12 August 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : कचऱ्यापासून ‘सुगंधा’चा दरवळ

उत्पादनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच जर्मनी आणि स्वित्र्झलडच्या उपकरणांचा वापर कंपनी करते.

अजय वाळिंबे

फेअरकेम स्पेशालिटी म्हणजे पूर्वाश्रमीची अदी फाइनकेम लिमिटेड. २०१५ मध्ये फेअरफॅक्स (इंडिया) होल्डिंग कॉर्पोरेशनने अदी फाइनकेम मधील ४५ टक्के भागभांडवल खरेदी केले. तसेच २०१६ मध्ये प्रिव्ही ऑरगॅॅनिक्स लिमिटेड ही अरोमा केमिकल्स उत्पादक कंपनीदेखील संपादित केली. २०१६ मध्ये विस्तारित कंपनीचे नाव फेअरकेम स्पेशालिटी ठेवण्यात आले.

कंपनीचा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प गुजरातमधील साणंद येथे असून प्रिव्ही ऑरगॅनिक्सचे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्रात महाड येथे आहेत. उत्पादनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच जर्मनी आणि स्वित्र्झलडच्या उपकरणांचा वापर कंपनी करते. आपल्या रासायनिक उत्पादनांसाठी कंपनीचा प्रमुख स्रोत म्हणून सोयाबीन, सूर्यफूल आणि कापूस बियाणे यासारख्या नैसर्गिक तेलांचे अंश वापरात येते. आज न्युट्रास्युटिकल उद्योगासाठी आवश्यक ओलियो रसायने आणि उत्पादनांत फेअरकेम स्पेशालिटी ही कंपनी तज्ज्ञ मानली जाते. कंपनी भारताखेरीज अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये सतत दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा करीत आहे.

कंपनीचा कच्चा माल म्हणजे तेल शुद्धीकरण कारखान्यात तयार होणारा कचरा. कंपनी हा कचरा खरेदी करून नंतर कचऱ्याच्या विविध घटकांचे पृथक्करण आणि शुद्धीकरण करते. त्या साठी अत्याधुनिक प्रक्रिया उपकरणे वापरली जातात. यापैकी काही घटक डाईमर अ‍ॅसिडसारखी पुढील मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी वापरात येतात. फेअरकेम स्पेशालिटी ही डाईमर अ‍ॅसिडचे उत्पादन करणारी भारतातील एकमेव उत्पादक आहे. डाईमर अ‍ॅसिड हे पेंट्स, प्रिंटिंग इंक, इपॉक्सी हार्डनर्स, ड्रिलिंग केमिकल्स आणि मोल्ड्स यासह अनेक ग्राहक उत्पादनांमध्ये वापरले जाते. नैसर्गिक व्हिटॅमिन-ई तयार करण्यासाठी कंपनी टोकॉफेरॉलवर प्रक्रिया करून उत्पादन करते.

साबण, डिटर्जंट्स, शाम्पू आणि इतर रासायनिक उत्पादनांमध्ये सुगंध देण्यासाठी कंपनी सुगंधित रसायने उत्पादित करते. प्रिव्हीच्या सुगंध रसायनांचा महत्त्वपूर्ण भाग पल्प अँड पेपर मिलमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यापासून बनविला जातो – यातील बहुतांश कंपन्या मुख्यत: युरोप, अमेरिका आणि कॅनडामध्ये आहेत. कंपनीची ७० टक्के उत्पादने जगभरात निर्यात केली जातात.

मार्च २०२० अखेर समाप्त आर्थिक वर्षांसाठी कंपनीने उलाढालीत २१.५९ टक्के वाढ नोंदवून ती १,६३१ कोटी रुपयांवर नेली आहे आणि १७६.३३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो तब्बल ८७.११ टक्क्य़ांनी अधिक आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून फेअरकेम स्पेशालिटी ‘पोर्टफोलिओ’साठी एक आकर्षक गुंतवणूक ठरू शकेल.

*आजच्या परिस्थतीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचवलेले शेअर्स हे खालच्या भावातही मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यात करावी.

फेअरकेम स्पेशालिटी लि.

(बीएसई कोड – ५३०११७)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  ६३३

स्मॉल कॅप

प्रवर्तक :                                       फेअरफॅक्स समूह, कॅनडा

उद्योग क्षेत्र :                                 स्पेशालिटी केमिकल्स

बाजार भांडवल :                                              रु. २,४७१ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                          रु.  ७४८ / ३६०

भागभांडवल भरणा :                                       रु. ३९.०७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                              ७४.०६

परदेशी गुंतवणूकदार          ०.४८

बँक/ म्यु. फंड/ सरकार      १.३४

इतर/ जनता                     २४.१२

 

पुस्तकी मूल्य :                                                रु. १८९.६०

दर्शनी मूल्य :                                                  रु. १०/-

लाभांश :                                                         १५%

प्रति समभाग उत्पन्न :                                   रु. ४५.१४

पी/ई गुणोत्तर :                                              १७

समग्र पी/ई गुणोत्तर :                                    १३.६

डेट इक्विटी गुणोत्तर :                                   ०.७४

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :                            ५.७०

रिटर्न ऑन कॅपिटल :                                      १८.२६

बीटा :                                                             १.३५

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 12:01 am

Web Title: fairchem speciality ltd company profile zws 70
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे : आर्थिक नियोजन उद्योगांसाठी
2 बंदा रुपया : यशाचे ‘घरकुल’!
3 माझा पोर्टफोलियो : माफक १५ टक्क्य़ांचा परतावाही सध्या समाधानकारकच!
Just Now!
X