01 June 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : ‘लोकल ते ग्लोबल’ नमुना!

२५० (अडीचशे) हर्बल/आयुर्वेदिक उत्पादनांचा पोर्टफोलिओ असणारी डाबर इंडिया आयुर्वेदात जगातील अग्रणी कंपनी आहे

अजय वाळिंबे

गेल्या दोन महिन्यांत बहुतांशी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. परंतु काही शेअरना मात्र विशेष झळ पोहोचली नाही. तसाच एक शेअर म्हणजे आज सुचविलेला डाबर.

तब्बल १३५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली डाबर इंडिया ही आज भारतातील एक मोठी एफएमसीजी कंपनी मानली जाते. कंपनी आरोग्य सेवा, आयुर्वेदिक औषधे, व्यक्तिगत निगा आणि विविध खाद्यपदार्थाचे उत्पादन करते. डाबर इंडिया लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य एफएमसीजी कंपन्यांपैकी एक आहे आणि जगातील सर्वात मोठी आयुर्वेदिक आणि नैसर्गिक आरोग्य सेवा कंपनी आहे. पंतप्रधानांनी हाक दिलेल्या आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या मोहिमेतील ‘लोकल ते ग्लोबल’ संक्रमणाचा ही कंपनी उत्तम नमुना ठरावी.

२५० (अडीचशे) हर्बल/आयुर्वेदिक उत्पादनांचा पोर्टफोलिओ असणारी डाबर इंडिया आयुर्वेदात जगातील अग्रणी कंपनी आहे. डाबर आज हेअर केअर, ओरल केअर, हेल्थ केअर, स्किन केअर, होम केअर आणि फूड्स यांसारख्या प्रमुख ग्राहक उत्पादनांमध्ये कार्यरत आहे. कंपनीचे भारत तसेच परदेशात विस्तृत वितरण नेटवर्क आहे तसेच शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही बाजारांत कंपनीचे किरकोळ विक्रीचे जाळे आहे. डाबरच्या एफएमसीजी पोर्टफोलिओमध्ये आज पाच खास नाममुद्रांचा समावेश आहे – नैसर्गिक आरोग्य सेवा उत्पादनांसाठी मास्टर ब्रँड म्हणून ‘डाबर’, प्रीमियम वैयक्तिक काळजीसाठी ‘वाटिका’, पचनांसाठी ‘हाजमोला’, फळांचे रस आणि पेय पदार्थाचे ‘रिअल’ आणि फेअरनेस ब्लीच आणि त्वचा देखभाल उत्पादनांसाठी ‘फेम’. तर आरोग्य सेवांच्या अंतर्गत हाजमोला, पुदिन हारा, डाबर च्यवनप्राश, ग्लुकॉन डी, डाबर लाल इत्यादी नाममुद्रा आहेत. होम केअर रेंजमध्ये ओडोनिल, ओडोमास, ओडोपिक इत्यादी उत्पादनांचा समावेश आहे.

जागतिक बाजारपेठेत देखील डाबरच्या उत्पादनांना उत्तम मागणी आहे. कंपनीची उत्पादने जगभरातील १२०हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांची उत्पादने मध्य पूर्व, सार्क देश, आफ्रिका, अमेरिका, युरोप आणि रशिया येथे अत्यंत लोकप्रिय आहेत. डाबरची निर्यात आज एकूण उलाढालीच्या २७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

सध्या आपण अशा कंपन्यांमध्ये किंवा क्षेत्रात गुंतवणूक करायला हवी जेथे कोविड -१९चा परिणाम अत्यल्प असेल. आज सुचविलेली डाबर इंडिया या अशाच क्षेत्रात मोडते. आतापर्यंतची कंपनीची आर्थिक कामगिरीदेखील उत्तमच आहे. कंपनीचे २०१९-२० या आर्थिक वर्षांचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत (बुधवार, २७ मेला अपेक्षित आहेत).  मात्र डिसेंबर २०१९ अखेर समाप्त तिमाहीसाठी जाहीर झालेले निकाल निश्चितच आश्वासक आहेत.

या तिमाहीसाठी कंपनीने १,७४८.१८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३४६.३१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ११ टक्क्यांनी जास्त आहे. अत्यल्प कर्ज आणि केवळ ०.६३ बिटा असलेली डाबर इंडिया म्हणूनच आकर्षक खरेदी ठरते.

डाबर इंडिया लिमिटेड

(बीएसई कोड – ५०००९६)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ४४३.९०/-

लार्ज कॅप

प्रवर्तक : डॉ. एस. के. बर्मन

उद्योग क्षेत्र : आयुर्वेदिक उत्पादने

बाजार भांडवल : रु.                                ७८,४४८ कोटी

वर्षभरातील उच्चांक / नीचांक      रु.        ५२५ / ३५७

भागभांडवल भरणा : रु. १                        ७६.७१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                                                    ६७.८८

परदेशी गुंतवणूकदार                               १७.४८

बँक/म्यु. फंड/सरकार                              ७.७१

इतर/जनता                                             ६.९३

पुस्तकी मूल्य : रु.                                   २२.५

दर्शनी मूल्य :   रु.                                    १/-

लाभांश :                                                २७५%

प्रति समभाग उत्पन्न :   रु.                    ७.८८

पी/ई गुणोत्तर :                                    ५९

समग्र पी/ई गुणोत्तर :                         ६१

डेट इक्विटी गुणोत्तर :                        ०.११

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :                  ३७.११

रिटर्न ऑन कॅपिटल :                           २८.६१

बीटा :                                                 ०.६३

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2020 5:50 am

Web Title: company profile for dabur india ltd zws 70
Next Stories
1 आता शाश्वत केवळ सोनेच
2 माझा पोर्टफोलियो : उच्चतम मानके, बहुविध प्रस्तुती
3 बंदा रुपया : शेतकऱ्यांचा सोबती..
Just Now!
X