03 April 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : दुर्लक्षित ‘हाय-बीटा’ शिलेदार

१९९३ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने गेल्या २२ वर्षांत एलपीजी सिलिंडर वितरणात प्रमुख स्थान मिळविले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अजय वाळिंबे

आपण गुंतवणुकीसाठी कंपन्या शोधताना अनेक निकष लावत असतो. या निकषांमध्ये उद्योग क्षेत्र, आर्थिक माहिती, वेगवेगळी गुणोत्तरे आणि प्रवर्तक अशा अनेक बाबी समाविष्ट असतात. मात्र बहुतांश वेळा अनेक छोटय़ा कंपन्या त्यांच्या अत्यल्प बाजार भांडवलामुळे आपल्या लक्षात येत नाहीत. आज सुचविलेली कंपनी त्यातलीच एक.

कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड देशांतर्गत तसेच व्यावसायिक वापरासाठी लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) सिलिंडर्सच्या निर्मितीतील भारतातील एक आघाडीची कंपनी आहे. १९९३ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने गेल्या २२ वर्षांत एलपीजी सिलिंडर वितरणात प्रमुख स्थान मिळविले आहे. कंपनीच्या प्रमुख व्यवसायात एलपीजी / सीएनजी सिलिंडर निर्मिती आणि एलपीजी बॉटिलग आणि मार्केटिंगचा समावेश आहे. हे एलपीजी आणि ऑटो एलपीजी मॅन्युफॅक्चिरग, गो गॅसच्या ब्रँड नावाने बाजारात उपलब्ध आहेत. कंपनीचे भारतातील २२ राज्यांत ५८ एलपीजी बॉटिलग आणि ब्लेंडिंग प्रकल्प असून १९६ ऑटो एलपीजी डिस्पेंसिंग स्टेशन आहेत. कंपनीचे सर्व प्रकल्प औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी एलपीजी सिलिंडर रिफिलिंगमध्ये कार्यरत आहेत. आपल्या सिलिंडर आणि एलपीजी वितरणासाठी कंपनीचे ८०० हून अधिक वितरक आहेत. गेल्या वर्षी ८७३ कोटींवर उलाढाल करणाऱ्या या कंपनीने ५९.०६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता. हा नफा गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तब्बल १३४ टक्क्यांनी अधिक होता. तर यंदाच्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने २४६.८६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १४.१७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीचे सप्टेंबर २०१९ अखेर संपणाऱ्या तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर होतील. मात्र पहिल्या तिमाहीची कामगिरी पाहता ते अपेक्षेप्रमाणेच असतील अशी आशा आहे. सध्या २७ रुपयांना उपलब्ध असलेला हा हाय-बीटा शेअर खरेदीसाठी आकर्षक वाटतो.

कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लि.

(बीएसई कोड – ५०६०७६)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ५९२.००

मायक्रो कॅप समभाग

प्रवर्तक : कॉन्फिडन्स समूह

व्यवसाय : एलपीजी सिलिंडर

बाजार भांडवल : रु. ७४१ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  ४८ /१९

भागभांडवल : रु.  २७.३८ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५२.७०

परदेशी गुंतवणूकदार  ५.५०

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ०.७७

इतर/ जनता    ४१.०३

पुस्तकी मूल्य:  रु.१३.१

दर्शनी मूल्य:    रु. १/-

लाभांश:   १० %

प्रति समभाग उत्पन्न: रु. २.९

पी/ई गुणोत्तर : १२.३

समग्र पी/ई गुणोत्तर :    १६.५

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.२०

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ९.४६

रिटर्न ऑन कॅपिटल : २५.२४

बीटा :    १.३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2019 4:06 am

Web Title: confidence petroleum india limited stock market abn 97
Next Stories
1 नियोजन भान : पण उमज पडेल तर..
2 अर्थ वल्लभ : तारांकित सुधारणेचा संभाव्य लाभार्थी
3 इच्छापत्र : समज-गैरसमज : इच्छापत्र : समज-गैरसमज
Just Now!
X