News Flash

तेजीची झुळूक की शाश्वत तेजी?

तेजीचे वरचे लक्ष्य आता हाकेच्या अंतरावर आहे या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया..

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| आशीष अरविंद ठाकूर

निर्देशांक जेव्हा ३३,३०० / १०,००० च्या मरणासन्न, नाकावर सूत ठेवलेल्या अवस्थेत असताना आता चालू असलेल्या सुखद तेजीचे भाकित मागील लेखात केलेले होते. ‘‘येणाऱ्या दिवसात निर्देशांकावर मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक येइल. तिचे प्रथम वरचे लक्ष्य हे ३५,६००/१०,७०० असे असेल,’’ हे मागेच सूचित केले होते. तेजीचे वरचे लक्ष्य आता हाकेच्या अंतरावर आहे या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया..

शुक्रवारचा बंद भाव –

सेन्सेक्स  : ३५,१५८.५५

निफ्टी :          १०,५८५.२०

येणाऱ्या दिवसात निर्देशांकावर ३५,६०० / १०,७०० हा अवघड टप्पा आहे जो तेजीच्या मार्गातील गतिरोधक असेल. या स्तरावरून एक संक्षिप्त घसरण ही ३४,७०० ते ३४,४०० / १०,४५० ते १०,३५० पर्यंत खाली येऊन निर्देशांक पुन्हा ३५,९०० ते ३६,५०० / १०,८०० ते ११,००० वर झेपावेल.

सेन्सेक्सवर  ३६,५०० व निफ्टीवर ११,००० च्या स्तराला अनन्यसाधारण महत्व आहे (ट्रेंड डिसायडर लेव्हल ) या स्तरावर निर्देशांक सातत्याने १५ दिवस टिकल्यास शाश्वत तेजी सुरू होइल अन्यथा ही सुधारणा ही मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक असेल.

पुढील लेखात आता चालू असलेली तेजी ही  शाश्वत तेजी की मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक (क्षीण स्वरूपाची सुधारणा) या दोहोंमधील फरक आपण विस्तृतपणे जाणून घेऊ.

  • महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लि. (बीएसई कोड – ५३२७५६)
  • शुक्रवारचा बंद भाव – रु. २६५.३५

महिंद्रा उद्योग समूहाची ही कंपनी वाहन उद्योग क्षेत्रासाठी पूरक उपकरणे ज्यात इंजिन, गीअर्स, कास्टिंग बनवणारी ही आघाडीची कंपनी. महिंद्रा सीआयई समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बँण्ड) हा रु. २४० ते रु. २७० आहे. २७० रुपयांवर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम उद्दिष्ट हे रु. ३०० व त्या नंतर रु. ३३० ते ३५० हे दुसरे उद्दिष्ट असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे ४०० रुपये असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ात विभागून प्रत्येक घसरणीत या समभागाचा विचार करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला २०० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

सोन्याचा किंमत-वेध

गेल्या लेखात नमूद केलेले सोन्याच्या आलेखावरील मंदीचे+ रु. ३१,५०० व त्या नंतर रु.३१,२५० असे दोन्ही स्तर गेल्या आठवडय़ात तर आलेच पण ते स्तर देखील तोडून सोन्याचे भाव शुक्रवारी दिवासांतर्गत रु. ३१,००० च्या खाली गेले व  हे सर्व सणासुदीच्या, मंगलमय दिवसात घडत होते जेव्हा सोन्याला नैसर्गिक अशी  मागणी असते.

आजही सोन्याला रु. ३१,००० चा भरभक्कम आधार आहे हा आधार सोन्याने टिकवल्यास सोन पुन्हा ३१,५०० ते ३१,८०० वर झेपावेल अन्यथा रु.३१,००० स्तराखाली सोन्याचे भाव रु. ३०,७०० ते ३०,५०० पर्यंत खाली येऊ शकतात. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 12:29 am

Web Title: bse nse nifty sensex 73
Next Stories
1 नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नांव..
2 शतदा प्रेम करावे..
3 फक्त ठिणगीच ना..?
Just Now!
X