|| आशीष अरविंद ठाकूर

गेल्या तीन महिन्यांतील तेजी-मंदी चक्राचा आढावा घेता, प्रत्येक महत्त्वाच्या वळणबिंदूवर गुंतवणूकदारांना या स्तंभातून सावध केले गेले होते. याचा प्रत्यय त्या त्या वेळी लिहिलेल्या लेखांच्या शीर्षकावरून नजर जरी फिरविली तरी येईल. उदाहरणार्थ, १३ ऑगस्टच्या लेखाचे शीर्षक ‘तेजीचा फुगा की शाश्वत तेजी?’ आणि २७ ऑगस्टच्या लेखाचे शीर्षक ‘.. प्रश्न हाच, तेजीत समभाग विकायचे की राखून ठेवायचे?’ १३ ऑगस्टच्या लेखातील वाक्य होते – ‘‘या महिना अखेपर्यंत निफ्टीवर ११,६०० ते ११,८०० चे स्तरही येतील, पण हे मोहाचे क्षण हे ‘लबाडा घरचं आवतण.. हे जेवल्याखेरीज खरं नाही’ अशा स्वरूपाचे असल्याने हे मोहाचे क्षण टाळून मृगजळामागे धावायचे सोडून शांत बसण्याची गरज आहे. कारण, शांत बसण्याची एक किंमत असते, व ती शांत बसूनच द्यावी लागते, अन्यथा ती पैशाच्या स्वरूपात मोजावी लागते.’’

तेव्हा या तेजीत अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी निर्देशांकाच्या प्रत्येक वाढीव टप्यावर २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत नफ्यात असलेल्या समभागाची नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर तसेच सप्टेंबरमधील लक्षणीय समभाग विप्रो, ईआयडी पॅरी इत्यादी समभाग आता खरेदी न करता नजरेसमोर ठेवून जेव्हा निर्देशांक ३५,०००/१०,६०० स्तरावर येईल त्या वेळेला खरेदी करावेत. सरलेल्या आठवडय़ात आपण मंदीच्या दाहकतेचा अनुभव घेतला. या पाश्र्वभूमीवर त्रमासिक कामगिरीकडे वळूया.

सुचविलेल्या समभागांची तिमाही कामगिरी

(वरील कंपन्यांमध्ये सिप्ला व हुतामाकी पेपर या कंपन्या आपल्या उद्दिष्टाच्या समीप होत्या.)

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.