20 January 2021

News Flash

बंदा रुपया : पारदर्शकतेचे ‘प्रीमियम’!

मुंबईतील मोनिका कुष्टे यांच्या स्व-हेल्थच्या उत्पादनांना मात्र अशा कोणत्याही लेबलांची गरज भासत नाही.

entrepreneur from maharashtra Monica Rahul Kushte Kushte Food Products Private Limited zws 70 बंदा रुपया : पारदर्शकतेचे ‘प्रीमियम’! लोकांची अभिरुची ही मिळकत वाढते तशी बदलत असते म्हणतात. म्हणजे आर्थिक कुवतीत बदल हा लोकांच्या जीवनशैलीतही बदल घडवत असतो. अधिक सकस, सात्त्विक अन्नग्रहणाकडे लोकांचा कल वाढतो. अलीकडे हे सकस आणि सात्त्विक म्हणजेच सेंद्रिय अर्थात ऑरगॅनिक फूड असे एक समीकरण बनू पाहत आहे. बाजारपेठेतील या उत्पादनांचा वाढता उपभोग तरी हेच दर्शवितो. अशा ऑरगॅनिक टॅगसाठी लोक हँडसम किंमतदेखील मोजतात. अगदी बिनदिक्कत, कशाचीही शहानिशा अथवा चाचपणी न करता. याच मालिकेत आता ‘घरगुती’, ‘गावरान’, ‘चुलीवरचे’ अशा ग्राहक खेचून आणण्यासाठी अत्यावश्यक ठरू पाहत असलेल्या काही बोधखुणाही जमेस धरता येतील. मुंबईतील मोनिका कुष्टे यांच्या स्व-हेल्थच्या उत्पादनांना मात्र अशा कोणत्याही लेबलांची गरज भासत नाही. काळाच्या पडद्याआड गेलेल्या लाकडी घाण्यावरची खाद्यतेल आणि दगडी जात्यावर दळलेले पीठ ही स्व-हेल्थची उत्पादने आणि तितकीच त्यांची ओळख! त्या पल्याड छानछौकी नाही, झगमगीत पॅकेजिंगचा देखावा नाही; जे काही आहे ते लोकांपुढे पारदर्शकतेने मांडायचे; पटले त्यांनी विकत घेतले, असा हा सरळसोट फंडा आहे. हे असे जरी असले तरी ही पारदर्शकताच त्यांच्या उत्पादनांसाठीही प्रीमियम मोलाची ठरत आहे. दोघेही कमावते असलेले डबल इन्कम जोडपे म्हणजे मोनिका आणि राहुल कुष्टे. देशस्तरावर आधुनिक किराणा विक्री दालनांची साखळी असणाऱ्या समूहात वरिष्ठ व्यवस्थापनात मोनिका कुष्टे-खामकर कार्यरत. लालबागची मसाला गल्ली आणि खामकर मसाले या नाममुद्रेचा वेगळा परिचय देण्याची गरज नाही. हे मसाले व्यावसायिक घराणे हेच मोनिका यांचे माहेर. त्यामुळे घरातूनच त्या स्व-व्यवसायाचे बाळकडू आणि संस्कार मिळवत आल्या आहेत. मात्र ‘स्व-हेल्थ’सारख्या अनोख्या उत्पादनांकडे त्या वळल्या, त्यालाही एक गोष्ट कारण ठरली. मागे एका आजारपणानिमित्त काही आवश्यक वैद्यकीय तपासण्या त्यांनी केल्या. त्या वेळी त्यांच्या हृदयाचे आरोग्यमान काळजी करावी या स्थितीत असल्याचे डॉक्टरांनी निदान केले. अर्थात काळजी म्हणून खाण्या-पिण्याबाबत विशिष्ट पथ्यांचे कठोरपणे पालन करणे ओघाने आलेच. स्वच्छ, स्वास्थ्यवर्धक आणि स्वादिष्ट उत्पादनांचा शोध मग सुरू झाला. मोनिका सांगतात, ‘‘रोजच्या ताठात येणाऱ्या खाद्यान्नांच्या किमान स्वास्थ्यपूरकतेच्या निकषांची यानिमित्ताने उजळणी झाली. मात्र पुढे जे जोखले-अनुभवले ते धक्कादायकच. बाजारात उपलब्ध असलेली प्रीमियम ब्रँडेड, महागडी उत्पादने अगदी नैसर्गिक, ऑरगॅनिक म्हणून मिरविणारी उत्पादनेही स्वास्थ्यपूरकतेच्या निकषावर सपशेल नापास ठरत असल्याचे लक्षात आले. यातूनच मग काही वेगळी वाट चोखाळता येईल काय, या दिशेने विचारचक्र सुरू झाले. निदान प्रक्रिया केलेली उत्पादने म्हणजे खाद्यतेल, पीठ, मसाले यांच्या बाबतीत तरी चांगला पर्याय देण्याच्या प्रयत्नांतून अखेर उत्तर सापडले. आपल्या ग्रामीण जीवनाचा कधीकाळी अविभाज्य भाग असलेल्या घाणे आणि जात्याकडे घेऊन जाणारे ते उत्तर होते.’’ अशा तऱ्हेने वैयक्तिक स्वास्थ्याची गरज म्हणून सुरू झालेला ध्यास पुढे ओघाने व्यवसायात बदलला. आरोग्यदायी जीवनासाठी स्वच्छ, स्वास्थ्यवर्धक, स्वादिष्ट अन्नग्रहणाचा हा मार्ग इतरांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांत २०१७ सालात ‘स्व-हेल्थ’ची पायाभरणी झाली. सुरुवात दगडी जात्यावरील धान्याच्या पिठापासून झाली. गहू, तांदूळ, चणा, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि थालीपीठ अशा सात प्रकारचे पीठ गरजेप्रमाणे पाच किलो, एक किलोच्या आकारात दळायला सुरुवात झाली. दोन दगडी वर्तुळाकार तळ्या असणाऱ्या परंपरागत जात्याचीच सुधारित आवृत्ती म्हणजेच मानवी श्रमाऐवजी विद्युतशक्तीचा वापर असणाऱ्या दळण यंत्राचा वापर त्यांनी सुरू केला. ‘‘भारतात पीठ हे गरजेइतकेच दळण्याची परंपरा आहे आणि शास्त्रीयदृष्टय़ा ते योग्यही आहे. म्हणूनच पहाटे उठून ओव्या गात गात जाते फिरवत त्या त्या दिवसाच्या भाकरीपुरते पीठ स्त्रिया काढत असत. आपल्याकडे जाते आणि त्यावरील ओव्यांचे भावविश्व इतके मोठे आहे की, अशा जवळपास ३०,००० ओव्या राज्याच्या विविध भागांतून संग्रहित करता येतील. अर्थात पुढे जात्याच्या जागी पिठाची गिरण आली तरी त्या त्या ठिकाणच्या लोकांची गरज भागवू शकतील अशा या गिरण्या लहान व विखुरलेल्या स्वरूपातच राहिल्या. पाश्चत्त्य देशाप्रमाणे प्रचंड गिरण्या उभारून, त्यातून तयार केलेले पीठ पाकिटबंद स्वरूपात विकण्याची प्रथा ही अलीकडे रुजू पाहत आहे. असे तीन-तीन महिने साठवण कालमर्यादा (शेल्फ लाइफ) असणारा ब्रँडेड आटा सध्या बाजारात मिळतो. अजस्र यंत्रात घर्षणाने तापमान कमालीचे वाढून तयार झालेले हे पीठ, तेही इतक्या दीर्घावधीनंतर वापरात आणल्यास ते नि:सत्त्व तर ठरतेच. पण प्रसंगी खाण्यास अपायकारकही ठरते,’’ असे मोनिका सांगतात. त्याउलट एकदा दळलेले पीठ हे जास्तीतजास्त आठ ते १० दिवसांत वापरून संपविणे हितकारक. शिवाय दगडी जात्यावर दळलेल्या धान्याचे तापमान फार वाढण्याची शक्यताही नसते, ज्यामुळे त्यातील सत्त्वही टिकून राहते, असे त्या सांगतात. ब्रँडेड पिठाप्रमाणेच बाजारात उपलब्ध असणाऱ्या रिफाइंड खाद्यतेलाचे उत्पादनही उच्च तापमानाला होत असते. उच्च तापमानावर आधारित या निर्मिती प्रक्रियेत तेलातील सर्व प्रोटिन, जीवनसत्त्व, नैसर्गिक सुवास व स्वाद जवळपास नष्ट होत असतो. त्याउलट स्थिती नैसर्गिक पद्धतीने घाण्यावर तयार होणाऱ्या अर्थात कोल्ड-प्रेस्ड पद्धतीच्या निर्मिती प्रक्रियेची आहे. याशिवाय आज स्व-हेल्थची लाकडी घाण्यावरून मिळविलेल्या खाद्यतेलाचे १० प्रकार उपलब्ध आहेत. लालबहादूर शास्त्री मार्गावरील भारत इंडस्ट्रियल इस्टेटम, भांडुप येथील स्व-हेल्थच्या विक्री दालनात येणाऱ्या ग्राहकाला, त्याच्या डोळ्यादेखत पारदर्शक भिंतीपल्याड घाण्यातून गळणारे तेल पाहून खात्री करता येते. मोनिका सांगतात, ‘‘भुईमूग, खोबरे अथवा तेलबियांपासून तेल गाळण्याची ही कोल्ड-प्रेस्ड पद्धतच पोषण घटकात कमालीची वाढ करतेच. शिवाय त्याचे अनेकविध फायदे आहेत.’’ या फायद्यांची त्या लांबलचक जंत्रीच आपल्यापुढे ठेवतात. अशा तेलात कृत्रिम रक्षक द्रव्यांचा (प्रीझव्‍‌र्हेटिव्ह) वापर करण्याची गरज भासत नाही. तेलाला अस्सल स्वाद लाभल्याने ते थोडके वापरले तरी जेवणाची लज्जत वाढविते. शिवाय मुळातच निम्न तापमानात ते तयार झाल्याने, तळणीसाठी तेलाचा अनेकवार वापरही शक्य झाल्याने ते किफायतीही ठरते. पुढे जाऊन विशेषत: पिठाच्या उत्पादनांत नवउद्योजिकांना सामावून घेण्याचा मोनिका यांचा मानस आहे. करोनाकाळातील टाळेबंदी आणि संचारावर निर्बंध असताना, पुरवठाशृंखलेत जाणवलेल्या अडचणी लक्षात घेता अशा प्रकारे विस्तार आवश्यकच असल्याचे ते सांगतात. अगदी बचतगटात कार्यरत महिलांना जरी पुढाकार दाखविला तरी त्यांना हा उद्योग त्यांच्या ठिकाणी सुरू करून देण्यासाठी सर्व ती प्रकारची मदत करण्याची त्यांची तयारी आहे. शरीरारोग्यास अपायकारक मानले गेलेले तेल, हे निर्मिती प्रक्रियेत बदल करून प्रत्यक्षात शरीर स्वास्थ्यवर्धक बनू शकते; सात्त्विक, शुद्ध अन्नग्रहणाने शरीरातील अनेक दोष-व्याधींना नियंत्रित करण्यास मदत मिळते, हा स्व-हेल्थने दिलेला कानमंत्र आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हे काही नवसंशोधन नाही, तर आपल्या संस्कृतीतील परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाचीच परंतु विस्मृतीत गेलेली ती देणगी आहे. हे प्राकृत संचित जसे आहे तसे लोकांसाठी परवडेल अशा किमतीत खुला करणे हेच स्व-हेल्थचे खरे मोल आहे. मोनिका राहुल कुष्टे स्व-हेल्थ / कुष्टे फूड प्रॉडक्ट्स प्रा. लि. *’ व्यवसाय : पीठ, खाद्यतेल उत्पादन * कार्यान्वयन : २०१७ साली * प्राथमिक गुंतवणूक : २ लाख रुपये * सध्याची उलाढाल : वार्षिक ४० लाख रु. * कर्मचारी संख्या : नियमित १० कर्मचारी * संकेतस्थळ : www.svahealth.in - सचिन रोहेकर ‘स्व-हेल्थ’ची खाद्यतेल उत्पादने, त्यांचे गुणविशेष सांगणारी दुकानाच्या दर्शनी भागातील पाटी.

लोकांची अभिरुची ही मिळकत वाढते तशी बदलत असते म्हणतात. म्हणजे आर्थिक कुवतीत बदल हा लोकांच्या जीवनशैलीतही बदल घडवत असतो. अधिक सकस, सात्त्विक अन्नग्रहणाकडे लोकांचा कल वाढतो. अलीकडे हे सकस आणि सात्त्विक म्हणजेच सेंद्रिय अर्थात ऑरगॅनिक फूड असे एक समीकरण बनू पाहत आहे. बाजारपेठेतील या उत्पादनांचा वाढता उपभोग तरी हेच दर्शवितो. अशा ऑरगॅनिक टॅगसाठी लोक हँडसम किंमतदेखील मोजतात. अगदी बिनदिक्कत, कशाचीही शहानिशा अथवा चाचपणी न करता. याच मालिकेत आता ‘घरगुती’, ‘गावरान’, ‘चुलीवरचे’ अशा ग्राहक खेचून आणण्यासाठी अत्यावश्यक ठरू पाहत असलेल्या काही बोधखुणाही जमेस धरता येतील. मुंबईतील मोनिका कुष्टे यांच्या स्व-हेल्थच्या उत्पादनांना मात्र अशा कोणत्याही लेबलांची गरज भासत नाही. काळाच्या पडद्याआड गेलेल्या लाकडी घाण्यावरची खाद्यतेल आणि दगडी जात्यावर दळलेले पीठ ही स्व-हेल्थची उत्पादने आणि तितकीच त्यांची ओळख! त्या पल्याड छानछौकी नाही, झगमगीत पॅकेजिंगचा देखावा नाही; जे काही आहे ते लोकांपुढे पारदर्शकतेने मांडायचे; पटले त्यांनी विकत घेतले, असा हा सरळसोट फंडा आहे. हे असे जरी असले तरी ही पारदर्शकताच त्यांच्या उत्पादनांसाठीही प्रीमियम मोलाची ठरत आहे.

दोघेही कमावते असलेले डबल इन्कम जोडपे म्हणजे मोनिका आणि राहुल कुष्टे. देशस्तरावर आधुनिक किराणा विक्री दालनांची साखळी असणाऱ्या समूहात वरिष्ठ व्यवस्थापनात मोनिका कुष्टे-खामकर कार्यरत. लालबागची मसाला गल्ली आणि खामकर मसाले या नाममुद्रेचा वेगळा परिचय देण्याची गरज नाही. हे मसाले व्यावसायिक घराणे हेच मोनिका यांचे माहेर. त्यामुळे घरातूनच त्या स्व-व्यवसायाचे बाळकडू आणि संस्कार मिळवत आल्या आहेत. मात्र ‘स्व-हेल्थ’सारख्या अनोख्या उत्पादनांकडे त्या वळल्या, त्यालाही एक गोष्ट कारण ठरली.

मागे एका आजारपणानिमित्त काही आवश्यक वैद्यकीय तपासण्या त्यांनी केल्या. त्या वेळी त्यांच्या हृदयाचे आरोग्यमान काळजी करावी या स्थितीत असल्याचे डॉक्टरांनी निदान केले. अर्थात काळजी म्हणून खाण्या-पिण्याबाबत विशिष्ट पथ्यांचे कठोरपणे पालन करणे ओघाने आलेच. स्वच्छ, स्वास्थ्यवर्धक आणि स्वादिष्ट उत्पादनांचा शोध मग सुरू झाला. मोनिका सांगतात, ‘‘रोजच्या ताठात येणाऱ्या खाद्यान्नांच्या किमान स्वास्थ्यपूरकतेच्या निकषांची यानिमित्ताने उजळणी झाली. मात्र पुढे जे जोखले-अनुभवले ते धक्कादायकच. बाजारात उपलब्ध असलेली प्रीमियम ब्रँडेड, महागडी उत्पादने अगदी नैसर्गिक, ऑरगॅनिक म्हणून मिरविणारी उत्पादनेही  स्वास्थ्यपूरकतेच्या निकषावर सपशेल नापास ठरत असल्याचे लक्षात आले. यातूनच मग काही वेगळी वाट चोखाळता येईल काय, या दिशेने विचारचक्र सुरू झाले. निदान प्रक्रिया केलेली उत्पादने म्हणजे खाद्यतेल, पीठ, मसाले यांच्या बाबतीत तरी चांगला पर्याय देण्याच्या प्रयत्नांतून अखेर उत्तर सापडले. आपल्या ग्रामीण जीवनाचा कधीकाळी अविभाज्य भाग असलेल्या घाणे आणि जात्याकडे घेऊन जाणारे ते उत्तर होते.’’

अशा तऱ्हेने वैयक्तिक स्वास्थ्याची गरज म्हणून सुरू झालेला ध्यास पुढे ओघाने व्यवसायात बदलला. आरोग्यदायी जीवनासाठी स्वच्छ, स्वास्थ्यवर्धक, स्वादिष्ट अन्नग्रहणाचा हा मार्ग इतरांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांत २०१७ सालात ‘स्व-हेल्थ’ची पायाभरणी झाली. सुरुवात दगडी जात्यावरील धान्याच्या पिठापासून झाली. गहू, तांदूळ, चणा, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि थालीपीठ अशा सात प्रकारचे पीठ गरजेप्रमाणे पाच किलो, एक किलोच्या आकारात दळायला सुरुवात झाली. दोन दगडी वर्तुळाकार तळ्या असणाऱ्या परंपरागत जात्याचीच सुधारित आवृत्ती म्हणजेच मानवी श्रमाऐवजी विद्युतशक्तीचा वापर असणाऱ्या दळण यंत्राचा वापर त्यांनी सुरू केला.

‘‘भारतात पीठ हे गरजेइतकेच दळण्याची परंपरा आहे आणि शास्त्रीयदृष्टय़ा ते योग्यही आहे. म्हणूनच पहाटे उठून ओव्या गात गात जाते फिरवत त्या त्या दिवसाच्या भाकरीपुरते पीठ स्त्रिया काढत असत. आपल्याकडे जाते आणि त्यावरील ओव्यांचे भावविश्व इतके मोठे आहे की, अशा जवळपास ३०,००० ओव्या राज्याच्या विविध भागांतून संग्रहित करता येतील. अर्थात पुढे जात्याच्या जागी पिठाची गिरण आली तरी त्या त्या ठिकाणच्या लोकांची गरज भागवू शकतील अशा या गिरण्या लहान व विखुरलेल्या स्वरूपातच राहिल्या. पाश्चत्त्य देशाप्रमाणे प्रचंड गिरण्या उभारून, त्यातून तयार केलेले पीठ पाकिटबंद स्वरूपात विकण्याची प्रथा ही अलीकडे रुजू पाहत आहे. असे तीन-तीन महिने साठवण कालमर्यादा (शेल्फ लाइफ) असणारा ब्रँडेड आटा सध्या बाजारात मिळतो. अजस्र यंत्रात घर्षणाने तापमान कमालीचे वाढून तयार झालेले हे पीठ, तेही इतक्या दीर्घावधीनंतर वापरात आणल्यास ते नि:सत्त्व तर ठरतेच. पण प्रसंगी खाण्यास अपायकारकही ठरते,’’ असे मोनिका सांगतात.

त्याउलट एकदा दळलेले पीठ हे जास्तीतजास्त आठ ते १० दिवसांत वापरून संपविणे हितकारक. शिवाय दगडी जात्यावर दळलेल्या धान्याचे तापमान फार वाढण्याची शक्यताही नसते, ज्यामुळे त्यातील सत्त्वही टिकून राहते, असे त्या सांगतात.

ब्रँडेड पिठाप्रमाणेच बाजारात उपलब्ध असणाऱ्या रिफाइंड खाद्यतेलाचे उत्पादनही उच्च तापमानाला होत असते. उच्च तापमानावर आधारित या निर्मिती प्रक्रियेत तेलातील सर्व प्रोटिन, जीवनसत्त्व, नैसर्गिक सुवास व स्वाद जवळपास नष्ट होत असतो. त्याउलट स्थिती नैसर्गिक पद्धतीने घाण्यावर तयार होणाऱ्या अर्थात कोल्ड-प्रेस्ड पद्धतीच्या निर्मिती प्रक्रियेची आहे.

याशिवाय आज स्व-हेल्थची लाकडी घाण्यावरून मिळविलेल्या खाद्यतेलाचे १० प्रकार उपलब्ध आहेत. लालबहादूर शास्त्री मार्गावरील भारत इंडस्ट्रियल इस्टेटम, भांडुप येथील  स्व-हेल्थच्या विक्री दालनात येणाऱ्या ग्राहकाला, त्याच्या डोळ्यादेखत पारदर्शक भिंतीपल्याड घाण्यातून गळणारे तेल पाहून खात्री करता येते. मोनिका सांगतात, ‘‘भुईमूग, खोबरे अथवा तेलबियांपासून तेल गाळण्याची ही कोल्ड-प्रेस्ड पद्धतच पोषण घटकात कमालीची वाढ करतेच. शिवाय त्याचे अनेकविध फायदे आहेत.’’

या फायद्यांची त्या लांबलचक जंत्रीच आपल्यापुढे ठेवतात. अशा तेलात कृत्रिम रक्षक द्रव्यांचा (प्रीझव्‍‌र्हेटिव्ह) वापर करण्याची गरज भासत नाही. तेलाला अस्सल स्वाद लाभल्याने ते थोडके वापरले तरी जेवणाची लज्जत वाढविते. शिवाय मुळातच निम्न तापमानात ते तयार झाल्याने, तळणीसाठी तेलाचा अनेकवार वापरही शक्य झाल्याने ते किफायतीही ठरते.

पुढे जाऊन विशेषत: पिठाच्या उत्पादनांत नवउद्योजिकांना सामावून घेण्याचा मोनिका यांचा मानस आहे. करोनाकाळातील टाळेबंदी आणि संचारावर निर्बंध असताना, पुरवठाशृंखलेत जाणवलेल्या अडचणी लक्षात घेता अशा प्रकारे विस्तार आवश्यकच असल्याचे ते सांगतात. अगदी बचतगटात कार्यरत महिलांना जरी पुढाकार दाखविला तरी त्यांना हा उद्योग त्यांच्या ठिकाणी सुरू करून देण्यासाठी सर्व ती प्रकारची मदत करण्याची त्यांची तयारी आहे.

शरीरारोग्यास अपायकारक मानले गेलेले तेल, हे निर्मिती प्रक्रियेत बदल करून प्रत्यक्षात शरीर स्वास्थ्यवर्धक बनू शकते; सात्त्विक, शुद्ध अन्नग्रहणाने शरीरातील अनेक दोष-व्याधींना नियंत्रित करण्यास मदत मिळते, हा स्व-हेल्थने दिलेला कानमंत्र आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हे काही नवसंशोधन नाही, तर आपल्या संस्कृतीतील परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाचीच परंतु विस्मृतीत गेलेली ती देणगी आहे. हे प्राकृत संचित जसे आहे तसे लोकांसाठी परवडेल अशा किमतीत खुला करणे हेच स्व-हेल्थचे खरे मोल आहे.

मोनिका राहुल कुष्टे  स्व-हेल्थ / कुष्टे फूड प्रॉडक्ट्स प्रा. लि.

*’ व्यवसाय  :         पीठ, खाद्यतेल उत्पादन

* कार्यान्वयन  :       २०१७  साली

* प्राथमिक गुंतवणूक :   २  लाख रुपये

* सध्याची उलाढाल :           वार्षिक ४० लाख रु.

* कर्मचारी संख्या  :  नियमित  १० कर्मचारी

* संकेतस्थळ : www.svahealth.in

सचिन रोहेकर

 

x

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2020 12:04 am

Web Title: entrepreneur from maharashtra monica rahul kushte kushte food products private limited zws 70
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे :  आर्थिक स्वावलंबन प्रत्येकीसाठी!
2 बाजाराचा तंत्र कल : ही चाल तुरू तुरू
3 अर्थ वल्लभ : मूर्ती लहान, पण..
Just Now!
X