मागे याच सदरात आपण कॉलचा तेजीचा स्प्रेड (बुल स्प्रेड ऑफ कॉल्स) बाबतच्या नियमांचा सविस्तर अभ्यास केला होता. आज पुटचा तेजीचा स्प्रेड (बुल स्प्रेड ऑफ पुट्स) या  डावपेचांचा आपण अभ्यास करणार आहोत.
स्प्रेड (spreads)
स्प्रेड का घ्यावा हे मी मागील अभ्यासवर्गात समजावून सांगितले आहे. प्रबळ मंडळी, ऑपरेटर्स यांना सर्वसामान्य लोकांची तोटा सहन करण्याची व धोका पत्करण्याची क्षमता खूप कमी असते हे माहित असते. त्यामुळे बाजाराला थोडे फार जरी वर खाली केले तरी सर्वसामान्य लोकांना तोटा सहन करून बाहेर पडावे लागते.
स्प्रेड म्हणजे धोका विभाजित करणे व धोका प्रसारीत करणे. स्प्रेड हे असे डावपेच आहेत कीज्यामध्ये संभाव्य तोटा म्हणजेच धोका प्रसारित करता येतो. म्हणजे मला नफा कमी झाला तरी चालेल पण माझा तोटा माझ्या क्षमतेच्या आत असला पाहिजे. स्प्रेड घेणे म्हणजे एखाद्या शेअर्सच्या विकल्प साखळीतील कोणत्या तरी एका स्ट्राईकचा कॉल किंवा पुट विकत घेणे आणि त्याच शेअर्सच्या विकल्प साखळीतील दुसऱ्या कोणत्या तरी एका स्ट्राईकचा कॉल किवा पुट विकणे.
खूप वेळा निर्देशांक/शेअर्स वर जाईल किंवा खाली जाईल हे कळत नाही. तिथी ऱ्हासामुळे (टाईम डीके) अधिमूल्याचा (प्रिमीअम)चा दिवसागणिक ऱ्हास होतो व खरेदीदारांना नुकसान होते व विक्रेत्यांना त्याच गोष्टीचा फायदा होतो. पण अस्थिरता (५’ं३्र’्र३८) वाढल्यास फायदा होतो व विक्रेत्यांना त्याच गोष्टीमुळे (अस्थिरता वाढल्यास) नुकसान होते. या सगळया गोष्टीचा विचार करता मला कमी लाभ झाला तरी चालेल पण माझे कॅपिटल / गुंतवणूक सुरक्षित राहावी असा विचार हा योग्य विचार आहे असे माझे प्रांजळ मत आहे.
माझा दृष्टीकोन तेजीचा आहे. परंतु मला धोका पत्करायचा नसल्याने व बाजारातील मोठय़ा मंडळीपासून सुरक्षित राहावयाचे असल्याने, कॉलचा तेजीचा स्प्रेड मी घेऊ शकतो.परंतु पुटचा वापर करूनही मी तेजीचा स्प्रेड माझ्या फायद्यासाठी वापरात आणू शकतो.
कॉलचा वापर करून तेजीचा स्प्रेड करणे व पुटचा वापर करून तेजीचा स्प्रेड करणे यात फरक काय? असा रास्त प्रश्न वाचकांना पडणे स्वाभाविक आहे.
बाजार वर जाईल तरच या दोन्ही डावपेचांमध्ये आíथक लाभ होईल. हा या दोन्ही डावपेचांमधला समान मुद्दा आहे. परंतु दोन्ही प्रकारांमध्ये खालील प्रमाणे ठळक फरकही आहे.
कॉलच्या तेजीच्या स्प्रेडमध्ये आपण एटीएम किंवा बाजार भावाजवळचा कॉल खरेदी करतो व त्याच वेळी बाजार भावापासून दूरचा पण ओटीएम कॉल विकतो.
पुटच्या तेजीच्या स्प्रेडमध्ये आपण एटीएम किंवा बाजार भावाजवळचा पुट विकतो व त्याचवेळी बाजार भावापासून दूरचा पण ओटीएम पुट विकत घेतो.
कॉलच्या तेजीच्या स्प्रेडमध्ये खरेदी करावयाचा एटीएम कॉल महाग असल्याने व दूरचा कॉल स्वस्त असल्याने आपला खर्च जास्त व मिळकत कमी म्हणजेच खर्चापेक्षा मिळकत कमी असल्याने आपल्या खात्यातून एकंदर रक्कम जास्त जात असते. त्यामुळे हा डेबिट स्प्रेड बनतो. या  स्प्रेडमध्ये गुणोत्तर सकारात्मक असतो म्हणजे या डावपेचामध्ये कमीत कमी तोटा जो असतो त्या तोटय़ापेक्षा जास्तीत जास्त संभाव्य नफा खूप जास्त असतो.
पुटच्या तेजीच्या स्प्रेडमध्ये विकत असलेला एटीएम पुट महाग असल्याने व दूरचा ओटीएम पुट स्वस्त असल्याने आपली मिळकत जास्त व खर्च कमी म्हणजे खर्चापेक्षा मिळकत जास्त असल्याने खात्यात एकंदर रक्कम जमा होते. त्यामुळे हा क्रेडीट स्प्रेड बनते. या  स्प्रेडमध्ये नफा तोटा गुणोत्तर नकारात्मक असतो म्हणजे या  डावपेचांमध्ये कमीत कमी तोटा जो असतो त्या तोटय़ापेक्षा संभाव्य कमाल नफ्याचे प्रमाण कमी असते.
जेव्हा दीर्घ कालावधीची दिशा तेजीची असताना अचानक अल्प कालावधीसाठी मंदी आली असता अथवा तेजीच्या दिशेनेच बाजार जाईल असे वाटत असता कॉलच्या तेजीच्या स्प्रेडपेक्षा पुटच्या तेजीचा स्प्रेड जास्त लाभदायक ठरतो. कारण अचानक तेजीमुळे एटीएमचा कॉल तसेच एटीएम चा पुट या  दोघांचीही ध्वनित अस्थिरता वाढलेली असेल व त्यामुळे कॉल व पुटचे भाव म्हणजे अधिमूल्य वाढलेले असतील. तेव्हा महाग एटीएम कॉल विकत घेण्यापेक्षा महाग एटीएम पुट विकणे सोयीस्कर होईल.

पुटचा तेजीचा स्प्रेड
आजच्या उदाहरणात पुटचा वापर करणार असल्याने त्या स्प्रेडला पुटचा तेजीचा स्प्रेड म्हणू आणि वर म्हटल्याप्रमाणे या  स्प्रेडमध्ये मिळकतीपेक्षा खर्च कमी असल्याने हा क्रेडिट स्प्रेड आहे.
केव्हा घ्यावा:
जेव्हा एखादा शेअरवर जाणार आहे व आत्ताच्या भावाच्या खाली नकी जाणार नाही असे वाटत असेल तर आत्ताच्या बाजार भावाजवळचा एटीएम स्ट्राईकचा पुट विकावा व खालच्या पातळीवरचा ओटीएम पुट खरेदी करावा. या डावपेच्यामध्ये खालील फायदे असतात.
खरेदी करताना द्यावे लागणारे अधिमूल्य व विकलेल्या ऑप्शन्सच्या मिळालेल्या अधिमूल्यामुळे एकंदरीत खर्च कमी होतो. खरेदी व विक्री केलेल्या ऑप्शन्ससाठी ग्रीक्स जसे डेल्टा, वेगा, थीटा इत्यादीचा परिणाम परस्परविरोधी असल्याने एकंदरीत परिणाम नगण्य होतो. परंतु, १०० % शून्य होत नाही. कारण मनीनेसनुसार प्रत्येक स्ट्राईकचे ग्रीकचे मूल्य कमी जास्त होत असते.
नफा :
जास्तीत जास्त एकंदर निव्वळ मिळकत ही दिलेला प्रिमिअम वजा घेतलेला प्रिमिअम होय.
तोटा:
जास्तीत जास्त दोन स्ट्राईकमधला फरक वजा एकंदर मिळकत. कारण खरेदी केलेले ऑप्शन्स अमर्याद नफा देतील, पण विकलेला स्ट्राईक अमर्याद तोटाही देईल.
केव्हा बाहेर पडावे:
बाजारामध्ये मंदीचा कल / बेअरिशनेस दाखवल्यास व तशी खात्री झाली असल्यास तात्काळ बाहेर पडावे. तसेच फायदा होत असल्यास फायदा घेऊन अथवा तोटा बुक करून बाहेर पडावे. किंवा अगोदरच ठरवलेला तोटा किंवा फायदा झाल्यास बाहेर पडावे.

उदाहरण
मी दिनांक ४ सप्टेंबर २०१५ रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया या शेअर्सचा अभ्यास केला असता, तांत्रिक दृष्टीकोनातून मला असे दिसते की, तो शेअर खूप खाली पडलेला आहे. पुढे तांत्रिक विश्लेषणावरून त्या शेअर्समध्ये तेजी संभवत असल्याचे दिसून येते. परंतु मला कोणताही धोका घ्यावयाचा नसल्याने मी स्टेट बँक ऑफ इंडियामधील पुटचा बुल स्प्रेड घेण्याचा विचार केला.
मी डेल्टा, थीटा, गॅमा, वेगा इत्यादीचा अभ्यास केला व नजीकच्या काळात आणखी तो २२५ रुपयांच्या खूप खाली जाणार नाही याचा अंदाज घेऊन मी २२५च्या स्ट्राईकचा पुट विकण्याचा निर्णय घेतला व ओटीएम पुट २००चा खरेदी केला.
लक्षात ठेवावे
खालील महत्वाचे नियम वाचकांनी लक्षात घ्यावेत.
१. दिशा मंदीची वाटत असल्यास हा स्प्रेड घेऊ नये.
२. नुकसान रोधक (स्टॉप लॉस) लावावाच. व कमीतकमी नवशिक्या लोकांनी दोन्ही विकल्पामधून या पातळीवर पोहचल्यासरशी बाहेर पडावे
info@primetechnicals.com