|| आशीष ठाकूर

गेल्या आठवडय़ात झालेल्या तीन दिवसांच्या व्यवहारात, एक दिवस तेजीचा तर दुसरा मंदीचा राहिला. निर्देशांकात तेजीच्या दिवसात जितक्या अंशांची वाढ झालेली असायची ती दुसऱ्या दिवशी लुप्त होऊन तितक्याच अंशांची घसरण, तर तिसऱ्या दिवशी पुन्हा तेजी. अशी तेजी-मंदीची संगीतखुर्ची गेल्या आठवडय़ात चालू होती. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ३७,३५०.३३ / निफ्टी: ११,०४७.८०

गेल्या बुधवारी अमेरिकेच्या भांडवली बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ ८०० अंशांनी कोसळल्यामुळे, ‘आता सर्व काही संपले’ असेच वाटत असताना,शुक्रवारच्या दिवशी निर्देशांकांत खालच्या स्तरावरून सुधारणा झाली. त्यामुळे गेल्या लेखातील बाजारातील सुधारणा ही.. क्षणिक की शाश्वत हाच प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने, तो आज बारकाईने तपासून पाहूया.

आजच्या घडीला निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ३६,४०० आणि निफ्टीवर १०,८०० चा स्तर सातत्याने राखल्यास सेन्सेक्सचे वरचे लक्ष्य ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१०० असेल. उपरोक्त स्तर निर्देशांकांनी भविष्यात सातत्याने राखल्यास सेन्सेक्सवर ३७,९०० ते ३८,२०० आणि निफ्टीवर ११,३०० ते ११,४०० हे क्षणिक सुधारणेचे वरचे लक्ष्य असेल.

शाश्वत तेजीसाठी मात्र निर्देशांकांनी, सेन्सेक्सवर सातत्याने ३८,८०० आणि निफ्टीवर ११,६०० च्या स्तरावर तग धरणे नितांत गरजेचे आहे.

क्षणिक सुधारणेत सेन्सेक्सवर ३७,९००आणि निफ्टीवर ११,३०० च्या स्तरावर निर्देशांक टिकण्यात अपयशी ठरल्यास, निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३५,२०० ते ३४,३०० आणि निफ्टीवर १०,५०० ते १०,३०० असे असेल.

निकाल हंगामाचा वेध..

१) प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल हेल्थकेअर लि.

  • तिमाही निकालाची तारीख – बुधवार, २१ऑगस्ट
  • शुक्रवारचा बंद भाव – १०,२८५ रुपये
  • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १०,२०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १०,२०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १०,७५० रुपये. भविष्यात १०,७५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ११,२०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १०,२०० ते १०,७५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : १०,२०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९,७०० रुपयांपर्यंत घसरण

 

२) केनामेटल इंडिया लिमिटेड

  • तिमाही निकालाची तारीख – गुरुवार, २२ ऑगस्ट
  • शुक्रवारचा बंद भाव – ९६१.६५ रुपये
  • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ९२५ रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९२५ रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,०५० रुपये. भविष्यात १,०५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,२५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ९२५ ते १,०५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : ९२५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८७० रुपयांपर्यंत घसरण

 

३) जिलेट इंडिया लिमिटेड

  • तिमाही निकालाची तारीख – गुरुवार, २२ ऑगस्ट
  • शुक्रवारचा बंद भाव – ७,०६६.९० रुपये
  • निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६,८०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६,८०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ७,३०० रुपये. भविष्यात ७,३०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ७,५०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ६,८०० ते ७,३०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : ६,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६,६५० रुपयांपर्यंत घसरण.

 

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.