av-02फंडाविषयक विवरण
फंड प्रकार    :    समभाग गुंतवणूक
जोखीम प्रकार     :    समभाग गुंतवणूक असल्याने जोखीम अधिक (मुद्दलाची खात्री नाही)
गुंतवणूक    :    हा लार्ज कॅप प्रकारचा फंड आहे. गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांच्या आधी गुंतवणूक काढून घेतल्यास एक टक्का निर्गमन शुल्क लागू होते. एका वर्षांनंतर गुंतवणूक  बाहेर पडल्यास काहीही शुल्क अधिभार लागत नाही. ‘सीएनएक्स निफ्टी’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे.
फंड गंगाजळी     : फंडाची मालमत्ता ८१.६१ कोटी रु. ३१/०७/२०१५ रोजी
निधी व्यवस्थापक     :    काíतक सोरल हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. बनारस िहदू विद्यापीठातून केमिकल इंजिनियिरग विषयातील पदवी आणि आयआयएम अहमदाबाद येथून वित्तीय व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका त्यांनी घेतली आहे. ते एडेल्वाइज म्युच्युअल फंडात दाखल होण्याआधी लार्सन अँड टुब्रोच्या उपकंपन्यांचे गुंतवणूकविषयक कामकाज पाहात होते. यापूर्वी त्यांनी डॉईशे बँक व टीसीएस या ठिकाणी जबाबदारीची पदे भूषविली आहेत. या फंडाव्यतिरिक्त ‘एडेल्वाइज अ‍ॅबस्योल्युट रिटर्न फंड’ या फंडाचे ते निधी व्यवस्थापक आहेत.
गुंतवणूक पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड)
अन्य माहिती    :    फंड घराण्याच्या http://www.edelweissmf.com या संकेतस्थळावरून थेट खरेदी वा फंड विक्रेत्यामार्फत
av-03av-01
शेअर बाजारात नेहमीच तेजी मंदीचा खेळ सुरू असतो. दिनांक २९ जूनच्या अर्थवृत्तान्तने एका म्युच्युअल फंड घराण्याच्या उच्चपदस्थाच्या मुलाखतीचा हवाला देत बाजाराला लवकरच मोठय़ा घसरणीला सामोरे जावे लागण्याचे भाकीत वर्तविले होते. परंतु दीर्घकालीन तेजीच्या आवर्तनात असे अल्पकालीन मंदीचे प्रवाह येतच असतात. जसे २०१४ मध्ये बाजाराचे निर्देशांक एकाच दिशेने वाढत होते. परंतु २०१५ मध्ये तसे नाही. २०१५ मध्ये निर्देशांक वर-खाली होत आहेत. तेजी असो वा मंदी दोन्ही परिस्थितीत संदर्भ निर्देशांकापेक्षा अव्वल कामगिरी करणे हे या फंडाचे उद्दिष्ट आहे. हा फंड लार्ज कॅप फंड आहे. चालू आठवडय़ातील बहुसंख्य फंडांच्या एनएव्हीच्या नुसार मागील एका वर्षांचा परतावा सरासरी सहा टक्के नकारात्मक असून ‘निफ्टी’ने सरलेल्या ऑगस्ट महिन्यात सात टक्के घट नोंदविली आहे. अशा परिस्थितीत मध्यम व फारशी जोखीम न घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी लार्ज कॅप फंड गुंतवणुकीसाठी योग्य आहेत. साधारण असा समज आहे की लार्ज कॅप समभागांचा बाजारातील भाव नेहमीच आपल्या पूर्ण मूल्यांकनाच्या जवळपास असतो. निधी व्यवस्थापकाला एका मर्यादित परिघात गुंतवणूक करून परताव्याचा दर वाढविता येतो. हा दर वाढविण्यासाठी विविध उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक कमी अधिक करण्याचा पर्याय निधी व्यवस्थापकांना असतो. हा फंड निफ्टीतील आघाडीच्या कंपन्यांचे समभाग निवडून निधी व्यवस्थापक आपल्या कौशल्याने बाजारातील परिस्थितीनुसार या उद्योगक्षेत्रातील गुंतवणूक कमी अधिक करतो. २१ मे २००९ रोजी फंडाची पहिली एनएव्ही जाहीर झाली. फंडाने सुरुवातीच्या दिवसापासून एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना २७ ऑगस्टच्या एनएव्हीनुसार १८.३५ टक्के परतावा दिला आहे. सध्याच्या वर खाली होणाऱ्या बाजारात एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करून नफा कमावण्याची इच्छा असणाऱ्या गुंतवणुकदारांनी या फंडाचा नक्की विचार करावा.
research@fundsupermart.co.in