|| आशीष ठाकूर

संपूर्ण मानव जातीवर करोनाचा विळखा पडला आहे. विळखा हा शब्द आल्यावर आपल्या डोळ्यासमोर साप येतो. या मंदीच्या गडद वातावरणात निफ्टी निर्देशांकाची तेजीच्या कवडशांची शिडी हाताशी पकडत वरची वाटचाल चालू होती. पण का कुणास ठाऊक, सरलेल्या पंधरवड्यातील दर सोमवारी या सापशिडीतल्या सापाने निफ्टीची तेजीची चाल संपूर्णपणे गिळंकृत करत निफ्टीला वारंवार १४,२०० च्या स्तरावर आणून ठेवले आहे. या पाश्र्वाभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४७,८७८.४५

निफ्टी : १४,३४१.३५

गेल्या लेखातील वाक्य होते – ‘येणाऱ्या दिवसात सेन्सेक्स ५०,००० आणि निफ्टी निर्देशांक १४,८५० चा स्तर पार करण्यास अपयशी ठरल्यास निर्देशांकावर घसरणीची मानसिक तयारी ठेवून, निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४८,२०० ते ४७,८०० आणि निफ्टीवर १४,२०० ते १४,००० असे असेल.’ त्यानुसार हे खालचे लक्ष्य सरलेल्या सप्ताहात साध्य झाले. आता येणाऱ्या दिवसात निर्देशांक सातत्याने सेन्सेक्सवर ४९,६५० आणि निफ्टीवर १४,७०० च्या स्तरावर टिकल्यास शाश्वत तेजी संभवते अन्यथा निर्देशांकावर पुन्हा मंदीचे आवर्तन सुरू होईल. ज्यातून सेन्सेक्सवर ४७,४५० ते ४७,१५० आणि निफ्टीवर १३,९०० ते १३,८०० पर्यंत खाली घसरण दिसू शकते. भविष्यात हा स्तर सातत्याने राखल्यास निर्देशांकावर मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक अवतरून निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५०,००० आणि निफ्टीवर १४,८०० असे असेल.

निकालपूर्व विश्लेषण

आता आपण गुंतवणूकदारांच्या आवडत्या समभागांचे निकालपूर्व विश्लेषण जाणून घेऊया.

१) मारुती सुझुकी इंडिया लि.

तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २७ एप्रिल

२३ एप्रिलचा बंद भाव – ६,६७४.९० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६,८०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७,००० रुपये, द्वितीय लक्ष्य ७,३५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, ६,४०० रुपयांपर्यंत घसरण.

२) बायोकॉन लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २८ एप्रिल

२३ एप्रिलचा बंद भाव – ३९७.४० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ४५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३६० रुपयांपर्यंत घसरण

३) अंबुजा सीमेंट लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २९ एप्रिल

२३ एप्रिलचा बंद भाव – २९५.२० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २९० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३३० रुपये, द्वितीय लक्ष्य ३५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २६० रुपयांपर्यंत घसरण.

४) बजाज ऑटो लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार,       २९ एप्रिल

२३ एप्रिलचा बंद भाव- ३,६७०.८० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३,५५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,७५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,९५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३,५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,४५० रुपयांपर्यंत घसरण.

५) टायटन कंपनी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २९ एप्रिल

२३ एप्रिलचा बंद भाव – १,४६०.९५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,५०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,५०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,५०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,३०० रुपयांपर्यंत घसरण

६) येस बँक लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार,३० एप्रिल

२३ एप्रिलचा बंद भाव – १४ रुपये

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १४ रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १४ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १६ रुपये, द्वितीय लक्ष्य १८ रुपये

ब) निराशादायक निकाल : १४ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १२ रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966 @gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.