24 January 2021

News Flash

माझा पोर्टफोलियो : टाळेबंदीचा अत्यल्प तडाखा बसलेले क्षेत्र

अजय वाळिंबे वर्ष १९९५ मध्ये महानगर गॅस लिमिटेड कंपनीची स्थापना गेल आणि ब्रिटिश गॅस पीएलसी यांच्या संयुक्त उपक्रमाने नैसर्गिक वायूच्या विपणन व वितरणाचा व्यवसाय करण्याच्या

अजय वाळिंबे

वर्ष १९९५ मध्ये महानगर गॅस लिमिटेड कंपनीची स्थापना गेल आणि ब्रिटिश गॅस पीएलसी यांच्या संयुक्त उपक्रमाने नैसर्गिक वायूच्या विपणन व वितरणाचा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने झाली. मुंबईत, त्याच्या आसपासचे भाग आणि महाराष्ट्र आदी ठिकाणी कंपनीचा व्यवसाय विस्तारला आहे. कंपनी नैसर्गिक वायू अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि पाइपद्वारे घरोघरी नैसर्गिक वायूच्या वितरणाच्या व्यवसायात गुंतली आहे.

महानगर गॅस ही भारतातील सर्वात मोठय़ा शहर गॅस वितरण (‘सीजीडी’) कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीला मुंबईत नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्याचा २० वर्षांहून अधिक अनुभव आहे आणि सध्या मुंबईत कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी)ची ती एकमेव अधिकृत वितरक आहे. ब्रिटिश गॅसने आपल्या भागभांडवलाची निर्गुतवणूक केल्यावर आता गेल ही कंपनीची प्रवर्तक आहे. गेल ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि भारतातील सर्वात मोठी नैसर्गिक गॅस ट्रान्समिशन कंपनी आहे. कंपनी मोटार वाहनांच्या वापरासाठी सीएनजी आणि पीएनजीचे घरगुती वापरासाठी तसेच व्यावसायिक आणि औद्य्ोगिक वापरासाठी वितरण करते.

पाइपलाइनच्या सीजीडी नेटवर्कच्या विस्तृत जाळ्याद्वारे महानगर गॅस नैसर्गिक गॅसचे वितरण करते, ज्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाच्या (सीटी किंवा स्थानिक नैसर्गिक वायू वितरणासाठी एक्सक्लुझिव्हिटी) त्यांना सीजीडी नेटवर्क बसविणे, तयार करणे, विस्तृत करणे आणि ऑपरेट करण्याचे विशेष अधिकार आहेत. मुंबई क्षेत्र आणि रायगड जिल्हा येथे २०४० पर्यंत कंपनीला ‘इन्फ्रास्ट्रक्चर एक्सक्लुझिव्हिटी’ आहे.

सध्या आपण अशा कंपन्यांत किंवा क्षेत्रात गुंतवणूक करायला हवी जेथे कोविड-१९चा परिणाम अत्यल्प असेल. आज सुचविलेली महानगर गॅस या अशाच क्षेत्रात मोडते. आतापर्यंतची कंपनीची आर्थिक कामगिरीदेखील उत्तमच आहे. कंपनीचे २०१९-२० या आर्थिक वर्षांचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र डिसेंबर २०१९ तिमाहीसाठी जाहीर झालेले निकाल निश्चितच आश्वासक आहेत. या तिमाहीसाठी कंपनीने ७४४.५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १८६.०५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो २५ टक्क्यांनी जास्त आहे. कुठलेही कर्ज नसलेल्या आणि केवळ ०.७ बिटा असलेली महानगर गॅस म्हणूनच आकर्षक खरेदी ठरते.

महानगर गॅस लिमिटेड

(बीएसई कोड – ५३९९५७)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ८९८/-

लार्ज कॅप प्रवर्तक : गेल इंडिया लिमिटेड                पुस्तकी मूल्य : रु. २४२.८

उद्योग क्षेत्र : गॅस वितरण                                    दर्शनी मूल्य :  रु. १०/-

बाजार भांडवल : रु. ८,८७९ कोटी                            लाभांश :      २००%

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  १,२४७ / ६६४     किंमत उत्पन्न गुणोत्तर : ११.७

भागभांडवल भरणा : रु. ९८.७८ कोटी                      समग्र पी/ई गुणोत्तर :  १२.७

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)                                        डेट इक्विटी गुणोत्तर : ०.०२

प्रवर्तक  ३२.५०                                                      इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :२१५.६३

परदेशी गुंतवणूकदार      ३१.८७                              रिटर्न ऑन कॅपिटल :  ३७.२५

बँक/ म्यु. फंड/ सरकार    २६.१०

इतर/ जनता     ९.५३                       बीटा :            ०.७४

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2020 1:01 am

Web Title: company profile for mahanagar gas ltd mahanagar gas limited company profile zws 70
Next Stories
1 कर नियोजनाचे पंचक 
2 बाजाराचा तंत्र कल : अखेर तेजी क्षणीकच ठरली!
3 कर बोध : नवीन आर्थिक वर्षांरंभ… करदात्यांसाठी काही बदलांचे अनुपालन गरजेचे
Just Now!
X