niyojanगुंतवणुकीत समभाग व रोखे यांचे कोणत्या वयात काय प्रमाण असावे याचे नियम ढोबळमानाने ठरले आहेत. सर्वसाधारणपणे समभागसदृश्य गुंतवणूक किती असावी याचे उत्तर १०० वजा तुमचे सध्याचे वय असे देता येईल. पण व्यक्तीसापेक्ष या नियमांत डोळसपणे बदल जरूर करावा. जोखीम स्वीकारण्याची क्षमता, आíथक ध्येये यानुसार हे प्रमाण जरूर बदलावयास हरकत नाही.
तोंडाला एकदा का रंग लागला की त्या रंगाची नशा आयुष्यभर असते. असे एक वाक्य अनेक रंगकर्मीकडून ऐकायला मिळते. या वर्षांतील शेवटच्या भागात अभिनयाच्या आवडीसाठी मुदतपूर्व निवृत्ती घेऊन आयुष्याच्या उत्तरार्धात अभिनय व रंगभूमीशी संबंधित आपल्या आवडीचे काम करू इच्छिणाऱ्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेल्या संपदा कुमठेकर (३७) यांचे नियोजन जाणून घेऊ. त्यांचे वडील त्यांच्या लहानपणी निवर्तले. वडिलांच्या पश्चात आईने त्यांना वाढविले. संपदा या प्रोबेशनरी अधिकारी भरतीची परीक्षा देऊन एका राष्ट्रीयीकृत बँकेत भरती झाल्या. एका वर्षांपूर्वी १२ वर्षांची राष्ट्रीयीकृत बँकेतील नोकरी सोडून संपदा कुमठेकर या एका खाजगी बँकेत सध्या नोकरी करीत आहेत. चांगली रोकड सुलभता असूनही बचत मात्र मोठी दिसत नाही ही त्यांची खंत आहे. आपले आíथक नियोजन योग्य मार्गावर आहे अथवा नाही हे जाणून घेण्याची संपदा यांची इच्छा होती या कारणाने त्यांनी नियोजनासाठी विनंती केली. १२ वर्षांच्या नोकरीनंतर त्या दुसऱ्या क्रमांकाच्या खासगी बँकेत दाखल झाल्या निवृत्तीच्या वयाच्या १० वष्रे आधी त्यांचा नोकरी सोडण्याचा विचार आहे. म्हणजे पुढील १२ वष्रे त्या कमावत्या राहणार आहेत. त्या करणार असलेली गुंतवणूक थोडी जास्त जोखीमीची असली तरी त्यांची त्यास हरकत नसून गुंतवणूक कार्यक्षम असावी हा यांचा कटाक्ष आहे. त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार त्यांचे नियोजन त्यांना सुचविण्यात आली आहे.  
संपदा कुमठेकर यांच्यावर आज आíथक जबाबदारी नाही. भविष्यात त्यांचा घरासाठी कर्ज घेण्याचा विचार नाही. सबब त्यांना मुदतीचा विमा घेण्याची शिफारस केलेली नाही. संपदा व त्यांची आई यांना त्यांच्या बँकेने समूह आरोग्य विमा योजनेत तीन लाखाचे आरोग्य विमा छत्र लाभले आहे. सेवानिवृतीनंतरही त्यांचा हप्ता स्वत: भरून या योजनेचा त्यांना लाभ घेता येतो. त्यांच्यासोबत आई असल्याने त्यांनी पाच लाखाचे अतिरिक्त विमा छत्र घ्यावे अशी शिफारस केली आहे.

संपदा कुमठेकर यांचा जमा खर्च मांडल्यावर एकूण गुंतवणुकांचा फेर आढावा घेणे गरजेचे आहे. सध्याच्या त्यांच्याकडे असलेल्या गुंतवणुकीत कोठेही समभाग गुंतवणुकांचा अंतर्भाव दिसत नाही. जर मुदतपूर्व निवृत्ती घ्यायची असेल तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर वाढणे गरजेचे आहे व हा दर वाढविण्यासाठी तुमच्या एकूण बचतीच्या निदान ६० टक्के गुंतवणूक समभागसदृश्य असणे जरूरीचे आहे. सर्वसाधारणपणे समभागसदृश्य गुंतवणूक किती असावी याचे उत्तर १०० वजा तुमचे सध्याचे वय असे देता येईल.
गुंतवणुकीत समभाग व रोखे यांचे कोणत्या वयात काय प्रमाण असावे याचे नियम ढोबळमानाने ठरले आहेत. व्यक्तीसापेक्ष या नियमांत डोळसपणे बदल जरूर करावा. नियम बदलताना जोखीम स्वीकारण्याची त्या व्यक्तीची क्षमता, आíथक ध्येये यानुसार हे प्रमाण जरूर बदलावयास हरकत नाही. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर हा समभाग व रोखे यांच्या प्रमाणावर ठरत असतो. व स्थिर उत्पन्न गुंतवणुकीचे प्रमाण जितके अधिक तितका परताव्याचा दर कमी. म्हणून तुमची अंदाजे ६० टक्के रक्कम समभागसदृश्य गुंतवणुकीतअसणे जरूरीचे आहे. सध्या तुमच्या १०० टक्के गुंतवणुका स्थिर उत्पन्न (परताव्याचा दर स्थिर असलेल्या) गुंतवणूक गटात मोडतात. मागील साधारण आठ वष्रे चढे व्याज दर असले तरी महागाईचा दर परताव्याच्या दराहून अधिक असल्याकारणाने तुमच्या बचतीची क्रयशक्ती दरवर्षी अंदाजे दोन टक्के कमी होत आली आहे. हे टाळण्यासाठी तुमच्या बचतीच्या परताव्याचा दर महागाईहून अधिक असणे जरूरीचे आहे.
तुमच्यासारख्या अनेक व्यक्ती ज्यांना समभाग गुंतवणुकीची पाश्र्वभूमी नाही अशी मंडळी आपल्या गुंतवणुकीत प्रामुख्याने मुदत ठेवी व पारंपरिक प्रकारच्या विमा योजनांचा अंतर्भाव करतात. या विमा योजनांचा परताव्याचा दर साडेचार पाच टक्क्याच्या जवळपास असतो. तुम्ही तुमच्या पारंपारिक विम्याच्या हप्त्यापोटी पाच लाख ७० हजार हप्ता भरला आहे. आज जर तुम्ही तुमची पॉलिसी विमा कंपनीला परत केलीत तर तुम्हाला अंदाजे एक लाख ८० हजार परत मिळतील. तुमच्याकडे पुरेशी रोकड सुलभता असल्याने तुम्ही या पॉलिसी तुमच्या स्थिर उत्पन्न गुंतवणुका समजणे योग्य ठरेल. यापकी शेवटच्या योजनेची मुदतपूर्ती तुमच्या वयाच्या ५२व्या वर्षी होत आहे. साहजिकच तुम्ही जरी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतलीत तरी निवृत्तीनंतर दीर्घ काळ विमा हप्ता भरावा लागणार नाही. हप्ता भरणे थांबवून चार लाखाचे नुकसान स्वीकारायचे की सुरू ठेऊन मुदतपूर्तीनंतर मोठी रक्कम स्वीकारायची हा तुम्ही निर्णय करायचा आहे.      
आज तुमच्याकडे ११ लाखाच्या मुदत ठेवी आहेत. येत्या वर्षभरात व्याजदर कपात होईल या गृहीतकाच्या आधारावर तुमच्याकडे असलेल्या मुदत ठेवी मुदतपूर्तीनंतर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणे योग्य ठरणार आहे. असे केले तर तुम्हाला सध्याच्या मुदत ठेवीच्या व्याजापेक्षा मिळणाऱ्या परताव्याचा दर जास्त असेल व ही गुंतवणूक कर कार्यक्षम आहे. व्याजदर चढ उताराचा धोका पत्करण्याची इच्छा नसेल दीर्घ मुदतीच्या ठेवीत पसे गुंतवावे. करबचतीसाठी तुम्ही कर्मचारी भविष्य निधी, पीपीएफ व जीवन विमा अशी तीन साधने वापरत आहात. तुम्ही राष्ट्रीयीकृत बँकेतून खाजगी बँकेत आल्यामुळे या तिन्ही साधनांची एकत्रित रक्कम करवजावटीस पात्र रकमेपेक्षा अधिक असल्याने पीपीएफची रक्कम कमी करण्याचे सुचविले आहे. एकूण बचतीवरील परताव्याचा दर वाढविण्याची इच्छा असेल तर सोन्यासारख्या नकारात्मक परतावा दर देणारे गुंतवणूक साधन टाळलेले उत्तम म्हणून एक लार्ज कॅप, दोन मिडकॅप व एक प्रामुख्याने समभाग असलेल्या बॅलेन्स्ड फंडात गुंतवणूक करावी. या व्यतिरिक्त दरमहा १० हजार रुपयांची ‘स्टॉक एसआयपी’ माध्यमातून समभाग खरेदी करावी. पुढील पाच वर्षांत समभाग व रोखे गुंतवणुकीचा समतोल साधता येईल.
av-07
त्यांनी त्यांच्या वित्तीय नियोजनासाठी करावयाच्या गोष्टी
० समूह आरोग्य विमा योजनेव्यतिरिक्त छत्र खरेदी करणे.
० सध्या गुंतवणूक करीत असलेल्या रकमेचा फेरआढावा.
० आणीबाणीच्या प्रसंगासाठी दोन लाखाची तरतूद करणे.
० चार म्युच्युअल फंडात एसआयपी सुरू करणे.
० तुमच्या बँकेची उपकंपनीअसलेल्या दलाली पेढीने सुरू केलेल्या ‘स्टॉक एसआयपी’ योजनेत खाते उघडणे
० एका चांगल्या वित्तीय नियोजकाचा शोध घेणे.
० गुंतवणुकीचा वार्षकि आढावा घेणे.