16 January 2021

News Flash

टाळेबंदीतही तगलेली ‘पोलादी’ नाममुद्रा

गेली २५ वर्षे कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवत आहे

वर्ष १९९५ मध्ये म्हणजे सुमारे २५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली मैथन अलॉयज आज भारतातील एक आघाडीची आणि सर्वात मोठी फेरो मँगनीज उत्पादक तसेच निर्यातदार कंपनी आहे. सिलिको मँगनीज तसेच विविध स्टील उत्पादनासाठी फेरो मॅंगनीज हा महत्त्वाचा घटक आहे. गेल्या २५ वर्षांत कंपनीने दोन विस्तार प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. कंपनीचे विशाखापट्टणम, मेघालय तसेच प. बंगालमध्ये प्रकल्प असून एकूण उत्पादन क्षमता १३७.२५ एमव्हीए आहे. आपल्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता कंपनी सध्या प. बंगालमधील बांकुरा येथे ६५ एमव्हीए क्षमतेचा नवीन प्रकल्प उभारत आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत जिंदाल स्टील, पॉस्को, आरसेलोर मित्तल, जेएसडब्ल्यू, चायना स्टील निप्पॉन स्टील, कतार स्टील, न्यूकोर इ. अनेक मोठय़ा कंपन्यांचा समावेश होतो.

गेली २५ वर्षे कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवत आहे. कुठलेही कर्ज नसलेल्या या कंपनीचे ७५ टक्के भागभांडवल प्रवर्तकांकडे असून केवळ २२.८८ टक्के भांडवल सामान्य जनतेकडे आहे. करोना काळातही कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. सप्टेंबर २०२० साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने विक्रीत १२.९ टक्के घट नोंदवून ती ४०९.१३ कोटीवर गेली आहे तर नक्त नफ्यात मात्र ३१ टक्के वाढ होऊन तो ५४.८९ कोटी रुपयांवर गेला आहे, तर सहामाहीतील नफ्यात केवळ ४.२ टक्के घट होऊन तो ९० कोटींवर आला आहे. सध्या स्टीलच्या किमतीत वाढ होत असून त्याचा सकारात्मक परिणाम आर्थिक निकालांत दिसून येईल. तसेच नजीकच्या कालावधीत कंपनीच्या उत्पादनांना भारतात तसेच जागतिक बाजारपेठेत वाढती मागणी अपेक्षित असून कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून या मैथन अलॉयजचा आपल्या पोर्टफोलियोसाठी जरूर विचार करावा.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यात करावी.

मैथन अलॉयज लि.

(बीएसई कोड – ५९००७८)

शुक्रवारचा बंद भाव :     रु.  ५५०

पुस्तकी मूल्य :               रु. ४४४

दर्शनी मूल्य :                रु. १०/-

लाभांश :                         ६०%

प्रति समभाग उत्पन्न :      रु. ७४.८९

पी/ई गुणोत्तर :                    ७.४

समग्र पी/ई गुणोत्तर :          १८.६

डेट इक्विटी गुणोत्तर :          ०.०१

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :  ११५

रिटर्न ऑन कॅपिटल :             १९.७

बीटा :                                    ०.९०

स्मॉल कॅप

प्रवर्तक :            सुभाषचंद्र अगरवाला

उत्पादन :            मायनिंग/ धातू प्रक्रिया

बाजार भांडवल :                        रु. १,६०२ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :  रु.  ६२४/२८९

भागभांडवली भरणा :                रु.२९.११ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न :          (%)

प्रवर्तक                                 ७४.९९

परदेशी गुंतवणूकदार            ०.८८

बँक/ म्यु. फंड/ सरकार          १.२६

इतर/ जनता                          २२.८८

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2020 12:06 am

Web Title: company profile for maithan alloys ltd zws 70
Next Stories
1 बंदा रुपया : पारदर्शकतेचे ‘प्रीमियम’!
2 थेंबे थेंबे तळे साचे :  आर्थिक स्वावलंबन प्रत्येकीसाठी!
3 बाजाराचा तंत्र कल : ही चाल तुरू तुरू
Just Now!
X