण्यात अपयशी ठरला तर गुंतवणूकदारांना समभाग खरेदी करण्याची जी एक संधी हवी आहे ती मिळेल. निर्देशांकावर एक संक्षिप्त घसरण ३४,९००/ १०,६०० पर्यंत खाली आणणारी असेल. ती येऊन गेल्यानंतर निर्देशांकाचा ३७,०००/ ११,३५० चा नवीन उच्चांक दृष्टिपथात येईल.