20 September 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : चार वर्षांतील कार्यबदल पथ्यावर

कंपनी येत्या दोन वर्षांत रिलायन्स सीमेंटच्या प्रकल्पांत क्षमता वाढवून आणि फायदा वाढवण्यावर भर देईल.

अजय वाळिंबे

बिर्ला कॉर्पोरेशन (बीसीएल) ही एम पी बिला समूहाची प्रमुख कंपनी. बीसीएल ही एक अग्रगण्य सीमेंट उत्पादक कंपनी असून कंपनीने रिलायन्स सीमेंट ताब्यात घेतल्यापासून कंपनीची सीमेंटची वार्षिक उत्पादन क्षमता १५.५ दशलक्ष टन (एमटीपीए) वर गेली आहे. कंपनीचे प्राधान्य भारतातील मुख्यत: मध्य, उत्तर आणि पूर्वेकडील भागात आहे. कंपनीच्या एकूण उलाढालीत सीमेंटचा हिस्सा ९५ टक्के आहे. कंपनीच्या सीमेंट उत्पादनातील प्रमुख ब्रँडमध्ये एमपी बिर्ला सीमेंट परफेक्ट प्लस, एमपी बिर्ला सीमेंट सम्राट अ‍ॅडव्हान्स, एमपी बिर्ला सीमेंट अल्टिमेट अल्ट्रा, एमपी बिर्ला सीमेंट चेतक हे आहेत.

गेल्या चार वर्षांत, कंपनीने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या आव्हानांचा यशस्वी सामना करून कार्यान्वयनात अनुकरणीय बदल केला आहे. ज्यामुळे गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात ३०० टक्के वाढ झाली आहे. कंपनीने टर्नअराऊंड साध्य करण्यासाठी प्रामुख्याने १) प्रीमियमायझेशन; २) क्षमता सुधार; ३) अनुकूल इंधन खर्चाचे मिश्रण; आणि बाह्य़ आव्हानांवर मात करणे असे महत्त्वाचे उपाय करून आणि खर्चात घट साध्य केली. रिलायन्स सीमेंट ताब्यात घेतल्यामुळे कंपनीला उत्पादन वाढवितानाच सीनर्जी साध्य करणे सोपे झाले. कंपनी येत्या दोन वर्षांत रिलायन्स सीमेंटच्या प्रकल्पांत क्षमता वाढवून आणि फायदा वाढवण्यावर भर देईल.

मार्च २०२० साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने ६,९१६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५०५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो जवळपास दुप्पट आहे. कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. कोविड १९ च्या काळातदेखील कंपनीने १,२२२ कोटी रुपयांची उलाढाल करून ६६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा तसेच त्याला पूरक उद्योगांना आवश्यक पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

करोनाकाळात ठप्प झालेली अनेक कामे तसेच उद्योगधंदे येत्या दोन वर्षांत पुन्हा पूर्वपदावर येतील अशी आशा आहे. सध्या पुस्तकी मूल्याच्या आसपास असलेला हा शेअर मध्यम कालावधीसाठी योग्य वाटतो.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचवलेले शेअर्स हे खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यात करावी.

बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड

(बीएसई कोड – ५००३३५)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  ५९४.६०

स्मॉल कॅप

प्रवर्तक : एम पी बिर्ला समूह

उद्योग क्षेत्र : सीमेंट

बाजार भांडवल : रु. ४,५७८ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                          रु.  ८०८ / ३७२

भागभांडवली भरणा : रु. ७७.०१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६२.९०

परदेशी गुंतवणूकदार      ३.६२

बँक/ म्यु. फंड/ सरकार    १४.६१

इतर/ जनता     १८.८७

पुस्तकी मूल्य : रु. ६२४.१३

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश :       ७५%

प्रति समभाग उत्पन्न : रु. ५५.८८

पी/ई गुणोत्तर : १०.६

समग्र पी/ई गुणोत्तर : २७

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.८९

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : २.४७

रिटर्न ऑन कॅपिटल : १२.२२

बीटा : ०.८

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2020 1:04 am

Web Title: company profile for birla corporation ltd zws 70
Next Stories
1 क.. कमॉडिटीचा :  कृषी धोरण सुधारणा आणि शेतकऱ्यांपुढील आव्हाने
2 बंदा रुपया : वाहन क्षेत्रातील प्रेरक नवप्रवाह
3 थेंबे थेंबे  तळे साचे :  गुंतवणुकीतील सातत्य म्हणजे नक्की काय?
Just Now!
X