19 January 2020

News Flash

बाप्पांच्या स्वागतासाठी बाजार सज्ज!

गेल्या लेखात संभाव्य तेजीच्या मार्गाचे आलेखन केले होते.

|| आशीष ठाकूर

गेल्या दहा दिवसांत अर्थमंत्र्यांनी विविध आर्थिक सवलतींचा वर्षांव केल्याने बाजारात प्रतिसादादाखल धुवाधार तेजी आली. त्यात सरलेल्या सप्ताहात निर्देशांकानी सेन्सेक्सवर ३७,००० आणि निफ्टीवर ११,०००चा स्तर राखण्यात यश मिळविले. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

  • सेन्सेक्स : ३७,३३२.७९
  • निफ्टी : ११,०२३.३०

म त्यात तेजीसाठी निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ३६,४०० आणि निफ्टीवर १०,८०० चा भरभक्कम आधार राखण्याची नितांत गरज होती. तसा स्तर राखला गेल्यास तेजीच्या पुढील वाटचालीसाठी सेन्सेक्सवर ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१०० हा ‘महत्त्वाचा मार्गदर्शक स्तर’ असणार, असे सूचित केले होते. या स्तरावर निर्देशांक सातत्याने टिकल्यास फिरून निर्देशांक हे सेन्सेक्सवर ३७,४०० ते ३८,२०० आणि निफ्टीवर ११,२०० ते ११,४०० च्या स्तराला गवसणी घालताना दिसतील.

आज बाप्पांच्या आगमनाच्या पवित्र, मंगलदिनी गुंतवणूकदारांनी खालील कंपन्या बाळगल्यास, त्या सुखदायी ठरतील. बाजार कोसळत असताना या समभागात तेजी असल्याने, बाजार कोसळण्याचे दु:खहरण करणाऱ्या अशा ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या विश्लेषणाकडे वळू या.

या स्तंभातील ८ जुलच्या लेखातील ‘टीसीएस’चा बंद भाव २,१६३ रुपये होता व निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर हा २,१०० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर २,१०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २,३०० रुपये सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरच विश्लेषण होते. प्रत्यक्ष निकाल हा उत्कृष्ट होता. ‘टीसीएस’ने २,१०० रुपयांचा स्तर राखत २६ ऑगस्टला २,२८० रुपयांचा उच्चांक नोंदवला. ज्या वाचकांनी हा समभाग दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेने बाळगला आहे, त्यांनी तो राखून ठेवला व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत पाच टक्के परतावा मिळविला. आजही (दीड महिन्यांनंतर) टीसीएस २,१०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखून आहे.

दुसरा समभाग हा १५ जुलच्या लेखातील ‘एचडीएफसी एएमसी लिमिटेड’चा होता. त्याचा बंद भाव त्यासमयी १,९४७ रुपये होता व वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर १,८०० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर १,८०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २,१०० रुपये व त्यानंतर २,३०० ते २,५०० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. एचडीएफसी एएमसीचा प्रत्यक्ष निकाल उत्कृष्ट असल्याने अतिशय सहजगत्या २,५०० रुपयांचे इच्छित वरचे लक्ष्य ३० ऑगस्टला साध्य करून, अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना अवघ्या दीड महिन्यात २८ टक्क्यांचा घसघशीत परतावा मिळविला. आजही दीड महिन्यानंतर, ‘एचडीएफसी एएमसी’चा बाजारभाव ( शुक्रवारचा बंद भाव ) हा २,५०० रुपयांवर आहे, जो ५२ आठवडय़ांचा उच्चांकी भाव दर्शवत आहे.

आज राष्ट्रीयीकृत बँकांमधील ठेवींवर वार्षकि सहा ते सात टक्के व्याज मिळते. व इथे ज्यांनी वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर टीसीएस, एचडीएफसी एएमसीचे समभाग खरेदी करून वरच्या लक्ष्यापर्यंत राखून ठेवले, ते गुंतवणूकदार आज बाप्पांच्या स्वागतोत्सवात आनंदाने सहभागी झाले म्हणायला हरकत नाही.

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. – ashishthakur1966@gmail.com

First Published on September 2, 2019 2:31 am

Web Title: bse nse nifty sensex akp 94
Next Stories
1 बाजार सावरला अखेर
2 किमान दोन तिमाही वाट पाहावी लागेल..
3 विद्या वैभव दे रे राम!
Just Now!
X