आजच्या भागात समीर दाते (३१) व सुखदा भावे दाते (३१) यांचे आíथक नियोजन जाणून घेऊ. समीर व सुखदा हे दोघेही सनदी लेखापाल आहेत. ते दोघे डिसेंबर २०११ मध्ये विवाहबद्ध झाले. ऑक्टोबर २०१२ मध्ये ८५ लाख खर्च करून गृहखरेदी केली. त्यासाठी त्यांनी एचडीएफसीकडून ७० लाखांचे गृहकर्ज घेतले. सुखदा या टाटा मोटर्समध्ये तर समीर हे टाटा समूहाच्या एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या वेतनातून प्रत्येकी ३५,००० रुपयांची गृहकर्जफेड होत आहे. सुखदा यांनी जीवन सरल व जीवन तरंग या दोन एलआयसीच्या योजना खरेदी केल्या आहेत. तर समीर यांनी जीवन सरल, जीवन किरण व जीवन आनंद या तीन योजना खरेदी केल्या आहेत. या योजनांद्वारे सुखदा यांना ८ लाखांचे तर समीर यांना १० लाखांचे विमाछत्र लाभले आहे. सुखदा व समीर यांनी पाच लाख रुपये बँकांच्या ठेवींमध्ये गुंतवणूक केली आहे.
सुखदा व समीर यांनी त्यांच्याशी झालेल्या संभाषणात प्रामुख्याने तीन वित्तीय ध्येये सांगितली. पहिले येत्या सप्टेंबरमध्ये त्यांचे बाळ गृहप्रवेश करेल तेव्हा प्रसूतिगृहातून येताना स्वत:च्या चारचाकी वाहनाने यावे, अशी समीर यांची इच्छा आहे. दुसरे ध्येय म्हणजे येणाऱ्या बाळाच्या शिक्षणासाठी तरतूद करणे. तिसरे म्हणजे समीर व सुखदा यांच्या निवृतीपश्चात खर्चाची तरतूद करणे.
सुखदा व समीर यांना सल्ला
अनेकजण जी चूक करतात ती सुखदा व समीर यांनीदेखील केली आहे. आíथक नियोजनाची सुरुवात पीपीएफ खाते उघडून करणे हे कधीही उत्तम समजले जाते. परंतु तुमच्यासारख्या उत्तम शैक्षणिक पात्रता असलेल्या नोकरदारांना गलेलठ्ठ पगार मिळतो व नोकरीच्या पहिल्या वर्षांपासूनच त्यांचे उत्पन्न करपात्र असते. घरातील वडील मंडळींच्या दबावाखाली व विमा विक्रेत्यांच्या आग्रहाला बळी पडून एखादी गरज नसलेली विमा योजना खरेदी केली जाते. सुखदा व समीर यांना त्यांचे पहिले वित्तीय लक्ष्य महिन्याभरात गाठायचे आहे. आपल्या पसंतीच्या मोटारीची मागणी नोंदविल्यापासून सात ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्याआधी बँकेच्या कर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. हे ध्यानात घेऊन गाडी किमान २६ ऑगस्ट रोजी ताब्यात येईल हे पाहावे लागेल. म्हणून निदान १० ते १२ ऑगस्ट रोजी बँकेत कर्जासाठीचा अर्ज व कागदपत्रांची पूर्तता करावी. तीन वष्रे मुदतीचे कर्ज घेतल्यास २०,००० रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. गृहकर्ज पुरवठादार संस्था व राष्ट्रीयीकृत बँका यांच्या व्याज आकारणीच्या सूत्रात फरक आहे व तुमची कर्जफेडीची १८ वष्रे शिल्लक आहेत. म्हणून ढाच्यात सुखदा व समीर यांना त्यांचे दुसरे लक्ष्य व तिसरे लक्ष्य एकदमच गाठायचे आहे. नवीन वाहन घेतल्यामुळे एका बाजूला तुमची रोकड सुलभता कमी होणार आहे. कदाचित प्रसूतीनंतर काही काळ सुखदा यांना विनावेतनही रजेवर राहावे लागेल. म्हणून त्यांच्या वाटय़ाच्या किमान तीन हप्त्यांची तरतूद करा. तुम्ही दोघांनीही घेतलेल्या विमा योजना या पारंपरिक प्रकारच्या आहेत. त्या महाग असल्यामुळे त्यांचा परताव्याचा दरही कमी असतो. सुखदा व समीर यांनी या योजनांचा हप्ता भरणे बंद करून सोबतच्या चौकटीत दिलेल्यापकी कोणत्याही एका कंपनीची मुदतीची विमा योजना खरेदी केल्यास हप्त्यानुसार वार्षकि ५०,००० ते १ लाखापर्यंतची बचत होऊ शकेल. सध्या जरी फारशी रोकड सुलभता नसली तरी सुखदा व समीर यांनी त्यांचे पीपीएफ खाते उघडणे गरजेचे आहे. सुखदा व समीर यांनी नवीन मुदतीचा विमा खरेदी केल्यास संभाव्य बचत गुंतविण्यासाठी अथवा भविष्यात रोकड सुलभता वाढल्यावर या खात्याचा कर बचतीसाठी वापर करता येऊ शकेल. सुखदा व समीर यांच्या घरात येणारा नवीन पाहुण्याचे आगमन लक्षात घेता सध्या त्यांना मोठी रोकड हाताशी असणे जरुरीचे आहे. म्हणून सुखदा व समीर यांना अन्य बचत पर्याय सुचविण्यात आलेले नाहीत. योग्य वेळी त्यानी गुंतवणुकीविषयक निर्णय घ्यावे.  

(या सदरातून केलेले आíथक नियोजन त्या त्या कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन केलेले असते. त्या कुटुंबाची सर्वसाधारण पाश्र्वभूमी दिलेली असली तरीही सर्वच गोष्टी शब्दमर्यादेच्या अभावी देता येत नाहीत. त्यामुळे सुचविलेले नियोजन त्या त्या कुटुंबांपुरते असते. या व्यतिरिक्त लेखांतून सुचविले गेलेले उत्पादन अथवा सेवेची खरेदी करण्यापूर्वी आपल्या वित्तीय नियोजकाचा सल्ला घेणे योग्य ठरेल.)