अजय वाळिंबे

आज सुचविलेली हिमाद्री स्पेशलिटी केमिकल्स लिमिटेड म्हणजे १९८७ मध्ये स्थापन झालेली पूर्वाश्रमीची हिमाद्री केमिकल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी प्रामुख्याने कोळसा डांबर उप-उत्पादने, टार पिच (सीटीपी), क्रिओसोटे तेल, नेफथलीन, कार्बन ब्लॅक आणि एसएनएफ (सोडियम नॅफथलीन फॉर्माल्डिहाइड) च्या डेरिव्हेटिव्हजची उत्पादक आहे. हिमाद्री सीटीपीची सर्वाधिक उत्पादन करणारी कंपनी असून एकूण उलाढालीत तिचा जवळपास ६५ टक्के वाटा आहे. आपल्या संशोधन आणि विकासाच्या क्षमतेच्या पाश्र्वभूमीवर, आज ही कंपनी जगातील एक आघाडीची आणि प्रमुख कंपनी मानली जाते.

easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
mumbai, MMRDA, Adani Electricity, Monorail, Metro Projects, Tata Power, Hikes Tariffs, marathi news,
मोनोरेल, मेट्रो प्रकल्पात आता अदानीची वीज; टाटाच्या वीजदर वाढीच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएचा निर्णय
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

अ‍ॅल्युमिनियम, ग्रॅफाइट इलेक्ट्रोड, रबर, टायर्स, रंग, प्लास्टिक तसेच पायाभूत सुविधा आणि बांधकाम अशा अनेकविध उद्योगांसाठी पूरक उत्पादने तयार करणाऱ्या या कंपनीकडे उत्पादन वितरित करण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान आहे. लिथियम आयन बॅटरी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उच्च दर्जाच्या प्रगत कार्बन मटेरियलचे उत्पादन तसेच एसएनएफ उद्योगातील ही आघडीची कंपनी आहे.

कंपनीच्या भारतातील प्रमुख ग्राहकांमध्ये एचईजी, ग्रॅफाइट इंडिया, नाल्को, बाल्को, हिंडाल्को आणि मालको यांचा समावेश आहे. कंपनीच्या अल्कोवा, दुबल, ग्रीसचे अल्युमिनियम, एसजीएल ग्रुप, हायड्रो, ग्राफ टेक इंटरनॅशनल आणि अल्ब्राससारख्या सुप्रसिद्ध परदेशी ग्राहकांना सेवा पुरविणाऱ्या निर्यातीतील बाजारपेठेतही चांगली उपस्थिती आहे.

कंपनीचे एकंदर आठ उत्पादन प्रकल्प/ सुविधा असून त्या पैकी भारतात सात तर चीनमध्ये एक प्रकल्प आहे. पश्चिम बंगालमध्ये चार तर छत्तीसगड, गुजरात, ओरिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक असे हे उत्पादन प्रकल्प आहेत.

गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने १,८०६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २०५.३५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३९ टक्क्य़ांनी कमी आहे. मात्र गेल्या वर्षी कंपनीची कामगिरी फारशी समाधानकारक नसली तरीही सद्य:स्थितीत आत्मनिर्भर भारत साकारताना हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्ससारखी कंपनी पोर्टफोलियोसाठी एक आकर्षक खरेदी ठरू शकेल. कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तो अभ्यासून निर्णय घेता येईल.

* आजच्या परिस्थतीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचवलेले शेअर्स हे आणखी खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.

हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स लि.

(बीएसई कोड – ५००१८४)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ४२.८५

मायक्रो कॅप

प्रमुख उत्पादन :   कार्बन केमिकल्स

बाजार भांडवल : रु. १,८०० कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :      रु. ९१/२७

भागभांडवल भरणा : रु. ४१.८८ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ४८.९०

परदेशी गुंतवणूकदार      ०.८९

बँक/ म्यु. फंड/ सरकार    २.७८

इतर/ जनता     ४७.४३

 

पुस्तकी मूल्य :  रु. ४१.४१

दर्शनी मूल्य :   रु. १/-

लाभांश : १५%

प्रति समभाग उत्पन्न :   रु. ४.९१

पी/ई गुणोत्तर : ९

समग्र पी/ई गुणोत्तर :    १४.२

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.२०

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :४.५४

रिटर्न ऑन कॅपिटल :    २५.४९

बीटा :  ०.७

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.