‘डीएसपी ब्लॅक रॉक टॉप हंड्रेड’ ही गुंतवणुकीसाठी कायम खुली असलेली (ओपन एंडेड) योजना असून प्रामुख्याने लार्जकॅप कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक या फंडातून केली जाते. या योजनेतील निधी बाजार मूल्यानुसार आघाडीच्या शंभर कंपन्यांच्या समभागात गुंतविता येतो. या कंपन्यांतून निवडलेल्या कंपन्यांच्या समभागात निधी व्यवस्थापक गुंतवणूक करतो. दीर्घकालीन भांडवली नफा मिळविणे हा या योजनेचा उद्देश आहे. ३१ मार्च २०१३ रोजी या योजनेची मालमत्ता २,७९२.२० कोटी रुपये होती. अपूर्व शहा हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. अपूर्व शहा हे एप्रिल २००६ पासून या योजनेचे व्यवस्थापन पाहात आहेत.
 या फंडाच्या ध्येयधोरणानुसार फंडाचा निधी गुंतविण्यासाठी शंभर कंपन्यांचे समभाग उपलब्ध असतात. या समभागातून ‘टॉप डाऊन’ व ‘बॉटम अप’ या दोन्ही प्रकारे योग्य समभागाची निवड केली जाते. म्हणून फंडाच्या गुंतवणुकीत व्हॅल्यू व ग्रोथ या दोन्ही प्रकारच्या समभागांची निवड दिसून येते. म्हणून फंडात रोकड व रोकड सममूल्य गुंतवणूक ३१ मार्च २०१३ रोजी दहा टक्क्यांहून अधिक दिसून येते. आवश्यकता भासेल तेव्हा या फंडातील निधी ‘इंडेक्स फ्यूचर’मध्ये गुंतविण्यात येतो हे या फंडाचे वैशिष्टय़ आहे. तरी मागील साठ महिन्यांच्या पोर्टफोलिओचे विश्लेषण केले असता समभागातील सरासरी गुंतवणूक ९३ टक्क्यांहून अधिक राहिली आहे. तर तीन वर्षांतील समभागातील गुंतवणुकीची सरासरी ९५ टक्क्यांहून अधिक आहे. सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या चार कंपन्यांच्या समभागातील गुंतवणूक आठ टक्क्यांहून अधिक आहे. याचा अर्थ निधी व्यवस्थापक अव्वल समभागात मोठी गुंतवणूक करण्यास कचरत नाहीत. त्याच वेळी मोठी गुंतवणूक असलेल्या या चार कंपन्यांच्या समभागात विक्री करून नफा वसूल करण्यात सातत्य राखण्यात येते. हा फंड आपल्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक राहून गुंतवणूक करत असल्यामुळे दहा वर्षांच्या परताव्याचा दर २६.५६ टक्केआहे.

‘डायव्हर्सिफाइड लार्जकॅप’ या फंड गटात वार्षकि परताव्याच्या दरात दहापकी आठ वष्रे हा फंड अव्वल दहा फंडांत मोडतो. मागील पाच वर्षांत ‘डायव्हर्सिफाइड लार्जकॅप’ या फंड गटातील फंडांचा परताव्याचा सरासरी दर ३.२३ टक्के तर डीएसपी ब्लॅक रॉक टॉप हंड्रेड या फंडाच्या परताव्याचा दर दुप्पट म्हणजे ६.९६ टक्केआहे. मागील दहापकी आठ वष्रे या फंडाला ‘मॉìनग स्टार’ व ‘व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन डॉट कॉम’ या म्युच्युअल फंडांचे पतमापन करणाऱ्या संकेतस्थळांनी ‘फाइव्ह स्टार’ हे सर्वोच्च रेटिंग दिले आहे.
संपूर्ण गुंतवणुकीत केवळ ३५ समभाग असल्यामुळे अनावश्यक विविधता निधी व्यवस्थापकाने टाळली आहे. एकूण सर्वाधिक पाच गुंतवणूक केलेली बँक व वित्तीयसेवा, माहिती तंत्रज्ञान व तेल व नसíगक वायू, डायव्हर्सिफाइड व वाहन उद्योग ही उद्योग क्षेत्रे आहेत. मागील पाच वर्षांचा परताव्याचा दर १५ टक्क्यांहून अधिक राहिला आहे. या पाच वर्षांत दोन आकडय़ांत परताव्याचा दर असणारे फक्त दहा फंड आहेत. या दहा फंडांत डीएसपी ब्लॅक रॉक टॉप हंड्रेडचे स्थान कायम पहिल्या पाच अव्वल परतावा देणाऱ्या फंडांत राहिले आहे. २०१० ते २०१२ या काळात ‘एस अ‍ॅण्ड पी बीएसई हंड्रेड’ निर्देशांकात तब्बल २७.९० टक्के घसरण झाली तर डीएसपी ब्लॅक रॉक टॉप हंड्रेड या फंडाचे या काळात मालमत्ता मूल्य १८.३४ टक्क्यांनी घसरले. शेअर बाजारासाठी आव्हानात्मक असणाऱ्या काळातसुद्धा निधी व्यवस्थापक फंडाचे कमीतकमी नुकसान होईल याची काळजी घेण्यात यशस्वी झाला आहे. मागील एका वर्षांच्या काळात निधी व्यवस्थापकासाठी भारत पेट्रोलियम व आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक या गुंतवणुका फंडाच्या कामगिरीत अडचण निर्माण करणाऱ्या तर इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी, एचसीएल टेक, टेक मिहद्र व अ‍ॅक्सिस बँक या गुंतवणुकांनी फंडाची अव्वल कामगिरी होण्यास मोठे योगदान दिले. या कठीण कामगिरीच्या काळात निधी व्यवस्थापक एक संतुलित गुंतवणूक असलेला पोर्टफोलिओ तयार करण्यात यशस्वी ठरला आहे. जेणेकरून नुकत्याच सुरूझालेल्या तेजीचा फायदा या फंडातील गुंतवणूकदारांना मिळू शकेल. निर्देशांक सार्वकालिक उच्चांकाच्या जवळ असताना व निवडणुकांचे निकाल जर विपरीत लागले तर निर्देशांक घसरण्याची शक्यता असतानासुद्धा विश्वासाने गुंतवणूक करावी असा फंड म्हणून डीएसपी ब्लॅक रॉक टॉप हंड्रेडची शिफारस योग्य वाटते.