26 February 2021

News Flash

तेजीची झुळूक की शाश्वत तेजी?

या व पुढील लेखांच्या शृंखलांमधून आता चालू असलेल्या तेजीचे स्वरूप हे शाश्वत तेजीच आहे.

|| आशीष अरविंद ठाकूर

गेल्या शुक्रवारी अपेक्षित असलेले ३५,६०० / १०,७०० च्या समीप आल्याने निर्देशांकांनी मंदीच्या वातावरणातील तेजीच एक आवर्तन पूर्ण केले. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव:

  • सेन्सेक्स :३५,४५७.१६
  • निफ्टी :१०,६८२.२0

या व पुढील लेखांच्या शृंखलांमधून आता चालू असलेल्या तेजीचे स्वरूप हे शाश्वत तेजीच आहे. की मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक (क्षीण स्वरूपाची सुधारणा) आहे ते आपण विस्तृतपणे जाणून घेऊ.

प्रथम बाजार तेजीत आहे की मंदीत ते जाणून घेऊ  या. २९ ऑगस्टला सेन्सेक्सवर ३८,९८९ व निफ्टीवर ११,७६० चा ऐतिहासिक उच्चांक नोंदवून निर्देशांक अवघ्या दोन महिन्यात सेन्सेक्स ५,६९८ अंशांनी व निफ्टी १७५६ अंशांनी कोसळला.

(२६ ऑक्टोबरचा नीचांक सेन्सेक्सवर ३३,२९१ व निफ्टीवर १०,००४ नोंदवला गेला.) ही मंदीची दाहकता दर्शवते व या मंदीत ‘ब’ वर्गातील व मिड कॅप समभागांच्या किमतींचा पालापाचोळा झाला व गुंतवणूकदारांच्या आशाआकांक्षा, स्वप्नांचा चुराडा झाला. त्यामुळे आताची सुधारणा ही आत्मविश्वास गमावलेली अशी मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक (क्षीण स्वरूपाची सुधारणा) आहे व सद्य:स्थितीत बाजार मंदीतच आहे. पण या क्षीण स्वरूपाच्या सुधारणेवरचे लक्ष्य हे अनुक्रमे ३५,४७२/१०,६७५ (शुक्रवारचा बंद या स्तरावर झाला) व  त्यानंतर ३६,१४५/१०,८८० व अंतिम लक्ष्य ३६,८१७/११,१०० असेल. शाश्वत तेजी ही ३७,०००/११,२०० स्तरावरच सुरू होईल.

आताच्या घडीला निर्देशांकावर ३५,८०० ते ३५,९००/१०,७५० ते १०,८५०  हा अवघड टप्पा आहे. या स्तरावरून एक संक्षिप्त घसरण ही  ३५,००० ते ३४,७००/१०,५५० ते १०,४५० पर्यंत खाली येऊन निर्देशांक पुन्हा ३५,९०० ते ३६,५००/१०,८०० ते ११,००० वर झेपावेल.

पुढील लेखातील शृंखलांमधून  दुष्काळ, आर्थिक विवंचना व लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालांचे बाजारावर होणारे परिणाम व त्या वेळचे निर्देशांकांचे संभाव्य उच्चांक, नीचांक काय असतील ते जाणून घेऊ.

आदित्य बिर्ला फॅशन अ‍ॅण्ड रिटेल लिमिटेड

वस्त्रोद्योग क्षेत्रातील तयार कपडय़ांसाठी देश – विदेशात नावाजलेले वॅन हुसेन, अ‍ॅलन सोली, लुई फिलीप व पिटर इंग्लंड अशा नाममुद्रांचे स्वामित्व ए.बी.फॅशनकडे आहे. ए.बी.फॅशन समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. १७० ते रु. २०० आहे. रु. २००च्या स्तरावर शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम उदिष्ट हे रु. २१५ व त्यानंतर रु. २३० असेल व दीर्घ मुदतीचे उदिष्ट हे रु. २९० असेल. (शुक्रवारी समभागाचा बंद भाव हा रु. १९१ रुपये होता.) गुंतवणूक योग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत या समभागाचा विचार करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. १३० चा स्टॉप लॉस ठेवावा.

सोन्याचा किंमत-वेध

गेल्या लेखात नमूद केलेला रु. ३१,००० चा भरभक्कम आधार सोन्याच्या भावाने कसाबसा राखला. सद्य:स्थितीत रु. ३१,२५० स्तरावरच शाश्वत तेजी सुरी होऊन वरची लक्ष्य ही अनुक्रमे रु. ३१,४५० ते रु. ३१,६५० असतील. अन्यथा रु. ३१,००० स्तराखाली सोन्याचे भाव पुन्हा रु. ३०,७०० ते ३०,५०० पर्यंत खाली येऊ  शकतात.

(सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

ashishthakur1966@gmail.com

(अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 1:02 am

Web Title: bse nse nifty sensex 74
Next Stories
1 एक सांगायचंय..
2 जागा विक्रीसाठी झालेल्या खर्चाची वजावट मिळणे शक्य
3 मुले व नातवंडांसाठी गुंतवणूक
Just Now!
X