अर्थ साक्षरतेचा उद्देश असलेल्या या सदरातून वेगवेगळ्या कुटुंबांच्या आíथक नियोजनाच्या माध्यमातून उपलब्ध विमा व गुंतवणूक साधनांचा केव्हा व कसा वापर करावा हे आपण जाणून घेत आहोत. हे सदर सुरु झाल्या पासून पहिल्यांदाच असे कोणी भेटले ज्यांची अर्थ नियोजनाच्या पाटीवरचा बराचसा भाग कोरा होता. आणि म्हणूनच या कोऱ्या भागात इतके विविध रंग भरणे शक्य झाले.
आज या सदरातून स्वाती (३३) व राहुल (३१) ठोसर यांचे नियोजन जाणून घेऊ. राहुल हे एका खाजगी बँकेत व्यवस्थापक आहेत. स्वाती या दुसऱ्या खाजगी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक आहेत. राहुल व स्वाती हे दोघे एका सहकारी बँकेत एकाच शाखेत काम करत होते. त्यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला.
राहुल व स्वाती हे राहुल यांच्या आई विद्या ठोसर (६२) व वडील अनंत ठोसर (६७) यांच्या सोबत ठाणे येथे पाचपाखाडी परिसरात रहातात. ठोसर कुटुंब राहात असलेले घर अनंतराव यांनी खरेदी केले होते. ठोसर कुटुंबीयांवर साहजिकच गृहकर्ज नाही. परंतु हे घर असलेल्या इमारतीचा सध्या पुनर्वकिास सुरू असल्याने ते भाडय़ाच्या घरात भांडुप येथे राहतात. त्यांना विकसकाकडून १५ हजार रुपयांचे भाडे मिळते. परंतु प्रत्यक्षात ते २० हजार रुपये भाडे देत आहेत. स्वाती यांची बदली पवई येथील शाखेत झाल्यामुळे त्यांना भांडुप इथून जाणे येणे सोयीचे होते. ठोसर कुटुंबीयांना मिळालेल्या अतिरिक्त क्षेत्रफळाहून त्यांनी एक खोली अधिक घेतल्यामुळे त्यांना विकसकाला १५ लाख जास्तीचे द्यावे लागले. हे १५ लाख राहुल यांच्या वडिलांनी आपल्या निवृत्तीपश्चात मिळालेल्या रकमेतून भरले.
राहुल व स्वाती येत्या वर्षभरात त्यांना पहिले अपत्य होऊ देण्याच्या विचारात आहेत. राहुल यांनी दोन वर्षांपूर्वी वाहन खरेदी केली आहे. या वाहनासाठी पाच लाखाचे कर्ज त्यांना त्यांच्या बँकेने सवलतीच्या दरात दिले. या कर्जापकी चार लाखाची कर्जफेड अद्याप शिल्लक आहे. ठोसर कुटुंबाचे मासिक अंदाजपत्रक सोबत दिले आहे.
खर्च वजाजाता शिल्लक राहात असलेल्या अंदाजे एक लाख रुपयांच्या बचतीचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची राहुल यांची विनंती होती. त्यांच्यासाठी दोन वित्तीय ध्येये ठरविण्यात आली. त्यांना होणाऱ्या मुलाच्या अथवा मुलीच्या भविष्याची तरतूद तसेच स्वाती व राहुल यांच्या निवृत्तीपश्चात खर्चाची तरतूद ही ती वित्तीय ध्येये आहेत. सध्या या कुटुंबाची रोकड सुलभता पाहता ही ध्येये गाठणे फारसे कठीण नसले तरी या रोकड सुलभतेचे काटेकोर नियोजन होणे जरुरी आहे.
जीवन विमा व आरोग्य विमा  
राहुल यांच्याकडे दोन पारंपारिक व स्वाती यांच्याकडे एक ‘मनी बॅक’ प्रकारची पॉलिसी आहे. राहुल हे त्यासाठी वार्षकि ५५ हजार तर स्वाती वार्षकि ३६ हजारांचा हप्ता भरत आहेत. राहुल यांना आठ लाखाचे तर स्वाती यांना चार लाखाचे विमा छत्र लाभले आहे. बाळाच्या आगमनानंतर स्वाती व राहुल यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहेत. तसेच स्वाती गरोदर राहिल्यावर त्यांना पुढील वर्षभर तरी कुठलीही पॉलिसी घेता येणार नाही. तसेच प्रसूतीदरम्यान शस्त्रक्रिया (सीझर) करावी लागल्यास हप्ता वाढतो. याचा विचार करून स्वाती व राहुल यांनी प्रत्येकी दीड कोटी विमा छत्र बहाल करणारी व ३० वर्षांची मुदत असणारी पॉलिसी विनाविलंब घ्यावी. पहिल्या दोन ते पाच क्रमांकाच्या  अव्वल ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ असलेल्या कंपन्यांची पॉलिसी खरेदी करण्यासाठी अंदाजे वार्षकि १२ ते १३ हजार प्रत्येकी विम्याचा हप्ता भरावा लागेल
कुटुंबातील चौघाही सदस्यांना स्वाती यांच्या बँकेकडून प्रत्येकी तीन लाख व राहुल यांच्या बँकेकडून तीन लाख असे सहा लाखाचे आरोग्य विम्याचे कवच लाभले आहे. स्वाती यांच्याशी जेव्हा बोलणे झाले तेव्हा स्वाती व राहुल यांनी आरोग्य विमा व अपघाती विमा यांचा विचारही केलेला नाही. स्वाती व राहुल यांनी २० लाखाचा ‘फॅमिली फ्लोटर’ खरेदी करावा. तसेच ४० ते ५० लाखाचा ‘क्रिटिकल हेल्थ इन्शुरन्स’ व तितक्याच रकमेचा अपघाती अपंगत्व आल्यास संरक्षण देणारा विमा खरेदी करावा. या तिन्हीसाठी त्यांना अंदाजे दरमहा १० हजार खर्च येईल. त्यांच्याकडे असलेली रोकड सुलभता पाहता ही तिन्ही उत्पादने खरेदी करणे गरजेचे आहे.
स्वाती व राहुल यांनी आपल्या पारंपरिक व मनी बॅक विमा योजना परत (सरेंडर) कराव्यात. या योजना परत केल्यास त्यांना अंदाजे दीड लाख परत मिळतील व सध्या भरत असलेल्या हप्त्याच्या रकमेत ही अतिरिक्त उत्पादने घेणे शक्य आहे.
स्वाती यांना त्यांचे संभाव्य अपत्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचे शिक्षण (आयबी) घेणे आवडेल, असे त्या म्हणाल्या. त्यांना सोयीची ‘आयबी’ अभ्यासक्रम शिकविणारी शाळा अद्याप त्यांच्या दृष्टीपथात नाही. परंतु लवकरच सुरू होण्याची आशा आहे. स्वाती व राहुल हे बाळाचा जन्म नावीत घरात व्हावा असे नियोजन करीत आहेत. अद्याप या जगात आगमनाची वर्दीही न दिलेल्या बाळाच्या भविष्यासाठी त्यांना एक कोटीची तरतूद शिक्षणासाठी व मुलगी झाल्यास अधिकची एक कोटीची तरतूद तिच्या लग्नासाठी करावी असा निर्णय झाला. हे बाळ शक्य झाल्यास त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी परदेशी शिकायला जाईल, या पद्धतीने नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी वित्तीय नियोजाकाला दिल्या. दरमहा २५ हजार रुपये समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात व २५ हजार रुपये दोघांनी आपापल्या ‘पीपीएफ’ खात्यामध्ये जमा करायचे आहेत. स्वाती व राहुल यांच्या घरात नवीन पाहुणा येणार आहे. या पाहुण्याच्या पाहुणचाराचा खर्च एक ते दीड लाख होईल. म्हणून या खर्चाची तरतूद म्हणून त्यांना एखाद्या शॉर्ट टर्म फंडात जो ‘लो लोड’ फंड असतो त्यात गुंतवणूक करण्याचे सुचविण्यात आले. हा फंड स्वाती ठोसर यांना यांच्या बचत खात्याहून अधिक म्हणजे ६.५ ते सात टक्के परतावा देईल.
या सदराचा उद्देश अर्थ साक्षरता आहे. वेगवेगळ्या कुटुंबांच्या आíथक नियोजनाच्या माध्यमातून उपलब्ध विमा व गुंतवणूक साधनांचा केव्हा व कसा वापर करावा हे जाणून घेत आहोत. हे सदर सुरु झाल्या पासून पहिल्यांदाच असे कोणी भेटले ज्यांची अर्थ नियोजनाच्या पाटीवरचा बराचसा भाग कोरा होता. आणि म्हणूनच या कोऱ्या भागात इतके विविध रंग भरणे शक्य झाले. आजच्या घडीला एक लाखादरम्यान गुंतवणूक शिल्लक असणे दुर्मिळ गोष्ट नव्हे. परंतु या एक लाखापकी एक लाख आíथक नियोजनासाठी उपलब्ध असणे हे दुर्मिळ असते. अनेक कुटुंबांच्या बाबतीत असे दिसून येते की कुटुंबातील मिळवत्या व्यक्तीकडे अकार्यक्षम विम्याच्या योजनांचा रतीब लावलेला असतो. जुन्या काळात कुटुंबात दर दोन तीन वर्षांनी पाळणा हलत असे तसे दर दोन तीन वर्षांनी गरज असो वा नसो नवीन विम्याची योजना खरेदी सुरू असते. उदाहरण देऊन सांगायचे तर या सदरातून आधी ज्यांचे नियोजन जाणून घेतले त्यापकी काहींची गुंतवणूकयोग्य शिल्लक ठोसरांपेक्षा अधिक होती. शिलकीपकी मोठी रक्कम गरज नसलेल्या विम्याचे हप्ते भरण्यात खर्च होत होती. म्हणूनच अपघाती अपंगत्व आल्यास भरपाई मिळणारा विमा वैगरे देण्यास वाव नव्हता. म्हणून कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी मला या गुंतवणूक साधनाची किती गरज आहे काय याचा विचार होणे जरुरीचे आहे. अन्यथा अनेक आवश्यक असलेली साधने विकत घेता येत नाहीत असाच या निमित्ताने धडा मिळतो.