अजय वाळिंबे

गेल्या वर्षी ज्या काही मोजक्या ‘आयपीओ’ने गुंतवणूकदारांना भरपूर कमावून दिले त्यातला एक आणि मुख्य म्हणजे सरकारी कंपनीचा हा आयपीओ. ऑक्टोबर २०१९ मध्ये केवळ ३२० रुपयांना विक्री झालेला हा शेअर पाच महिन्यांत तब्बल १९०० रुपयांवर जाऊन आला आहे.

TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड
13 thousand houses sold in mumbai marathi news
मुंबई: मार्चमध्ये १३ हजारांहून अधिक घरांची विक्री, मुद्रांक शुल्कापोटी सरकारच्या तिजोरीत १०६६ कोटी रुपयांची भर

वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेली, सरकारी मालकीची ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी)’ ही भारतीय रेल्वेची संपूर्ण मालकीची साहाय्यक कंपनी आहे. आयआरसीटीसी पर्यटन, केटरिंग, ऑनलाइन तिकीट बुकिंग अशा विविध उपयुक्त सेवा हाताळते आणि देशातील रेल्वे आणि रेल्वे स्थानकांवर पिण्याचे पाणी पुरवते. २००८ मध्ये आयआरसीटीसीला ‘मिनीरत्न’ तथा प्रवर्ग-१ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून भारत सरकारतर्फे गौरविण्यात आले.

कंपनीची वेबसाइट (www.irctc.co.in) ही आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वाधिक उलाढालींची नोंद केलेली वेबसाइट आहे. भारतीय रेल्वेवर सुमारे कोटय़वधी प्रवासी प्रवास करतात. डिजिटलायझेशन झाल्यापासून दररोज आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅपद्वारे लाखो प्रवासी ऑनलाइन तिकीट बुक करतात. आयआरसीटीसीने आपली वेबसाइट अद्ययावत करतानाच देशांतर्गत डेबिट / क्रेडिट व्यवहार व्यवस्थापित करण्यासाठी आय-पे पेमेंट गेटवे सुरू केला आहे. अतिरिक्त बाजार विभागांमध्ये ते वापरण्यासाठी गेटवेच्या तांत्रिक क्षमता आणि ऑपरेटिव्ह युटिलिटीवर कंपनी काम करत आहे.

आयआरसीटीसी ग्राहकांसाठी वन स्टॉप सोल्युशन तयार करण्यासाठी बजेट हॉटेल्स, ई-केटरिंग आणि एक्झिक्युटिव्ह लाऊंजसह रेल्वेबाह्य़ सेवादेखील प्रदान करते. सध्या, कंपनी चार विभागांमध्ये मुख्यत्वे कार्यरत आहे जी खालीलप्रमाणे आहेत:

प्रवास आणि पर्यटन : आयआरसीटीसी हे रेल्वे पर्यटनासाठी खास आहे. कंपनी हवाई, जमीन, रेल्वे, आणि समुद्रपर्यटन/टूर पॅकेजेस, हॉटेल बुकिंग आणि विमान तिकीट बुकिंग अशा विविध विभागांमधून प्रवास आणि पर्यटन सेवा देते.

बाटलीबंद पाणी : आयआरसीटीसी रेल्वेगाडी आणि रेल्वे स्थानकांवर बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची अधिकृत निर्माता आणि वितरक आहे. कंपनी ‘रेल नीर’ या ब्रँड नावाने पिण्याचे पाणी वितरित करते.

खान-पान सेवा :  कंपनी ट्रेनमध्ये ऑन-बोर्ड केटरिंग (मोबाइलद्वारे) आणि स्थानकांवर स्थिर केटरिंग सेवांसह खाद्यपदार्थ पुरवते.

इंटरनेट तिकीट : आयआरसीटीसीकडे मोबाइल अ‍ॅप (रेल कनेक्ट) आणि ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्यासाठी एक समर्पित वेबसाइट आहे. सध्या भारतात सर्वात जास्त ट्रॅफिक असलेली ती वेबसाइट असून कोटय़वधी लोक तिचा वापर करतात.

मार्च २०२० अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षित वित्तीय अहवाल कंपनीने नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. कंपनीने २,३५३.५४ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली असून ५२४.८८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला आहे. अर्थात हे निकाल उत्कृष्ट असले तरीही यंदाच्या आर्थिक वर्षांत करोना कहरामुळे पहिली तिमाही तसेच पुढील काही काळ तरी कंपनीकडून उत्तम निकालाची अपेक्षा ठेवता येणार नाही. त्यामुळेच हा शेअर तुम्हाला कमी किमतीत मिळू शकेल. साधारण ९०० रुपयांच्या पातळीला खरेदी केल्यास कुठलेही कर्ज नसलेली आयआरसीटीसी एक दीर्घकालीन उत्तम गुंतवणूक ठरू शकेल.

* आजच्या परिस्थतीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचवलेले शेअर्स हे आणखी खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.

आयआरसीटीसी लिमिटेड

(बीएसई कोड – ५४२८३०)

शुक्रवारचा बंद भाव :                          रु. १,३७०.५०

लार्ज कॅप

प्रवर्तक :                                            भारत सरकार

उद्योग क्षेत्र :                           प्रवासी सेवा / पर्यटन

बाजार भांडवल :                              रु. २१,९२८ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :             रु. १,९९५/ ६२५

भागभांडवल भरणा :                              रु. १६० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                           ८७.४०

परदेशी गुंतवणूकदार        १.७०

बँक/ म्यु. फंड/ सरकार    २.२५

इतर/ जनता                     ८.६५

पुस्तकी मूल्य :  रु. ६५.१८

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश : १२५%

प्रति समभाग उत्पन्न :   १६.७१ रु.

पी/ई गुणोत्तर :  ८२

समग्र पी/ई गुणोत्तर :  अनुपलब्ध

डेट इक्विटी गुणोत्तर :    ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १२८.२५

रिटर्न ऑन कॅपिटल :    ४३.४१

बीटा :  ०.४

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.