06 July 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : अनिश्चित काळातही व्यवसायवाढीला वाव

कंपनीचे १९,५००हून अधिक लोकेशन्समधून सेवा पुरविणारे ६००हून अधिक डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) आहेत.

अजय वाळिंबे

भारतामध्ये आज एनएसडीएल आणि सीडीएसएल या दोन डिपॉझिटरी सेवा कार्यरत आहेत. एनएसई अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराने १९९६ मध्ये स्थापन केलेली एनएसडीएल आणि मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईने स्थापन केलेली सेंट्रल डिपॉझिटरी सव्‍‌र्हिसेस (इंडिया) लिमिटेड. शहरी आणि निमशहरी गुंतवणूकदारांना डिपॉझिटरी सेवा नवीन नाही. सीडीएसएल ही भारतातील एकमेव लिस्टेड डिपॉझिटरी कंपनी आहे. कंपनीच्या मुख्य भागधारकांमध्ये बीएसईखेरीज कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, एलआयसी आणि स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेचा समावेश आहे. १९९९ मध्ये स्थापन झालेली सीडीएसएल आज भारतातील अग्रगण्य आणि सर्वात मोठी डिपॉजिटरी असून तिचे दोन कोटींहून अधिक डीमॅटधारक आहेत. कंपनीचे १९,५००हून अधिक लोकेशन्समधून सेवा पुरविणारे ६००हून अधिक डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) आहेत. सीडीएसएल आपल्या उपकंपन्यांमार्फत इतरही अनेक महत्त्वाच्या सेवा पुरवते. यांत प्रामुख्याने सीडीएसएल व्हेंचरतर्फे केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सी (केआरए), सीडीएसएल इन्शुरन्स रिपॉझिटरी आणि सीडीएसएल कमोडिटी रिपॉझिटरीचा समावेश होतो. सध्या बहुचर्चित गिफ्ट सिटीमध्ये नोंदणी झालेली आणि सेबीने मान्यता दिलेली सीडीएसएल ही एकमेव डिपॉझिटरी आहे.

कंपनीने मार्च २०२० साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर केले आहेत. हे निकाल अपेक्षेप्रमाणे असून, कंपनीने वर्षभरात २२५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १०६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तेजी असो वा मंदी शेअर बाजारातील उलाढाल कायमच राहणार असल्याने कंपनीच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तशी कमीच.

भारताची लोकसंख्या पाहता कंपनीच्या डिपॉझिटरी व्यवसाय वाढीला प्रचंड वाव आहे. तसेच नजीकच्या काळात एनएसडीएलखेरीज कुठलीही स्पर्धा नसल्याने सीडीएसएल आपला आवाका मोठय़ा प्रमाणात वाढवू शकेल. कुठलेही कर्ज नसलेली, उत्कृष्ट प्रवर्तक, आधुनिक तंत्रज्ञान तसेच डिपॉझिटरीखेरीज इतरही महत्त्वाच्या उपयुक्त सेवा यामुळे करोना काळातही सीडीएसएल एक दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक ठरू शकते.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

सीडीएसएल लि.

(बीएसई कोड – ५३८४३४)

शुक्रवारचा बंद भाव : रु. २३५

स्मॉल कॅप

प्रवर्तक : बीएसई लिमिटेडा

व्यवसाय : डिपॉझिटरी सेवा

बाजार भांडवल : रु. २,५०३ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :         रु.  ३०२/१८०

भागभांडवल : रु. १०४.५० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  २०.००

परदेशी गुंतवणूकदार      ८.९६

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ३४.७५

इतर/ जनता     ३६.२९

पुस्तकी मूल्य : रु. ६९.२८

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश : २७५%

प्रति समभाग उत्पन्न :   रु. १०.१७

पी/ई गुणोत्तर :  २३.५८

समग्र पी/ई गुणोत्तर :    १४.४२

डेट इक्विटी गुणोत्तर :    ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :       ४५४९

रिटर्न ऑन कॅपिटल :    २३.३८

बीटा :  ०.४५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 1:06 am

Web Title: central depository services company profile zws 70
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : शून्याकडून मोठया शून्याकडे!
2 थेंबे थेंबे तळे साचे :  व्यवस्थापन करोना काळातील..
3 बंदा रुपया :  प्रक्रिया उद्योगातील मातब्बरी!
Just Now!
X