अजय वाळिंबे

एच.जी. इन्फ्रा इंजिनीयरिंग ही रस्ते आणि महामार्गाच्या व्यवसायातील एक अग्रगण्य कंपनी आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील ही कंपनी बांधकाम (ईपीसी) सेवा टर्न की तत्त्वावर प्रदान करते तसेच, रस्ते, नागरी बांधकाम आणि संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेते.

Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
mutual funds
SEBI ने म्युच्युअल फंडांना विदेशी ETF मध्ये गुंतवणूक करण्यापासून रोखले, आता नवे पर्याय काय?

कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचएआय), सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय यांच्यासह आयआरबी, अदानी, टाटा प्रोजेक्ट्स इ. खासगी कंपन्यांचा समावेश आहे. कंपनीचे प्रकल्प राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश इ. राज्यांत आहेत. कंपनीने आतापर्यंत अनेक महामार्गाचे प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले असून सध्या गुरगाव- सोहना, नोर्नल बायपास, हापूर-मोरादाबाद, भंडारा नांदगाव-मोरशी, काटोल- वारूद इ. प्रकल्प चालू आहेत. कंपनीला नुकतेच मंचेरियल – रिपल्वाडा आणि दिल्ली -बडोदा प्रकल्पाचे मोठे कंत्राट मिळाले आहे. याच क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत एचजी इन्फ्राची कामगिरी कायमच सरस राहिली आहे. मार्च २०२० साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने २,२१७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर (गेल्या वर्षी २,०१४ कोटी) १६७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ३१.५ टक्क्य़ांनी अधिक आहे, तर यंदाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने ३१२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २० कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. अर्थातच सद्य:परिस्थितीत हे निकाल तुलनात्मक पद्धतीने नाही तपासता येणार.

भारतामध्ये गेली काही वर्षे प्रत्येक अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये वाहतूक आणि दळणवळण यासाठी रस्ते आणि महामार्ग यांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरिता तसेच विस्कटलेली घडी पुन्हा सावरण्याकरिता सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आगामी काळात एचजी इन्फ्रासारख्या अनुभवी कंपन्यांना पुन्हा चांगले दिवस येतील अशी आशा आहे.

दोनच वर्षांपूर्वी कंपनीने ‘आयपीओ’द्वारे प्रति शेअर २७० रुपयांना शेअर्सचे वाटप करून शेअर बाजारात प्रवेश केला होता. सध्या १८० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मध्यमकालात चांगली गुंतवणूक ठरू शकेल.

* आजच्या परिस्थतीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचवलेले शेअर्स हे आणखी खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.

एच. जी. इन्फ्रा इंजिनीयरिंग लि.

(बीएसई कोड – ५४१०१९)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १८९.१५

मायक्रो कॅप

प्रमुख व्यवसाय :                       पायाभूत सुविधा/ रस्ते बांधकाम

बाजार भांडवल :                   रु. १,२३३ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :             रु. २९५/१३५

भागभांडवल भरणा :                 रु. ६५.१७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                          ७४.०४

परदेशी गुंतवणूकदार                  ०.४३

बँक/ म्यु. फंड/ सरकार                २०.६३

इतर/ जनता                       ४.९०

पुस्तकी मूल्य :                  रु. १२६.७८

दर्शनी मूल्य :                      रु. १०/-

लाभांश :                             ५%

प्रति समभाग उत्पन्न :         रु. २५.५७

पी/ई गुणोत्तर :                   ८.३०

समग्र पी/ई गुणोत्तर :          १९

डेट इक्विटी गुणोत्तर :          ०.४९

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   ४.८६

रिटर्न ऑन कॅपिटल :            २४.४४

बीटा :                                    ०.६६

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.