13 December 2019

News Flash

पोशिंदेच हवालदिल

अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्सवर २,६०० अंशांचा आणि निफ्टीवर ८७० अंशांचा घातक उतार गुंतवणूकदारांनी अनुभवला आहे.

|| आशीष ठाकूर

अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्सवर २,६०० अंशांचा आणि निफ्टीवर ८७० अंशांचा घातक उतार गुंतवणूकदारांनी अनुभवला आहे. आता तरी निर्देशांकांनी तळ गाठला का? नसल्यास निर्देशांक आणखी किती कोसळणार, निर्देशांकात भरीव सुधारणा कधी होणार, या गुंतवणूकदारांच्या मनातील विविध प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ३७,८८२.७९   निफ्टी : ११,२८४.३०

शिवचरित्रात अजरामर झालेल्या पावनिखडीतील प्रसंगात शिवभक्त बाजीप्रभू देशपांडेचे ऐतिहासिक वाक्य..‘‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये.’’

आपल्याकडे बाजाराचे पोशिंदे म्हणजे परदेशी गुंतवणूकदार संस्था व अतिउच्च उत्पन्न गटात मोडणारे गुंतवणूकदार. या पोशिंद्यांवर अर्थसंकल्पात वाढीव कर आकारणी केल्यामुळे त्यांनी बाजारात विक्रीचा मार्ग अवलंबला. त्यामुळे आज आपण बाजारात घातक उतार अनुभवत आहोत. येणाऱ्या दिवसात एक क्षीण स्वरूपाची सुधारणा ही सेन्सेक्सवर ३८,६०० आणि निफ्टीवर ११,५०० असेल. या क्षीण सुधारणेनंतर पुन्हा मंदीच आवर्तन सुरू होऊन, निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,००० आणि निफ्टीवर ११,१०० असेल. हा स्तर निर्देशांकांनी राखण्याची नितांत गरज आहे, अन्यथा मंदीची परिसीमा सेन्सेक्सवर ३४,५०० आणि निफ्टीवर १०,३०० असेल.

निकाल हंगामाचा वेध..

१) अ‍ॅक्सिस बँक

 • तिमाही निकालाची तारीख – मंगळवार, ३० जुल
 • शुक्रवार २६ जुलचा बंद भाव – ७२९.८५ रुपये
 • निकालानंतर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ७०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ७६० रुपये. भविष्यात ७६० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ८०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ७०० ते ७६० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ७०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ६५० रुपयांपर्यंत घसरण.

२) हीरो मोटोकॉर्प

 • तिमाही निकालाची तारीख – मंगळवार, ३० जुल
 • शुक्रवार २६ जुलचा बंद भाव – २,४६७.३० रुपये
 • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,३५० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,३५० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २,६०० रुपये. भविष्यात २,६०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २,७५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २,३५० ते २,६०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : २,३५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम २,२५० व त्यानंतर २,०५० रुपयांपर्यंत घसरण.

३) टाटा ग्लोबल बीव्हरेजेस लिमिटेड

 • तिमाही निकालाची तारीख – बुधवार, ३१ जुल
 • शुक्रवार २६ जुलचा बंद भाव – २५८.३५ रुपये
 • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २५० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २५० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २६५ रुपये. भविष्यात २६५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २८० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २५० ते २६५ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : २५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २२० रुपयांपर्यंत घसरण.

४) आयटीसी लिमिटेड

 • तिमाही निकालाची तारीख – शुक्रवार, २ ऑगस्ट
 • शुक्रवार २६ जुलचा बंद भाव – २७०.४० रुपये
 • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २६० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २६० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २८० रुपये. भविष्यात २८० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ३१० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २६० ते २८० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : २६० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २३० रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on July 29, 2019 12:53 am

Web Title: bse nse nifty sensex mpg 94 5
Just Now!
X