28 February 2021

News Flash

माझा पोर्टफोलियो : गुंतवणुकीतील आवश्यक ‘बेअरिंग प्रतिबल’

तिमाहीत कंपनीने ८१८.७२ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली असून ती गेल्या तिमाहीच्या तुलनेत १५.७ टक्कय़ांनी जास्त आहे.

|| अजय वाळिंबे

जगातील सर्वात मोठी बेअरिंग उत्पादक, ११४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली कंपनी ‘एबी एसकेएफ’ची भारतातील उपकंपनी एसकेएफ इंडिया लिमिटेड होय. १९२३ मध्ये भारतात स्थापन झालेली एसकेएफ इंडिया ही रोलिंग बेअरिंग आणि सीलची अग्रगण्य जागतिक पुरवठा करणारी भारतातील आघाडीची कंपनी बनली आहे. विविध प्रकारच्या उत्पादनांसह एसकेएफ, बेअरिंग्ज उत्पादनांव्यतिरिक्त सिस्टीम / सब-सिस्टीम आणि सोल्युशन प्रोव्हायडर कंपनी म्हणून गणली जाते. एसकेएफ समूहाचे अस्तित्व जगभरातील १३० हून अधिक देशांमध्ये असून कंपनीची जगभरात १५,००० वितरण केंद्रे आहेत.

२३ वर्षांपूर्वी कर्नाटकातील मैसूर येथे स्थापित केलेली एसकेएफ सीलिंग सोल्युशन्स (आता एसकेएफ टेक्नॉलॉजीज (इंडिया) लिमिटेड) ग्राहकांना ऑटोमोटिव्ह, इंडस्ट्रियल आणि बेअरिंग्ज या तीन विभागांमध्ये सेवा पुरविते. एसकेएफ सीलिंग सोल्युशन्सचे अहमदाबाद आणि मैसूर येथे उत्पादन प्रकल्प असून कंपनीने अधिग्रहण केलेल्या लिंकन हेलिओजचा ल्युब्रिकेशन प्रकल्प बंगळूरु येथे आहे. याखेरीज एसकेएफ इंडियाचे भारतात बंगळूरु, हरिद्वार आणि पुणे येथे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीची भारतात ११ विक्री / विपणन केंद्रे असून उत्पादने आणि सेवा पुरवण्यासाठी देशभरात ३०० वितरक आहेत.

कंपनीने डिसेंबर २०२० अखेर संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल नुकतेच जाहीर केले असून अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी कंपनीने करून दाखवली आहे. यंदाच्या तिमाहीत कंपनीने ८१८.७२ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली असून ती गेल्या तिमाहीच्या तुलनेत १५.७ टक्कय़ांनी जास्त आहे. तर नक्त नफ्यात तब्बल १५०.३ टक्के वाढ होऊन तो १२८.११ कोटी रुपयांवर गेला आहे.

उत्तम कामगिरीमुळे सध्या कंपनीच्या समभागाचे मूल्य ५२ आठवडय़ांच्या उंचीवर आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या कामकाजावर होईल, अशी अपेक्षा आहे. सध्याच्या बाजारभावाला एसकेएफ थोडा महाग वाटत असला तरीही कुठलेही कर्ज नसलेल्या या बहुराष्ट्रीय कंपनीकडून भरीव अपेक्षा आहेत. त्यामुळे संधी मिळताच ‘पोर्टफोलियो’साठी दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून एसकेएफ खरेदीचे धोरण ठेवावे.

एसकेएफ इंडिया लिमिटेड

(बीएसई कोड – ५00४७२)

शुक्रवारचा बंद भाव : रु. २,३१९/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु.२५१४/१२३७

बाजार भांडवल : रु. ११,३७१ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ४९.४४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५२.५८

परदेशी गुंतवणूकदार    ६.५३

बँक/ म्यु. फंड/ सरकार २८.११

इतर/ जनता     १२.७८

 

संक्षिप्त विवरण

* शेअर गट     : मिड कॅप

* प्रवर्तक        : एबी एसकेएफ, स्वीडन

* व्यवसाय क्षेत्र : बेअरिंग्स

* पुस्तकी मूल्य          : रु. २६८

* दर्शनी मूल्य : रु. १०/-

* लाभांश       : १,३००%

 

सूचना :१. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कं पनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्धमाहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कं पनीशी लेखकाचा कु ठलाही संबंध नसून त्याने कं पनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कं पनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 12:05 am

Web Title: bse stock market essential bearing strengths of the investment akp 94
Next Stories
1 विमा.. सहज, सुलभ : विमा क्षेत्राला गतीचे इंधन
2 फंडाचा ‘फंडा’.. : कर सुधार प्रस्तावाचा लाभार्थी
3 रपेट बाजाराची : तेजीची पकड कायम
Just Now!
X