एक उदाहरण..
प्रश्न : माझ्या या वर्षीचे पगारातून मिळणारे करपात्र उत्पन्न ५,४०,००० रुपये (फॉर्म १६ प्रमाणे) आहे. घरावर घेतलेल्या कर्जावरील व्याज ४२,००० रुपये, शेअर्समधून मिळालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा ३५,००० रुपये यावर रोखे उलाढाल कर (रळळ) भरला आहे. लघु मुदतीचा भांडवली तोटा १५,००० रुपये यावर रोखे उलाढाल कर (रळळ) भरला आहे आणि बँकेतून मिळालेले बचत खात्यावरील व्याज ४,५०० रुपये आणि मुदत ठेवीवरील व्याज ८,००० रुपये आहे. माझी ८० क कलमाखाली गुंतवणूक १,००,००० रुपये आहे. मला किती कर भरावा लागेल?
– एक वाचक.
उत्तर :  आपल्याकडे एकच घर आहे, असे गृहीत धरले तर घरभाडे उत्पन्न शून्य असेल आणि व्याजाची ४२,००० रुपये वजावट मिळू शकेल. शेअर्समधून मिळालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा ज्यावर रोख उलाढाल कर (रळळ) भरला आहे तो करपात्र नाही. लघू मुदतीचा भांडवली तोटा ज्यावर रोख उलाढाल कर (रळळ) भरला आहे तो दुसऱ्या उत्पन्नातून वजा करता येणार नाही. तो तोटा तुम्हाला पुढील वर्षांसाठी उं११८ो१६ं१ िकरता येईल. बचत खात्यावरील व्याजावर १०,००० रुपयेपर्यंतची सूट मिळते. म्हणून त्यावर कर भरावा लागणार नाही. आपले करपात्र उत्पन्न आणि देय कर खालीलप्रमाणे :