News Flash

आर्थिक नियोजन यशवंताचे

अनेकांचा नित्यनेम असलेल्या संत ज्ञानेश्वररचित हरिपाठातील चौथ्या अभंगाने आजची सुरुवात करीत आहे. आषाढीच्या निमित्ताने एखाद्या संताचे स्मरण ओघाने आलेच.

| July 27, 2015 01:05 am

भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती।
बळेविण शक्ती बोलू नये ।।
कैसोनी दैवत प्रसन्न त्वरीत।
उगा राहे निवांत शिणसी वाया ।।
सायासे करिसी प्रपंच दिननिशी।
हरिसी न भजसी कवण्या गुणे।।
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे।
तुटेल धरणे प्रपंचाचे।।
अनेकांचा नित्यनेम असलेल्या संत ज्ञानेश्वररचित हरिपाठातील चौथ्या अभंगाने आजची सुरुवात करीत आहे. आषाढीच्या निमित्ताने एखाद्या संताचे स्मरण ओघाने आलेच. परंतु सदराच्या विषयाला देखील हा अभंग स्पर्श करतो. हा अभंग संवादात्मक असून प्रापंचिकाला पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर माऊली या अभंगातून देत आहेत. प्रापंचिक आपला देह प्रपंचाकरीता (पसे कमविण्यासाठी) शिणवत असतो. जीवा शिवाची गाठ घालायची असेल तर श्रद्धेने केलेली भक्तीच कामी येते. असा या अभंगाचा अर्थ आहे. अनेक जण बचत करतात. परंतु या बचतीला योग्य नियोजनाची सांगड नसेल तर बचत ध्येय गाठू शकत नाही, हे प्रत्येक बचतकर्त्यांनी ध्यानी घेणे जरुरीचे आहे.
राज्याच्या लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे निकाल दीड दोन महिन्यांपूर्वी जाहीर झाले. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एका ‘यशवंता’ने नियोजनासाठी संपर्क केला. महाराष्ट्र पोलीस सेवेत निवड झालेल्या या ‘यशवंता’ची पोलीस उपअधीक्षक या पदासाठी निवड झाली असून लवकरच पोलीस प्रशिक्षण अकादमी नाशिक येथे प्रशिक्षणाला सुरुवात होईल. प्रशिक्षण काळात ४५,००० रुपये वेतन मिळेल. पहिल्या पगारापासून आíथक बाबींचे सुनियोजन करू इच्छिण्याचा या ‘यशवंता’चा बेत आहे.
पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून या ‘यशवंता’ने वैद्यक शाखेतील पदवी मिळविली आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडील व धाकटी बहिण आहे. वडील जिल्हा उपशिक्षण अधिकारी असून त्यांची सहा वर्षांची सेवा अद्याप शिल्लक आहे. आई गृहिणी आहे. धाकटी बहीण पुण्याच्या कृषी महाविद्यालयात शिकत आहे. २७ वर्षे वय असलेल्या या ‘यशवंता’ची केद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस किंवा आयपीएस होण्याची मनीषा असून ऑगस्टमध्ये  होणाऱ्या प्राथमिक परीक्षेची तयारीही सुरु आहे. वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर नागरी सेवा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी हा यशवंत दोन वष्रे पुण्यात राहिला. या दरम्यान चार लाख खर्च झाला असून हे पसे वडिलांना परत करणे हे पहिले वित्तीय ध्येय आहे. २०१८ नंतर केव्हाही बहिणीचे लग्न होईल या लग्नाच्या खर्चाची तरतूद म्हणून काही रक्कम आईला देणे हे दुसरे वित्तीय ध्येय आहे.

’यशवंता’चे वय व शिल्लक असलेली ३० वर्षांची नोकरी पाहता नियोजनाची सुरुवात दोन कोटींच्या मुदतीच्या विम्याने करणे योग्य ठरेल. वार्षकि सहा लाखांच्या उत्पन्नावर दीड कोटीचा विमा मिळू शकेल. हल्ली विमा कंपन्या विमा रकमेबाबत फारशा कडक नसतात. वय सरकारी नोकरी, शिक्षण वार्षकि हप्ता भरण्याची क्षमता लक्षात घेऊन पाच पकी तीन विमा कंपन्या इतक्या मोठय़ा रकमेचा विमा देतील. दोन कोटी विमा रक्कम व तीस वर्षांच्या मुदतीसाठी विम्यासाठी एलआयसीला २८,७६५ रु., बिर्ला सनलाईफला २६,८७५ रु., एसबीआय लाईफला २३,४५० रु. व आयसीआयसीआय प्रुडेन्शियलला २१,३६७ रु. इतका हप्ता द्यावा लागेल. हा विमा खरेदी करण्यासाठी वरीलपकी एका पसंतीच्या विमा कंपनीची निवड करावी.
‘यशवंता’च्या अंदाजानुसार वजावटपश्चात मासिक ४२ हजार वेतन अपेक्षित आहे. ५ हजार रु. वैयक्तिक खर्चासाठी वापरून ३७ हजाराची गुंतवणूक करणे शक्य आहे. प्रशिक्षणादरम्यान सर्वच प्रशिक्षणार्थ्यांचे राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत खाते उघडले जाईल. सरकारी कर्मचारी आपल्या राष्ट्रीय पेन्शन योजनेतील जमा निधीपकी जास्तीत जास्त १५ टक्के निधी समभागात गुंतवणूक करू शकतात. हा १५ टक्के समभाग विकल्प दीर्घकाळात १०० टक्के रोखे गुंतवणुकीपेक्षा चांगला परतावा देईल.
पहिले व दुसरे वित्तीय उद्दिष्ट पुढील दोन-चार वर्षांत पूर्ण करावयाचे असल्याने असल्याने केवळ समभाग गुंतवणूक करणारे फंड धोक्याचे वाटले. यावर ‘यशवंता’शी बोलणे झाल्यावर वडिलांना पसे देणे पुढेमागे झाले तरी चालेल असे कळले. म्हणून बहिणीच्या विवाहासाठी दीड वर्षांचा कालावधी शिल्लक असल्याने मासिक १५ हजाराची एसआयपी एचडीएफसी बॅलेन्स्ड किंवा टाटा बॅलेन्स्ड यापकी एका फंडात करावी. वडिलांच्या पशाची परतफेडीची तरतूद म्हणून एक लार्ज कॅप व एक मिड क ॅप या फंडांची निवड करून ६० टक्के लार्ज कॅप व ४० टक्के मिड कॅप या प्रमाणात एसआयपी सुरू करावी.
आपल्या निवृत्तीचे नियोजन पहिल्या पगारापासून करणे या सारखी आदर्श गोष्ट असू शकत नाही यासाठी अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी या फंडाची शिफारस करीत आहे. दरमहा एक हजाराने सुरुवात करून टप्याटप्याने वाढ करीत एसआयपीची रक्कम वाढवायची आहे. जेणेकरून आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर कराव्या लागणाऱ्या खर्चाची चिंता वाटणार नाही.

‘यशवंता’ने वित्तीय नियोजनात करायाच्या गोष्टीं
* मुदतीचा विमा:    एलआयसी ई-टर्म, एसबीआय लाईफ ई-शील्ड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आय-शील्ड         किंवा बिर्ला सनलाईफ प्रोटेकक्टर प्लस यापकी एकाकडून २ कोटींचा मुदतीचा विमा घेणे
* पीपीएफ खाते:    नजीकच्या स्टेट बँकेच्या शाखेत किंवा पोस्टात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खाते         उघडून प्रत्येकी दरमहा किमान १,००० रु. भरावेत.
* राष्ट्रीय पेन्शन योजना:    १५ टक्के समभाग गुंतवणूक असलेला पर्याय स्वीकारणे
* ईएलएसएस योजना:    कर नियोजनासाठी अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंडात १,००० रुपयांची ‘एसआयपी’ करणे
*  इक्विटी लार्ज कॅप:     दरमहा १,००० रुपयांची आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस ब्लूचीप, अ‍ॅक्सीस इक्विटी             यापकी एका     फंडात ‘एसआयपी’ सुरूकरावी.
* इक्विटी मिडकॅप:    १,००० रुपयांची एचडीएफसी मिड कॅप, आयडीएफसी प्रिमीयर इक्विटी, रिलायन्स स्मॉल कॅप,         डीएसपी ब्लॅकरॉक मायक्रो कॅप, यापकी एका फंडात एसआयपी सुरू करावी.
shreeyachebaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 1:05 am

Web Title: financial planning 8
टॅग : Niyojan Bhan
Next Stories
1 कंपनी मुदत ठेवी गुंतवणूकदारांसाठी कानमंत्र
2 विरामभंग आणि तेजी-मंदीवाल्यांचे सापळे!
3 मध्यम काळासाठी गुंतवणूक संधी
Just Now!
X