केंद्रातील २०१४ मधील सत्तापालटापासून, अर्थव्यवस्था आणि एकूण सामाजिक आघाडीवर अनेक नव्या कार्यक्रम आणि बदलांची घोषणा होताना आपण सारखे पाहत आलो आहोत. यापकी काही आज अशा पातळीवर आहेत की ज्यांचे लवकरच कायद्यात रूपांतरही होईल. काहींसाठी भरीव तरतूद झाली आहे, तर काहींना अर्थसंकल्पातून आíथक तरतुदीची आवश्यकता भासेल. या दोन्ही आघाड्यांवर सरकार कार्यप्रवणही झाल्याचे दिसून येते.
भू-संपादन, कामगार कायद्यात सुधारणा, सेवा व वस्तू कर (जीएसटी) अंमलबजावणीसाठी घटनादुरुस्ती वगरे कायद्यांच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहे. अर्थसंकल्पात अनेक क्षेत्रांसाठी आíथक तरतूद करून, सरकारने अर्थवृद्धीला चालना देणारया भांडवली खर्चात वाढ केली आहे. शिवाय या व्यतिरिक्त बँकांच्या सशक्ततेसाठी वाढीव तरतुदीचा सरकारचा मानस आहे. एकूणच अर्थव्यवस्थेला नव्या जोमाने मुसंडी आणि गती देणारी पृष्ठभूमी तयार केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत अर्थव्यवस्थेला बाधा ठरलेल्या अनेक घटकांमधील सकारात्मक बदलही याचा प्रत्यय देतात. चलनवाढीचा दर निम्नतम पातळीवर असणे, दुहेरी तुटीच्या संकटातून डोके वर काढले जाणे, आयात होणारया कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि चलनाला प्राप्त झालेले स्थिरत्व वगरे अर्थव्यवस्थेने नव्याने फेर धरल्याच्या खुणा आहेत. कच्च्या तेलातील घसरणीबरोबरीनेच, पेट्रोल-डिझेल किमतींना नियंत्रणमुक्त केल्याने सरकारला वित्तीय तुटीच्या समस्येपासून बव्हंशी उसंत मिळाली आहे. त्याला व्याजदर कपातीची जोड मिळत आहे व आणखी मिळणे अपेक्षित आहे. यातून उद्योगक्षेत्रातही उभारी दृश्य स्वरूपात पुढे आलेली लवकरच दिसेल. ताळेबंदात सुधार घडेल, उत्पादकतेची पातळी पूर्वीच्या स्तरावर येईल आणि नव्याने गुंतवणूक करून उत्पादनक्षमता आणखी भक्कम केली जाईल.
अशा समयी गुंतवणूकदारांचा पवित्रा काय असावा, हा आपल्या दृष्टीने निश्चितच लाखमोलाचा प्रश्न आहे. २०१४ पासून ज्याला मोदी लाट म्हटले जाते त्यावर स्वार होऊन बाजाराच्या बहराचे अनेक गुंतवणूकदार आजवर लाभार्थी ठरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण यापुढे अधिक गांभीर्याने गुंतवणुकीकडे पाहणारया मंडळींनी प्रांगणात उतरण्याची हीच खरी वेळ आहे. या बदलत असलेल्या आíथक परिस्थितीचा गुंतववणूकदारांना लाभार्थी कसे बनता येईल, त्यांच्या गुंतवणुकीचे धोरण काय असावे? थेट बाजारात गुंतवणूक म्हणजे थोडी-बहुत जोखीमच, मग अधिकाधिक परतावे देऊ शकतील अशा फंड योजनांची निवड कशी करावी, या अशा प्रश्नांचा आपण सारांशात वेध घेऊ.
av-09

भारताच्या फेर-उभारीची गाथा घेऊन अनेक नव्या फंड योजना गुंतवणूकदारांना आकर्षति करण्यासाठी सरसावलेल्या आपण अनुभवत आहोत आणि यापुढेही हा परिपाठ सुरूच राहील. ही स्थिती सामान्य गुंतवणूकदारांना गोंधळून सोडणारी असते. अशा समयी गोंधळून न जाता ज्यांची कामगिरी सुस्थापित आहे आणि ज्या फंडांबाबत अनेकांगाने संशोधन- विश्लेषण झालेला ऐवज सामोरा आलेला आहे अशांना पसंती देणे श्रेयस्कर ठरेल. एक तर नव्याने येणारया फंडांची गुंतवणूक कोणत्या समभागांमध्ये होणार आहे अथवा बॅलेन्स्ड फंड असल्यास एकूण गुंतवणूक-भांडार (पोर्टफोलियो) कसा असेल हे आपल्याला गुंतवणूक होईपर्यंत बिलकुल ज्ञात नसते. दुसरे, हा फंड नव्यानेच दाखल होत असल्याने फंडाच्या पूर्वकामगिरीचा लेखाजोखाही आपल्यापुढे नसतो. तिसरे, भारत-उदयाच्या गाथेवर आपला विश्वास ठाम असेल तर केवळ एका फंडातील गुंतवणुकीने त्याचे लाभार्थी ठरण्याचा आपला प्रयत्न म्हणजे संभाव्य संधीबाबत मोठा जुगार ठरेल.
हा जुगार टाळायचा असल्यास गुंतवणुकीसंबंधाने सर्वागीण दृष्टिकोन बाळगला जायला हवा. काहीशी विविधता जपणारे गुंतवणूक भांडार (पोर्टफोलियो) बनविणे हा यावर उतारा ठरेल. या पोर्टफोलियोत एका वेळी किमान चार समजुतीने व अभ्यासपूर्णरीत्या निवडले गेलेले फंड असावेत. समभागसंलग्न (इक्विटी) आणि रोखे निगडित (डेट) अशा फंडातील ही विभागणी असेल. इक्विटी फंडात मग लार्ज कॅप, मिड-कॅप फंड अथवा अधिक व्यापक ढाचा असलेले फंड यांवर संमिश्र भर असू शकेल. डेट फंड निवडतानाही भारताच्या उदयगाथेवरच पहिला कटाक्ष हवा.
अर्थव्यवस्थेची वाटचाल सरळसोट नसते. वध-घटीच्या सुरू राहणारया आवर्तनातून वेगवेगळी उद्योगक्षेत्रे प्रभावित होत असतात त्याचप्रमाणे आपला गुंतवणुकीचा कलही बदलायला हवा. जसे घसरत्या व्याज दराचा आपण निवडलेल्या डेट फंडांना लाभ पोहचताना दिसायला हवा. मालमत्ता विभाजन (इक्विटी/ डेट), वर्गवार विभाजन (लार्ज, मिड, स्मॉल, मल्टि-कॅप) आणि अधिक तपशिलात जाऊन अर्थव्यवस्थेच्या फेरउभारीतून आजवर दुर्लक्षित, अवांचित राहिलेल्या कुठल्या विशिष्ट उद्योगक्षेत्र, उद्योगघटकांनाही उभारीचा वाव मिळेल तेथपर्यंत निवडीची व्याप्ती आपण वाढविली पाहिजे. हा अशा प्रकारचा दृष्टिकोन हा जोखीमरहित असेल आणि तो केवळ पोर्टफोलियो बनवूनच साधता येईल, नव्याने दाखल होणाऱ्या एका फंडातून नव्हे!
नियमित फेरआढावा व सुधारणा
काळजीपूर्वक निवड केलेल्या पोर्टफोलियोबाबत कायम दक्षताही आवश्यकच आहे. कोणताही पोर्टफोलियो हा अनादि काळासाठी स्थितप्रज्ञ असू शकत नाही. एकदाची गुंतवणूक करून मोकळे व्हा, पुढचे सारे विसरून जा असे आपल्या पशाबाबत बेपर्वा धोरण असू नये. बदलत्या आíथक पर्यावरणासह पोर्टफोलियोची नाडी सारखी तपासत राहायला हवे. किमान दर सहा महिन्यांनी पोर्टफोलियोचे अशी आरोग्य तपासणी व्हायला हवी.
विद्या बाला
(लेखिका फंड्स इंडिया डॉट कॉम या गुंतवणूकपूरक ऑनलाइन दालनाच्या म्युच्युअल फंड संशोधन विभागाच्या प्रमुख आहेत.)