सुनिश्चित ध्येये कशी ठरविली जातात ते आपण मागील लेखात पाहिले. ही ध्येये गाठण्यासाठी बचतवृद्धी करणे आवश्यक असते व ती कशी करता येईल हे आपण आज पाहणार आहोत. बचतवृद्धी करण्यासाठी वित्तप्रवाह विश्लेषण (Cashflow Analysis) करणे अतिशय महत्त्वाचे असते. वित्तप्रवाह विश्लेषणाचे अगदी सोपे समीकरण मांडायचे झाले तर उत्पन्न – खर्च = बचत. यामध्ये उत्पन्न साधारणपणे सुनिश्चित असते. परंतु खर्चाची मांडणी मात्र सखोलपणे अभ्यासण्याची गरज असते. तरच आहे त्या उत्पन्नामधून जास्तीत बचत कशी करता येईल हे आपल्या लक्षात येईल. त्यासाठी खर्चाचे विश्लेषण कसे करावे हे सोबतच्या तक्त्यात दिले आहे.
तक्त्यात दिल्याप्रमाणे, काही खर्च हे मासिक व काही खर्च हे वार्षकि पातळीवर असतात. उत्पन्न सर्व महिन्यात सारखेच असते परंतु, वार्षकि खर्च हे ज्या महिन्यात उद्भवतात त्या महिन्यात आपल्याला आíथक अडचणींना सामोरे जावे लागते. एखाद्या महिन्यात अचानक एखादा वार्षकि खर्च उद्भवतो जसे की जून महिन्यात मुलांच्या शाळेची फी, बस फी व इतर शालेय खर्च. तसेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गणपती, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दसरा – दिवाळी, एखाद्या महिन्यात इन्शुरन्स प्रीमियम वगरे. यातील काही खर्चाची रक्कम पूर्व निश्चित असते, काही खर्चाचा अंदाज आपण बंधू शकतो. जर या खर्चाची अंदाजे वार्षकि रक्कम किती होते, ती रक्कम १२ महिन्यांमध्ये सारखी विभागली तर मासिक रक्कम किती होईल हे गणित आपण मांडावे. ही रक्कम प्रत्येक महिन्याला बाजूला ठेवून, जसे की रिकिरग डिपॉझिट (फऊ) मध्ये जमा करून किंवा एखाद्या लिक्विड फंडामध्ये गुंतवणूक करून त्यातून गरजेप्रमाणे आपण पसे काढून घेऊ शकतो.

अशा प्रकारे तरतूद केल्यामुळे
१) वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे येणारे वार्षकि खर्च कुठलेही लोन ना घेता किंवा क्रेडिट कार्ड न वापरता भागवता येतात.
२) रिकिरग डिपॉझिट किंवा लिक्विड फंडात गुंतवणुकीत मिळालेल्या व्याजामुळे रक्कम वृद्धीही होते.
३) शिवाय अशावेळी इतर आíथक उद्दिष्टांसाठी केलेल्या गुंतवणुकीलाही हात न लावल्यामुळे भविष्यातील ध्येयांसाठी केलेली बचत अबाधित राहते.
यातूनच kMONEY SAVED IS MONEY EARNED या तत्त्वाखाली बचतवृद्धी होऊ शकते.
दुसरी गोष्ट अशी की,वरील तक्त्याप्रमाणे दर महिन्याला झालेल्या खर्चाची मांडणी करून तुम्ही स्वत: निरीक्षण केले असता, आपला खर्च कुठे कमी-अधिक होत आहे व तो कसा मर्यादित ठेवता येईल, हेही तुमचे तुम्हाला लक्षात येईल. यातून आपसूकच बचतवृद्धी झाल्यामुळे इतर ध्येयाच्या गुंतवणुकीसाठी तरतूद करता येईल.
अर्थनियोजन हे, तुमचे राहणीमान न बदलता बचतीचे प्रमाण वाढवून गुंतवणुकीचे नियोजन करते. गुंतवणुकीच्या नियमाप्रमाणे वित्तप्रवाह विश्लेषणाचे योग्य समीकरण ‘उत्पन्न – बचत = खर्च’ असे असते.
वरील नमूद केल्याप्रमाणे खर्चाचे योग्य व्यवस्थापन करून बचत वृद्धी करता येऊ शकते व हे योग्य समीकरण जुळून येणे शक्य होते. प्रत्येक कुटुंबागणिक हे गणित थोडे निरनिराळे असू शकते. हे करण्यामध्ये आपला अर्थनियोजक आपल्याला मदत करू शकेल.
वित्तप्रवाह विश्लेषण करून बचतवृद्धी घडून आल्यानंतर अर्थनियोजनाची पुढची पायरी असते जोखीम घेण्याची क्षमता (रिस्क प्रोफायिलग) पाहाणे व त्याकरवी होणाऱ्या गुंतवणुकीची योग्य विभागणी कमी – अधिक जोखमेच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये करणे (अ‍ॅसेट अलोकेशन). याबाबतची सखोल चर्चा आपण पुढील लेखात करू.

6

 

5

 

किरण हाके
kiranhake@fingenie.co.in
लेखक आíथक नियोजनातील उाढ उट पात्रताधारक व सेबी मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार.