01 June 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : उच्चतम मानके, बहुविध प्रस्तुती

कंपनीचे भारतामध्ये पुणे आणि पुडुचेरी येथे उत्पादन प्रकल्प आहेत.

अजय वाळिंबे

शेअर बाजाराची परिस्थिती बिकट असताना कुणीही केवळ लार्ज कॅप कंपन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देईल आणि ते योग्यच आहे. मात्र त्याच वेळी काही उत्तम स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स जर तुम्हाला आकर्षक भावात मिळत असतील तर ती संधी सोडता कामा नये. कारण हेच शेअर्स नंतर तुम्हाला उत्तम परतावा देऊ शकतील.

आज सुचविलेली फोसेको इंडिया लिमिटेड ही अशीच एक स्मॉल कॅप कंपनी आहे. सुरुवातीला ग्रीव्हज् समूह आणि फोसेको पीएलसी यांचा संयुक्त उपक्रम असलेली ग्रीव्हज् फोसेको नावाने ओळखली जाणारी ही कंपनी ग्रीव्हज् समूहाने निर्गुंतवणूक केल्यानंतर फोसेको इंडिया नावाने ओळखली जाऊ लागली. नंतर जागतिक स्तरावर फोसेको पीएलसी कूकसन इन्क या बहुराष्ट्रीय समूहाने ताब्यात घेतली आणि २०१२ मध्ये कूकसन समुहाच्या डीमर्जर प्रोसेसमध्ये ती विजवीअस पीएलसीचा भाग बनली. फोसेको ही ७५ वर्षांहून अधिक काळ धातूंच्या उद्योगाशी संबंधित असून फाउंड्री उद्योगात वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या पुरवठय़ात जागतिक आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. जगभरातील ३२ देशांमध्ये कंपनीचे अस्तित्व असून जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, ब्राझील, चीन, भारत, दक्षिण कोरिया आणि जपान आदी देशात कंपनीच्या प्रमुख उत्पादन सुविधा आहेत. कंपनीची फाउंड्री आधारित उत्पादने आणि कास्टिंग्ज विविध उद्योगात वापरली जातात. यात प्रामुख्याने वाहन, बांधकाम, अवजड यंत्रसामग्री, अभियांत्रिकी आणि खाण या क्षेत्रांचा समावेश होतो. कंपनीचे भारतामध्ये पुणे आणि पुडुचेरी येथे उत्पादन प्रकल्प आहेत. उच्चतम मानकांच्या कास्टिंगसाठी विस्तीर्ण श्रेणी प्रस्तुत करण्याची क्षमता असलेली फोसेको इंडिया लिमिटेड ही देशातील एकमेव कंपनी आहे. अनुभवी प्रवर्तक आणि उत्कृष्ट व्यवस्थापन असलेल्या या बहुराष्ट्रीय कंपनीने आर्थिक आघाडीवर कायम उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. कुठलेही कर्ज नसलेल्या फोसेको इंडियाने आपल्या भागधारकाना शेअर बाजारावरील कामगिरीने कायम खुश ठेवले आहे. आतापर्यंतच्या बारमाहीसाठी (trailing 12 months) कंपनीने ३२२.५२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३४.५३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीचे मार्च २०२० संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर व्हायचे आहेत. अर्थात ते कसेही असले तरी या आर्थिक वर्षांत कंपनीला कोविड-१९ मुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहिर झाल्यावर फोसेको इंडियाचा गुंतवणुकीसाठी विचार करावा.

आजच्या स्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.

फोसेको इंडिया लिमिटेड   

(बीएसई कोड – ५००१५०)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ९९३/-

मायक्रो स्मॉल कॅप

प्रवर्तक : विजवीअस पीएलसी

उद्योग क्षेत्र : रसायन

बाजार भांडवल : रु. ६४० कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                          रु.  १,६५० / ८२०

भागभांडवल भरणा : रु. ६.३९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ७४.९८

परदेशी गुंतवणूकदार      ०.०६

बँक/म्यु. फंड/सरकार      १४.०१

इतर/जनता      १०.९५

पुस्तकी मूल्य : रु. २६८.३६

दर्शनी मूल्य :   रु.१०/-

लाभांश :       २५०%

प्रति समभाग उत्पन्न :   रु. ५०.१६

पी/ई गुणोत्तर : १८.४

समग्र पी/ई गुणोत्तर :    ३०.१

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :       ०.००

रिटर्न ऑन कॅपिटल :    ३३.२४

बीटा : १.५०

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 1:11 am

Web Title: company profile for foseco india ltd zws 70
Next Stories
1 बंदा रुपया : शेतकऱ्यांचा सोबती..
2 नावात काय ? : ओपन मार्केट ऑपरेशन्स (ओएमओ)
3 बाजाराचा तंत्र कल : आगामी तिमाही निकालांचा वेध..
Just Now!
X