News Flash

आर्थिक ध्येय: एक समस्या!

गुंतवणुकीत नियमितपणा आणायचा असेल आणि स्वत:ला एक प्रकारची शिस्त लावायची असेल तर ‘एसआयपी- सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ हा उत्तम पर्याय

| October 28, 2013 08:45 am

गुंतवणुकीत नियमितपणा आणायचा असेल आणि स्वत:ला एक प्रकारची शिस्त लावायची असेल तर ‘एसआयपी- सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ हा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गुंतवणुकीला आणि पर्यायाने आपल्या ध्येयपूर्तीच्या प्रयोजनाला आपसूकच मदत होते.
प्रत्येक व्यक्तीची काही स्वप्नं आणि ध्येयं असतात. ती पूर्ण करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती आणि जिद्द लागते. सचिन तेंडुलकर हे त्याचे उत्तम उदाहरण. त्याच्यासारखे नपुण्य असलेले अनेक होते आणि असतीलही. पण त्याने जे काही अचाट साध्य केले ते एकलव्यासारखी एकाग्रता आणि प्रचंड निर्धार या दोन गोष्टींमुळे. लहान मुलांच्या बाबतीतही कठोर शिस्त आणि नियमित देखरेख ठेवली तरच त्यांची शिक्षणाबाबतीत चांगली प्रगती होऊ शकते. मोठेपणीही वेळेवर आणि सुज्ञपणे गुंतवणूक केली तरच आíथक ध्येये साध्य होऊ शकतात.
उदाहरणार्थ, प्रकाशला तीन वर्षांचा मुलगा आहे. बारावीनंतर त्याला व्यावसायिक शिक्षणासाठी पसे लागणार आहेत. आज त्या शिक्षणाचा खर्च आहे ८ लाख रुपये आहे. प्रकाशला पुढील १५ वर्षांमध्ये किती रक्कम उभी करावी लागणार आहे? शिक्षण क्षेत्रातील भाववाढ आहे वार्षकि १० टक्के. त्यामुळे प्रकाशला मुलाच्या १८व्या वर्षी ३३.४३ लाख रु.ची गरज भासणार आहे. त्याने आजपासून मासिक ६,६२२ रु.ची गुंतवणूक केली तरच हे शक्य आहे. त्याने ५ वर्षांनंतर सुरुवात केली तर त्याच्या मासिक गुंतवणुकीची रक्कम होते १४,३८३ रु. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त. अनेक पालक मुलांच्या शिक्षणाच्या तरतुदीसाठी मुलांसाठीची पॉलिसी घेतात. अशा प्रकारच्या पॉलिसींमध्ये गुंतवणुकीवरील (वार्षकि प्रीमियम) परतावा असतो ५ ते ६ टक्के. प्रकाशने हा पर्याय निवडण्याचा विचार केला तर १५ वर्षांसाठीची त्याची गुंतवणुकीची रक्कम होते महिना ११,४३४ रु. जवळजवळ पावणेदोन पट.
वरील उदाहरणावरून एक गोष्ट लक्षात येते की, गुंतवणुकीचा काळ मोठा असला आणि योग्य पर्यायाची निवड केली तरच आणि तरच कमी पशात आणि योग्य वेळी ध्येयपूर्ती होऊ शकते. त्यात अळमटळम केली तर खिशाला ताण तरी जास्त पडतो किंवा वेळेवर पशाची तरतूद होत नाही. चक्रवाढ व्याजाला आपली किमया दाखविण्यासाठी जितका जास्त वेळ दिला जाईल तितकी गंगाजळी जास्त वाढेल आणि तीही आपल्या कल्पनेपलीकडील प्रमाणात. त्यामुळे आजच योग्य विचार करून सुरुवात करणे आवश्यक आहे. मॅल्टिनॅशनल कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांच्या भाषेत सांगायचे तर- ‘कालच सुरुवात करणे आवश्यक होते.’ आज सुरुवात केलीत तर आपण आधीच एक दिवस उशीर केलेला आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
गुंतवणुकीच्या बाबतीत सांभाळायची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील नियमितपणा. त्यामुळे गुंतवणुकीमधील जोखीम (investment risk) म्हणून जो प्रकार असतो त्यावर मात करता येते. बाजार कधी वर जातो तर कधी खाली जातो. व्याजाच्या दरांबाबतही ते कधी खाली-वर होतील याची सर्वसाधारण गुंतवणूकदाराला कल्पना नसते. त्यामुळे गुंतवणुकीमध्ये नियमितपणाची शिस्त असेल तर सरासरी साधली जाते.
कमाईच्या कालावधीमधील आíथक ध्येये साधायची असतील तर शेअर बाजारामधील गुंतवणुकीला पर्याय नाही. या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार त्यात प्रवेश केव्हा करायचा आणि नफा बांधून बाहेर केव्हा पडायचे याचा अंदाज बांधत असतात. त्याला ‘मार्केट टायिमग’ म्हणतात. खरे तर हा प्रकार अगदी परमेश्वरालाही शक्य नाही. त्यासाठी आíथक आवर्तन, जागतिक बाजारामधील घडामोडी वगरे गोष्टींचे नुसते ज्ञान असून चालत नाही, त्या गोष्टींचा बाजारावर नेमका काय परिणाम होणार आहे ते समजण्याचे कसबही लागते. त्यात भले भले मार खातात. या व्यतिरिक्त त्या कामाला पूर्ण वेळ देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, जे सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्याबाहेरचे आहे. नियमितपणे बचत आणि गुंतवणूक करीत राहिले तर वेळेची निवड करणे हा प्रकार उद्भवतच नाही.
गुंतवणुकीत नियमितपणा आणायचा असेल आणि स्वत:ला एक प्रकारची शिस्त लावायची असेल तर ‘एसआयपी- सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गुंतवणुकीला आणि पर्यायाने आपल्या ध्येयपूर्तीच्या प्रयोजनाला चार पॉवरफुल गोष्टींची मदत होते.
१)    भावांची सरासरी – ‘एसआयपी’द्वारा ठरावीक वेळी (आठवडा, महिना किंवा तिमाही) ठरावीक रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये खर्ची पडते आणि आपण निवड केलेल्या म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या खात्यामध्ये जमा होते. त्यामुळे आपल्या नकळत वेळेवर बचत आणि गुंतवणूक होते. आपसूकच गुंतवणुकीत एक प्रकारची शिस्त निर्माण होते. ठरावीक वेळी ठरावीक रकमेची गुंतवणूक झाल्यामुळे बाजार खाली असेल तर खालच्या भावातील एनएव्हीमुळे जास्त युनिट खात्यात जमा होतात. या विरुद्ध बाजार वर असेल तर कमी युनिट प्राप्त होतात. सर्वसाधारण गुंतवणूकदार बाजार वर असताना खरेदी करतो आणि नंतर तो खाली आला की बाजाराला दोष देऊन नुकसानीत बाहेर पडतो. एसआयपीमुळे हा धोका टाळता येतो.
२)    चक्रवाढ व्याजाची किमया- एसआयपीमुळे आपल्या गुंतवणुकीत चक्रवाढ व्याज या जबरदस्त अस्त्राचा वापर होतो. डिव्हिडंडची पुनर्गुतवणूक होत राहाते आणि त्यामुळे आपल्या कल्पनेपलीकडची गंगाजळी तयार होते.
 ३)    मार्केट टायिमग- गुंतवणुकीला सुरुवात केव्हा करावी हा प्रत्येक गुंतवणूकदारासमोरचा नेहमीचा प्रश्न असतो. वेळ बरोबर साधता आली तर प्रचंड नफा पदरात पडतो. परंतु ती जर चुकली तर फार मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागते. २००८च्या सुरुवातीला बाजार तेजीच्या टिपेला होता तेव्हा ज्यांनी एकरकमी गुंतवणूक केली आहे ते आजही नुकसानीत आहेत आणि २००९च्या मार्चमध्ये ज्यांनी एकरकमी गुंतवणूककेली आहे, ते आज चांगल्याच फायद्यात आहेत. ज्यांनी यापकी केव्हाही एसआयपी केली आहे ते आज बऱ्यापकी फायद्यात आहेत. एसआयपीमुळे मार्केट टायिमगचा धोका टाळता येतो.
४)    दैनंदिन खर्च- म्युच्युअल फंडाच्या एसआयपीद्वारा अगदी किरकोळ रकमेची गुंतवणूक करता येते (मासिक किमान १०० रु.). त्यामुळे दैनंदिन खर्चावर ताण पडत नाही.
थोडक्यात सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारामधील गुंतवणुकीचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी एसआयपी हा एक उपयुक्त पर्याय आहे.
शेअर बाजारामधील गुंतवणुकीसंबंधित एक सोपा फंडा आहे. जेव्हा सर्वसाधारण गुंतवणूकदार बाजाराबाबत उदास असतो, तेव्हा त्यात प्रवेश करावा आणि जेव्हा आम जनता (लिफ्टमन, पानवाला, रिक्षावाला, ऑफिसमधील प्यून वगरेंसकट) बाजाराबाबत वॉरेन बफेसारख्या अधिकारवाणीने चर्चा करू लागते तेव्हा आपला आपला नफा बांधून त्यातून बाहेर पडावे. सध्याची परिस्थिती अशी आहे की, बीएसई सेन्सेक्स २१,०००ची पातळी पार करून गेलेला असला तरी बाजारात ज्याना रिटेल इन्व्हेस्टर म्हणतात अशा सर्वसाधारण गुंतवणूकदारांचा सहभाग अगदीच नगण्य आहे. या गुंतवणूकदारांची रोजची उलाढाल आहे रु. ४६१५ कोटी. २००८च्या तेजीमध्ये ही उलाढालीची रक्कम होती रु. १३,७०९ कोटी. आज जवळजवळ ६७ टक्के खाली. २००३च्या आसपास तेजीला सुरुवात झाली त्यावेळी हीच उलाढाल होती रु. ४३६७ कोटी म्हणजे आज किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग साधारणत: २००३ सालाइतका आहे. ही झाली वरकरणी आकडेमोड. खोलात जाऊन विचार केला आणि २००३ सालच्या दैनिक उलाढालीला (रु. ४३६७ कोटी) भाववाढीचा कस लावला (वार्षकि ७ टक्के) तर आज १० वर्षांनी ती रक्कम होते रु. ८५९० कोटी म्हणजे प्रत्यक्षात आजची किरकोळ गुंतवणूकदारांची बाजारातील दैनिक उलाढाल २००३ पेक्षाही ४७ टक्के कमी आहे. आíथक क्षेत्रामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. त्या नियमानुसार शेअर बाजारामध्ये ही कमी झालेली उलाढाल कालांतराने वाढणार आहे. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही एक जमेची बाजू आहे.
गुंतवणुकीच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जिचा सर्वसाधारणपणे विचार केला जात नाही. कमाईपेक्षा कमी रक्कम खर्च करणे म्हणजे बचत. परंतु भाववाढीच्या भस्मासुरामुळे आपण जी बचत करीत असतो त्या रकमेची बाजारी किंमत दरवर्षी कमी होत असते. त्यावर मात करण्यासाठी भाववाढीच्या प्रमाणात बचत वाढविणे आवश्यक आहे आणि त्यानुसार एसआयपीच्या रकमेत वाढ केली तर आíथक ध्येये साध्य करण्यास मदत तर होईलच आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करूनही निवृत्तीनंतरच्या काळासाठी भली मोठी गंगाजळी तयार होईल.
(लेखक गुंतवणूक आणि विमा सल्लागार आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 8:45 am

Web Title: economic goal a problem
टॅग : Investment
Next Stories
1 हायब्रिड फंड
2 गृहकर्ज हवे आहे? आधी मंजुरीचे निकष समजून घ्या!
3 पावत्या-कागदपत्रे गहाळ
Just Now!
X