26 March 2019

News Flash

इक्विटी सेव्हिंग फंड, डायनॅमिक इक्विटी फंड की बॅलन्स्ड फंड? 

आजच्या सदरात आपण यांच्याबद्दल जाणून घेऊ या.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

इक्विटी हायब्रीड फंड अशी यादी जर तुम्ही काढायला गेलात, तर त्यात प्रामुख्याने तीन प्रकार दिसून येतात – सर्वात लोकप्रिय असे बॅलन्स्ड फंड, त्यानंतर थोडे कमी लोकप्रिय किंवा बऱ्याचदा न समजलेले असे इक्विटी सेव्हिंग फंड आणि अ‍ॅसेट अलोकेशन फंड. एकाच प्रकारामध्ये बसत असूनसुद्धा या तीनही फंडांमध्ये फरक आहे. आजच्या सदरात आपण यांच्याबद्दल जाणून घेऊ या.

इक्विटी सेव्हिंग फंडाची गुंतवणूक ६५ ते ७० टक्के समभागात असते, परंतु डेरिव्हेटिव्हज्च्या साहाय्याने त्यातील ४० ते ५० टक्के भाग सुरक्षित केला जातो. त्यामुळे भांडवली बाजारातील चढ-उतारामध्ये होणारी जोखीम कमी होते. या फंडांचा बीटा ०.२ ते ०.५ इतका असल्यामुळे त्यांमध्ये केलेली गुंतवणूक ही कमी जोखमीची असते.

आता वळू या डायनामिक इक्विटी फंडाकडे. प्रत्येक भांडवली बाजारतज्ज्ञ सांगतो की, शेअर स्वस्त असेल तेव्हा घ्या आणि महाग झाला की विकून फायदा कमवा. परंतु प्रत्यक्षात भांडवली बाजाराकडे लक्ष ठेवून गुंतवणूक करणे आणि वेळेला त्यातून फायदा करून बाहेर पडणे हे काही सर्वसामान्य माणसाला शक्य होत नाही. अशा वेळी डायनामिक इक्विटी फंड आपल्या मदतीला येतात. हे फंडसुद्धा समभागात ६५ ते ७० टक्के गुंतवणूक करतात, परंतु जेव्हा भांडवली बाजार खूप महाग होतो, अशा वेळी नवीन गुंतवणूक न करता डेरिव्हेटिव्हज्चा पर्याय निवडून जोखीम कमी करतात. या फंडांच्या गुंतवणुकीमध्ये डेरिव्हेटिव्हज्चा वापर फक्त किमान ६५ टक्के इक्विटी हे समीकरण राखण्याकरिता केला जातो. त्याउलट इक्विटी सेव्हिंग फंडामध्ये डेरिव्हेटिव्हज्चे प्रमाण ठरलेले असते. या फंडाचा बीटा ०.५ ते ०.७ इतका असतो, त्यामुळे इक्विटी सेव्हिंग फंडापेक्षा यांच्यात जोखीम जास्त असते.

या दोघांसमोर जेव्हा आपण आपले जास्त परिचयाचे बॅलन्स्ड फंड पाहतो, तेव्हा दोन गोष्टी प्रकर्षांने जाणवतात. एक म्हणजे – हायब्रीड फंडामध्ये सर्वात जास्त मालमत्ता (एयूएम) ही बॅलन्स्ड फंडांकडे (रु. १.८० लाख कोटी) आहे आणि २० वर्षांपेक्षा अधिक काळ या प्रकारचे फंड कार्यरत आहेत. हे फंड ६० ते ८० टक्के समभाग गुंतवणूक करतात. या फंडांचा बीटा हा वरील दोन्ही प्रकारच्या फंडांपेक्षा जास्त असतो (०.७ ते १.१५), त्यामुळे जोखीम जास्त.

आता एक आढावा आपण वरील नमूद तिन्ही प्रकारच्या फंडांच्या कामगिरीचा घेऊ या. उदाहरणासाठी आपण खालील फंडांमध्ये (रेग्युलर प्लान ग्रोथ) त्यांच्या पहिल्या एनएव्हीपासून केलेल्या मासिक १,००० रुपयांच्या एसआयपीची ८ मार्च २०१८ पर्यंत वाढ कशी असती हे सोबतच्या तक्त्यातून पाहू.

या तक्त्याप्रमाणे गुंतवणूक परतावे लक्षात घेता दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बॅलन्स्ड फंड योग्य आहे. तर कमी काळाच्या गुंतवणुकीसाठी इक्विटी सेव्हिंग फंड आणि जेव्हा भांडवली बाजारात जास्त चढ-उतार होताना दिसत असेल तेव्हा डायनामिक इक्विटी फंड योग्य ठरतील.

First Published on March 12, 2018 12:15 am

Web Title: equity savings funds and dynamic equity fund