13 December 2019

News Flash

धूळधाण आणि अपेक्षित सुधारणा

तिमाही निकालाची तारीख - मंगळवार, १३ ऑगस्ट ६ शुक्रवारचा बंद भाव - २०७.६५ रुपये 

|| आशीष ठाकूर

या स्तंभातील गेल्या दोन लेखांमधून, ‘सेन्सेक्स’वर ३६,००० आणि ‘निफ्टी’वर १०,८०० स्तरांचा आधार घेत बाजारात सुधारणा होईल, असे सूतोवाच केले होते. ते आता प्रत्यक्षात येत आहे. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३७,५८१.९१

निफ्टी : ११,१०९.६५

आज आपण बाजारात जी सुधारणा चालू आहे तिचे स्वरूप हे शाश्वत तेजीचे आहे की क्षीण स्वरूपाची सुधारणा ते आज जाणून घेऊया.

शाश्वत तेजीसाठी सेन्सेक्सने ३७,२०० आणि निफ्टीने ११,१५० चा स्तर राखत सेन्सेक्स ३८,८०० आणि निफ्टी ११,६०० च्या स्तरावर सातत्याने १५ व्यवहार होणाऱ्या दिवसांत टिकणे नितांत गरजेचे आहे.

असे घडल्यास बाजार मंदीच्या विळख्यातून बाहेर आला असे समजण्यास हरकत नाही. अन्यथा आता चालू असलेल्या सुधारणेतून सेन्सेक्स ३८,००० आणि निफ्टी ११,४५० असे स्तर निर्देशांक ओलांडण्यास अपयशी ठरल्यास पुन्हा मंदीचे आवर्तन सुरू होऊन सेन्सेक्स ३६,००० ते ३५,००० आणि निफ्टी १०,८०० ते १०,५०० पर्यंत खाली घसरू शकतो.

निकाल हंगामाचा वेध..

१) कोल इंडिया लिमिटेड

 • तिमाही निकालाची तारीख – मंगळवार, १३ ऑगस्ट ६ शुक्रवारचा बंद भाव – २०७.६५ रुपये
 • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १९० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १९० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २४० रुपये. भविष्यात २४० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २७० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १९० ते २४० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : १९० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १५० रुपयांपर्यंत घसरण.

 

२) ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड

 • तिमाही निकालाची तारीख – मंगळवार, १३ ऑगस्ट
 • शुक्रवारचा बंद भाव – ४२३.७० रुपये
 • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ४०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ४६५ रुपये. भविष्यात ४६५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ५०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ४०० ते ४६५ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ४०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३५० रुपयांपर्यंत घसरण.

 

३) सन फार्मास्युटिकल्स लिमिटेड 

 • तिमाही निकालाची तारीख – मंगळवार, १३ ऑगस्ट
 • शुक्रवारचा बंद भाव – ४२१.९० रुपये
 • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ४०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ४५० रुपये. भविष्यात ४५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ५३० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ४०० ते ४५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : ४०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३६५ रुपयांपर्यंत घसरण

 

४) आयडीएफसी लिमिटेड

 • तिमाही निकालाची तारीख – बुधवार, १४ ऑगस्ट
 • शुक्रवारचा बंद भाव – ३३.३० रुपये
 • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ३८ रुपये. भविष्यात ३८ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४५ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : ३० ते ३८ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : ३० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २० रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on August 12, 2019 12:19 am

Web Title: bse nse nifty sensex mpg 94 7
Just Now!
X