वर्षभरात चकली खाल्ली नाही तरी नरकचतुर्दशीच्या दिवशी चकली-चिवडा खाल्याशिवाय दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटत नाही. त्याचप्रमाणे वर्षभरात शेअरची खरेदी, विक्री केली तरी दिवाळीत मुहूर्ताच्या सौद्याला खरेदीला मान खास असतो. मुहूर्ताच्या सौद्यांचे वेगळेपण जपण्यासाठी ‘अतिथी विश्लेषक’ या सदरात संपूर्ण महिना वेगवेगळ्या विश्लेषकांच्या मर्मबंधातील ठेव असलेल्या समभागांचा ‘गुंतवणूक फराळ’ घेऊन येत आहोत. याची सुरुवात ऑक्टोबरच्या या पहिल्या सोमवारपासून दोन समभागांच्या या शिफारसीने.  विश्लेषकांनी अनेक संशोधन अहवाल लिहिले असले तरी प्रत्येकाला या वर्षांत ही कंपनी नफ्याचे भरभरून माप पदरात टाकेल अशी खात्री वाटते. ‘‘लोकसत्ता       
अर्थ वृत्तान्त’’ नेहमीच वाचकांना नवीन पण सकस देण्याचा प्रयत्न करीत असतो. हा उपक्रम राबविताना विविध दलाली पेढ्यातील विश्लेषकांकडून वर्षभरात संशोधन केलेल्या कंपन्यातून एखादी कंपनी निवडून ती का आवडली हे थोडक्यात सांगितले जाईलच. पण आपल्या मर्मबंधातील अशी ठेव कोणती या बाबत वाचकांचे अभिप्रायही आम्हाला जाणून घ्यावयाचे आहेत. दिवाळीत खरेदीसाठी कंपनीची तुमची निवड कोणती आणि निवड केलेली कंपनी आवडण्याचे कारण आम्हाला थोडक्यात arthmanas@expressindia.com या ई-मेलवर जरूर कळवा.   
१. पर्सिस्टंट सिस्टीम्स

पर्सिस्टंट सिस्टीम्स ही पुणे येथे मुख्य कार्यालय असलेली मिडकॅप आयटी कंपनी आहे. कंपनीची आशिया अमेरिका व युरोप खंडात मिळून नऊ संगणक प्रणाली विकसित करणारी (डेव्हलपमेंट सेंटर्स) आहेत. डॉ आनंद देशपांडे या तंत्रज्ज्ञाने या कंपनीची ३० मे १९९० रोजी स्थापना केली. डॉ. देशपांडे हे आयआयटी खरगपूरचे कॉम्प्युटर सायन्स या विषयातील पदवीधर असून अमेरिकेतील इंडियाना स्टेट युनिव्हर्सटिीमधून पदव्युत्तर पदवी व डॉक्टरेट त्यांनी प्राप्त केली आहे. ३० जून २०१४ रोजी कंपनीच्या कर्मचारी संख्येने ८,००० चा टप्पा ओलांडला आहे. कंपनीची पुण्यात तीन ठिकाणी व भारतात गोवा, नागपूर, हैदराबाद व बंगळरु कार्यालये आहेत. ही कंपनी प्रामुख्याने प्रॉडक्ट कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनी उच्च तंत्रज्ञानावर आधारीत चालणाऱ्या कंपन्यासाठी संगणक प्रणाली पुरवठादार आहे. जगातल्या पहिल्या अव्वल वीस ‘टेक्नॉलॉजी कंपन्यां’साठी पर्सस्टिंट संगणक प्रणाली विकसित करीत आहे. या व्यतिरिक्त दळणवळण, आरोग्य निगा, बँकिंग व आíथक सेवा, माध्यमे, जैव तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनीचे ग्राहक आहेत.

२  . आरएस सॉफ्टवेअर
(बीएसई कोड – ५१७४४७)
” ७१७.३०
वार्षिक उच्चांक/नीचांक : “८३०/१३६
दर्शनी मूल्य : ” १०       पी/ई : १६.१८
शशी भूषण हे प्रभूदास लीलाधर या दलाली पेढीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आहेत.
shashibhusan@plindia.com

महत्वाची सुचना :
आम्ही सल्ला देत असलेल्या फंडांना आम्ही या कंपनीचे समभागात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या हेज फंडांनी ही गुंतवणूक केली असेल किंवा भविष्यात गुंतवणूक करतील. या मुळे या कंपनीच्या समभागाच्या किंमतीत वाढ होणे आमच्या फायद्याचे ठरू शकते.