|| आशीष ठाकूर

सर्व निराशाजनक घटनांचा ल.सा.वि. सेन्सेक्सवर ३८,५०० व निफ्टीवर ११,४५० असा असेल, हे या स्तंभात मागेच सांगण्यात आले आहे. त्याची प्रचीती गेल्या सोमवारी पाच लाख कोटी रुपयांचा चुराडा करत, सेन्सेक्सने ३८,५०० व निफ्टीने ११,४५० ची खालची पातळी गाठून दिले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३८,७३६.२३

निफ्टी : ११,५५२.५०

जूनच्या पहिल्या सप्ताहात जेव्हा सेन्सेक्स ४०,३०० व निफ्टी १२,१०० च्या उच्चांकाच्या शिखरावर असताना – तांत्रिक आलेख मात्र बरोबर उलट स्पष्ट मंदीचे संकेत देत होते. त्यामुळे गुतंवणूकदारांना सावध करण्याची गरज होती. अन्यथा नेहमीप्रमाणे तेजीच्या भारावलेल्या वातावरणात उच्चांकासमीप गुंतवणूक करून नंतर तोटा, निराशा, अपेक्षाभंग होण्यापेक्षा, नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांची गुंतवणूक केल्याने, सध्याची मंदी ही चांगल्या प्रतीचे समभाग खरेदी करण्याची सुवर्णसंधी ठरत आहे. जुलै अखेपर्यंत निर्देशांकाची वाटचाल ही सेन्सेक्सवर ३९,५०० व निफ्टीवर ११,८०० असेल. हा स्तर पार करण्यास निर्देशांक अपयशी ठरल्यास निर्देशांक पुन्हा सेन्सेक्सवर ३८,४०० व निफ्टीवर ११,४५० पर्यंत खाली येऊ शकतो. हा स्तरदेखील तोडल्यास निराशाजनक घटनांचा म.सा.वि. हा सेन्सेक्सवर ३७,५०० ते ३७,००० व निफ्टीवर ११,३०० ते ११,१०० असा असेल.

आजही आपण तेजीच्या बाजारात आहोत यावर श्रद्धा ठेवा, पण गुंतवणूक मात्र सबुरीनेच करा.

निकाल हंगामाचा वेध..

१) एचडीएफसी एएमसी लिमिटेड

  • तिमाही निकाल तारीख – मंगळवार, १६ जुलै
  • १२ जुलैचा बंद भाव – १,९४७.१५ रुपये
  • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,८०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,१०० रुपये. भविष्यात २,१०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २,३०० ते २,५०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १,८०० ते २,००० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : १,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम १,६५० व त्यानंतर १,५०० रुपयांपर्यंत घसरण.

२) येस बँक        

  • तिमाही निकाल तारीख- बुधवार, १७ जुलै.
  • शुक्रवार, १२ जुलैचा बंद भाव – ९४.१५ रुपये
  • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ८५ रुपये

अ) उत्कृष्ट निकाल :  समभागाकडून ८५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १२० रुपये. भविष्यात १२० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ८५ ते १२० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ८५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम ७० व त्यानंतर ५० रुपयांपर्यंत घसरण.

३) एचडीएफसी बँक

  • तिमाही निकाल तारीख – शनिवार, २० जुलै
  • १२ जुलैचा बंद भाव – २,३९३.४५ रुपये
  • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,४०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल :  समभागाकडून २,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,५०० रुपये. भविष्यात २,५००  रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २,६०० ते २,८००  रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २,४०० ते २,५०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : २,४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम २,२०० व त्यानंतर २,००० रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.