दोनच महिन्यांपूर्वी फिनिक्स लॅम्प्स या कंपनीचे ५१% भागभांडवल खरेदी करणारी सुप्रजीत इंजिनीयिरग ही कंपनी जाणत्या गुंतवणूकदारांना तशी नवीन नाही. सुप्रजीत ही भारतातील सर्वात मोठी केबल उत्पादन करणारी कंपनी असून बहुतांशी वाहन उत्पादक कंपन्यांना ती आपली उत्पादने पुरवते. भारतीय बाजारपेठेत सुप्रजीतचा हिस्सा ८०% आहे. टीव्हीएस आणि यामाहा या दोन्ही दुचाकींसाठी केबल्सचा १००% पुरवठा सुप्रजीत कडून होतो. परंतु आजवर केवळ केबल्स या एकाच उत्पादनावर भिस्त असणाऱ्या या कंपनीने आता मात्र इतरही पूरक उत्पादनांना सुरुवात केली आहे. फिनिक्स लॅम्प्स ताब्यात घेतल्यामुळे आता सुप्रजीतने हॅलोजन लॅम्पमध्ये देखील मुसंडी मारली आहे. त्यामुळे आता दुचाकी वाहनाखेरीज चार चाकी वाहनाची बाजारपेठ देखील कंपंनीच्या ताब्यात येईल.
यंदाच्या आíथक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून कंपनीने १६८.२४ कोटी उलाढालीवर (१०% वाढ)  १३.९१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गत वर्षीच्या तुलनेत तो ३०.४९ टक्क्य़ांनी वाढला आहे. कंपनीने नुकताच देशीन मशीनरी या कोरियन कंपनीशी भारतात गीयर शिफ्टर्स आणि पाìकग ब्रेक लीव्हर्सचे उत्पादन करण्यासंबंधात करार केला आहे. तामिळनाडू आणि गुजरात या दोन्ही राज्यातील प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून या आíथक वर्षांच्या अखेरीस तेथून उत्पादनाला सुरुवात होईल अशी आशा आहे. येत्या दोन वर्षांत ही कंपनी तुम्हाला चांगला फायदा करून देईल. बाग्रेन हंटर्ससाठी ही एक उत्तम गुंतवणूक ठरू शकते.

Arth-table

stocksandwealth@gmail.com
सूचना : लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.