21 November 2019

News Flash

वाटचाल अर्थसंकल्पानंतर!

|| आशीष ठाकूर इंधनाचे चढे दर, अर्थसंकल्पाकडून वारेमाप अपेक्षा व त्या पुऱ्या झाल्या नाहीत की बाजाराचे कोसळणे.. हे गेल्या लेखातील वाक्याचा अनुभव आपण सरलेल्या शुक्रवारी

|| आशीष ठाकूर

इंधनाचे चढे दर, अर्थसंकल्पाकडून वारेमाप अपेक्षा व त्या पुऱ्या झाल्या नाहीत की बाजाराचे कोसळणे.. हे गेल्या लेखातील वाक्याचा अनुभव आपण सरलेल्या शुक्रवारी झालेल्या पडझडीतून घेतला. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३९,५१३.३९ / निफ्टी : ११,८११.२०

गेल्या शुक्रवारी अर्थसंकल्प सादर झाल्यावर सेन्सेक्स ४०० अंशांनी व निफ्टी १३० अंशांनी कोसळल्यामुळे भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निराशाजनक घटनांचा ल.सा.वि. सेन्सेक्सवर ३८,५०० ते ३८,००० व निफ्टीवर ११,५५० ते ११,४५० असा असेल. या घसरणीचा फायदा तेजीत सहभागी होण्याची संधी हुकलेल्या गुंतवणूकदारांना घेता येईल. त्यांना शिल्लक असलेली अर्धी रक्कम गुंतवण्याची संधी प्राप्त होईल.  आगामी तिमाही निकालाकडे..

१) टीसीएस :

तिमाही निकालाची तारीख- मंगळवार, ९ जुलै

शुक्रवार ५ जुलचा बंद भाव – २,१६३.१० रु.

निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,१०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : संचालक मंडळाचा भविष्याविषयी आशावादी दृष्टिकोन, या पाश्र्वभूमीवर समभागाचा बाजारभाव २,१०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,३०० रुपये. भविष्यात २,३०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २,५०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २,१०० ते २,२०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : २,१०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम २,००० व नंतर १,९०० रुपयांपर्यंत घसरण

) इन्फोसिस टेक्नॉलॉजीज

तिमाही निकालाची तारीख- शुक्रवार, १२ जुल

शुक्रवार ५ जुलचा बंद भाव – ७१८ रुपये.

निकालापश्चात महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ७२० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७२० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ७६० रुपये. भविष्यात ७६० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ८०० ते ८२० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ७२० ते ७६० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ७२० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम ६७० व त्यानंतर ६५० रुपयांपर्यंत घसरण.

) डीएचएफएल

  • तिमाही निकालाची तारीख – शनिवार, १३ जुलै
  • शुक्रवार ५ जुलचा बंद भाव – ८०.२० रुपये

एकेकाळची गृहकर्ज क्षेत्रातील आघाडीची प्रतिथयश कंपनी. वर्षभरापूर्वी हा समभाग ६४० रुपयांवर होता हे सांगून खोटे वाटेल, भाव कोसळायला लागल्यावर समभाग अर्ध्या किमतीत, स्वस्तात मिळतो म्हणून खरेदी, समभाग खरेदी केल्यावर आणखी स्वस्त झाला म्हणून पुन्हा खरेदी (अ‍ॅव्हरेज) त्यामुळे या समभागात सामान्य गुंतवणूकदार निश्चितच जास्त संख्येने अडकले आहेत. डीएचएफएल समभागाचा बाजारभाव ६४० रुपयांवरून ८० रुपयांवर आल्यामुळे समभागाची आर्थिक प्रकृती तोळामासाच आहे. त्यामुळे डीएचएफएलचा तिमाही निकाल हा वैद्यक परिभाषेतच समजून घ्यावा लागेल.

अ) वित्तीय निकाल जाहीर झाल्यावर बाजारभाव ७५ ते १०० रुपयांमध्ये – समभागाची प्रकृती स्थिर

ब) बाजारभाव ७५ ते ५० रुपयांपर्यंत घसरण – समभागाची प्रकृती जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेन्टिलेटरवर)

क) समभागाचा बाजारभाव ५० रुपयांखाली- नाकावर सूत  (कोमा स्थिती)

भविष्यात कंपनीच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्यास, म्हणजे ‘दवा नही दुवा’ कामाला आल्यास समभागाचा बाजारभाव १३० रुपयांवर स्थिर राहील. भविष्यात बाजारभाव सातत्याने १३० रुपयांवर टिकल्यास १७५ रुपयांचे वरचे लक्ष्य.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on July 7, 2019 6:05 pm

Web Title: bse nse nifty sensex mpg 94 2
Just Now!
X